शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचा नेता ठाकरेंच्या शिवसेनेत करणार प्रवेश; सावंतवाडीत दीपक केसरकरांची चिंता वाढली?
2
IAS अधिकारी रानू साहू यांना अटक, 540 कोटींचा DMF घोटाळा काय?
3
15 विधानसभा उमेदवारांची नावे असलेली यादी व्हायरल; काँग्रेसने सांगितलं सत्य काय?
4
इस्रायलच्या हल्ल्यात हमास प्रमुख याह्या सिनवार ठार; 3 महिन्यांत 3 मोठे शत्रू संपवले
5
Women's T20 World Cup: ऑस्ट्रेलियाचा खेळ खल्लास; दक्षिण आफ्रिकेनं दिमाखात गाठली फायनल
6
Mahayuti: "रामटेकमध्ये जयस्वाल नकोच, महायुतीने दुसरा उमेदवार द्यावा"
7
आज माझं कुटुंब कोसळलं आहे, पण...; बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर मुलगा झिशान सिद्दिकींनी काय आवाहन केलं?
8
'जुन्या गोष्टी विसरुन भविष्याकडे वाटचाल करा', भारत-पाक संबंधांवर नवाझ शरीफ स्पष्ट बोलले
9
"वरोराची जागा भाजपलाच हवी, अन्यथा...", पक्षाला इशारा, इच्छुक धडकले कार्यालयात
10
सरकारनं खेळाडूंची बक्षिसं दिली नाहीत, विश्वविजेत्या संघातील काहींशी चर्चा झाली; आव्हाडांचा दावा
11
"तुमच्यात धमक असेल, तर..."; प्रवीण दरेकरांचं मनोज जरांगेंना खुलं आव्हान
12
'या खुर्चीने दगा दिला ऐसा की...'; शिंदेंच्या सेनेने ठाकरेंना व्यंगचित्रातून डिवचलं
13
IPL 2025: काव्या मारन खेळणार मोठा डाव; पॅट कमिन्स नव्हे, 'हा' स्टार क्रिकेटर खाणार जास्त 'भाव'
14
विधानसभेला भाजपचे प्रभाकर पाटील 'घड्याळ' हातात बांधणार?; महायुतीत हालचाली गतीमान; लवकरच शिक्कामोर्तब!
15
दोन महिन्यांपासून ठावठिकाणा नाही, शेख हसिना आहेत कुठे? समोर आली अशी माहिती
16
INDW vs NZW : टीम इंडियाची घोषणा! हरमनबद्दलच्या चर्चांना पूर्णविराम; रिचा १२वी बोर्ड परीक्षेमुळे मुकणार
17
माजी खासदार संभाजीराजेंचा मोठा गौप्यस्फोट; "लोकसभा निवडणुकीत काँग्रेस हायकमांडनं..."
18
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खासगी प्रवासी बसची टेम्पोला धडक; अपघातात २३ जण जखमी 
19
१८०० वर इच्छुकांसोबत आज केवळ चर्चा, निर्णय अंतिम बैठकीत समाज घेणार: मनोज जरांगे
20
पुन्हा रेल्वे अपघात, लोकमान्य टर्मिनल एक्स्प्रेसचे ८ डबे रुळावरून घसरले; आसाममध्ये रेल्वे सेवा विस्कळीत

