राजरत्न सिरसाट, अकोलाराज्यातील ‘बांधा, वापरा व हस्तांतरित करा’ (बीओटी) या तत्त्वावर नऊ कामांना मंजुरी मिळाली आहे. लवकरच ही कामेही सुरू होणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ते व भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी दिली. मोदी सरकारच्या आतापर्यंतच्या कार्यकाळात ३ लाख कोेटींची रस्त्यांची कामे सुरू करण्यात आली आहेत. येत्या दोन वर्षांत आणखी पाच लाख कोटी रुपये यासाठी खर्च करण्यात येतील, असेही ते म्हणाले.डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या ३० व्या दीक्षांत समारंंभाला उपस्थिती राहण्यासाठी शुक्रवारी गडकरी अकोला येथे आले असताना, त्यांच्याशी संवाद साधल्यावर खात्यांतर्गत विकास कामांची माहिती खास ‘लोकमत’ला दिली. ते म्हणाले, ‘नऊ बीओटी प्रकल्पांत सरकारला जागा, तसेच वन पर्यावरणास मंजुरी मिळवून द्यावी लागेल. या कामांत सरकार ४० टक्के तर कंत्राटदार ६० टक्के गुंतवणूक करतील. रस्ते बांधणीचा खर्च संबंधित कंत्राटदाराला व्याजासह परतफेड केला जाईल. या प्रकल्पाला चांगला प्रतिसाद मिळत असून, यापुढे अॅन्युईटी तत्त्वावर रस्ते सुधारणा होईल.’‘सुरुवातीला वाराणसी ते हरदिया जलमार्ग निर्माण करून त्यातून जलवाहतूक सुरू केली जाणार आहे. त्यासाठी पाच अंतर्गत जलवाहतुकीला मान्यता मिळाली आहे. उर्वरित १११ जलमार्ग लोकसभेत मंजूर झाले असून, राज्यसभेत मंजुरी मिळाल्यानंतर या कामाला गती येईल. त्याचा फायदा महाराष्ट्रालासुद्धा होणार आहे,’ अशी माहिती त्यांनी पुढे दिली.
बीओटी तत्त्वावरची कामे सुरू च राहणार
By admin | Published: February 08, 2016 4:26 AM