‘रयतेच्या राजा’ला पुस्तकात समाधानकारक स्थान नाही

By admin | Published: March 17, 2015 10:19 PM

नितीन बानगुुडे : दंडबळावरच चालते राजकारण, चांगुलपणाला तेथे स्थान नाही

राजापूर : राजकारण हे दंड बळावर किंवा चांगुलपणावर चालत नाही तर बुद्धी कौशल्यावरच चालते. हे वेळीच ओळखून वागणारे छत्रपती शिवाजी राजे जगात आदर्श ठरले. त्यांच्या यशाची गाथा यापुढेही अशीच दुमदुमत राहील, मात्र एवढे असामान्य कर्तृत्त्व दाखवणाऱ्या रयतेच्या राजासाठी आमच्या पाठ्यपुस्तकात समाधानकारक स्थान नसते. ही खेदजनक बाब असल्याची खंत ज्येष्ठ इतिहासतज्ञ प्रा. नितीन बानगुडे (पाटील) यांनी रायपाटण होळीचा मांड येथे आयोजित कार्यक्रमादरम्यान व्यक्त केली.शिवसेना चित्रपट सेनेचे चिटणीस व रायपाटण गावाचे सुपुत्र केतन रोडे यांच्या सहकार्याने प्रा. नितीन बानगुडे पाटील यांच्या शिवचरित्रावरील व्याख्यानाचा कार्यक़्रम रायपाटण होळीचा मांड येथे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी प्रा. बानगुडे पाटील बोलत होते. सदरप्रसंगी व्यासपीठावर श्री वडचाई देवस्थाचे सर्व मानकरी, गावकार, ट्रस्टचे पदाधिकारी, ज्येष्ठ ग्रामस्थ, राजापूर पंचायत समितीचे उपसभापती उमेश पराडकर रायपाटण रेवणसिद्ध मठाचे स्वामी उपस्थित होते.निर्माण केलेले स्वराज्य हे खऱ्या अर्थाने जनतेसाठीच आहे. याच जाणिवेतून आदर्श राज्यकारभार करीत लोकाभिमुख ठरलेल्या आदर्श राजाने आदर्श कारभार केला. लोकाभिमुख ठरलेल्या छत्रपती राजा शिवाजी राजांच्या लखलखता व तेजस्वी तळपळणारा इतिहास यावर प्रा. बानगुडे पाटील यांनी दृष्टीक्षेप टाकला.मोगलाईच्या काळात निर्माण झालेली अंधश्रद्धा राजमाता जिजाबार्इंनी कशा पद्धतीने मोडून काढली. इथपासून जनतेच्या भातशेतीचे नुकसान करणाऱ्या रानटी जनावरांचा कशाप्रकारे बंदोबस्त केला गेला यावर विवेचन करत त्यांनी जिजाबार्इंचा आदर्श इतिहास उलगडला. जनतेसाठी स्थापन करण्यात आलेले स्वराज्य ही खरेतर त्या काळातील पहिली सहकारी संस्था होती, असे मत त्यांनी मांडले.स्वराज्याच्या स्थापनेपासून त्यावर चाल करून येणारा अफझलखान असो, शाहिस्तेखान असो, सिद्धी जोहरपासून थेट औरंगजेबापर्यऐत राजांनी कसा लढा दिला त्यावर प्रा. बानगुडे पाटभल यांनी विस्तृत विवेचन करत साक्षात इतिहासच उभा केला. अशा न्यायी राजाने केवळ दुर्गच बांधले नाही तर नरदुर्ग देखील उभे केले हे इतिहासात अनेक लढवय्यांच्या पराक्रमावरुन दिसून आले. अफझलखानाचा वध केल्यानंतर राजे स्वस्थ बसले नाहीत, तर पुढील २० दिवसात २०० किमीचा मुलुख पादक्रांत करत त्यांनी १८ किल्ले जिंकले होते. त्यावरुन त्यांच्या कर्तृत्वाची प्रचिती येते, असे पाटील पुढे बोलताना म्हणाले. जबाबदारी कशी पार पाडायची याचा आदर्श नमुना राजांकडे होता. आणि त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन लढणाऱ्या मर्द मावळ्यांनी देखील तेच सूत्र अवलंबले. त्यामुळे स्वराज्यावरील वारंवार चालून आलेली संकटे, दूर करता आली. केवळ कारणे सांगून चालत नाहीत कारण त्यामुळे यशोगाय माळ गळ्यात घालीत नाहीत. त्यासाठभ राजाचे हृदय असावे लागते, असे सांगून, ‘जगावे वाघासारखे व लढावे शिवबासारखे’ या उक्तीचा त्यांनी पुनरुच्चार केला. मागील अनेक वर्षे व्हिएतनाम समवेत युद्ध करणाऱ्या अमेरिकेला यश का मिळाले नाही, तर समस्त व्हिएतनाममध्ये छत्रपती शिवाजी राजांचा आदर्श मानला जात आहे म्हणूनच. या कार्यक्रमाला शिवप्रेमींची मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली होती. (प्रतिनिधी)स्वराज्य म्हणून जगाला ओळख करून देणाऱ्या राजा छत्रपतींच्या इतिहासाच्या कर्तृत्त्वाचे पोवाडे ज्या प्रमाणात आमच्या शालेय पाठ्यपुस्तकात किंवा एमपीएससी व युपीएससीच्या परीक्षेत असायला हवे तेवढे ते लिहिले गेले नाहीत. केवळ चार पाच ओळीतच त्यांचा इतिहास लिहून नतद्रष्टपणा दाखवला गेला अशी खंत प्रा. बानगुडे पाटील यांनी व्यक्त केले. राजापुरात बानगुडे यांचे शिवचरित्रावरील व्याख्यान.स्वराज्य हे खऱ्या अर्थाने जनतेसाठीच : बानगुडे.स्वराज्य ही जनतेसाठी स्थापन केलेली पहिली सहकारी संस्था.बानगुडे यांनी प्रेक्षकांसमोर उभा केला इतिहास.व्हिएतनाममध्ये छत्रपती शिवाजी राजांचा मानला जातो आदर्श.