सध्याचे वातावरण पाहता महापालिकेच्या निलडणुका लागतील असे वाटत नाही. जो काही आता राजकीय घोळ झालेला आहे, तायमुळे निवडणुका लावून पायावर कोणी धोंडा पाडून घेणार नाही. आता ज्या लागतील त्या लोकसभेच्याच लागतील. त्या दृष्टीने आमच्या प्रत्येक लोकसभा मतदारसंघात चाचपणी होईल. आमची टीम जाईल आणि हे काम करेल, असे राज ठाकरे म्हणाले.
माझे ऐकत नाही तुम्ही. मी मागेच सांगितलेय की राष्ट्रवादीची ती पहिली टीम आहे, उर्वरित टीमही तिकडे जाणार आहे. हे सर्व आतूनच चालू आहे. हे काही आजचे नाहीय, २०१४ पासून हे लोक एकत्र आलेले आहेत. तुम्हाला पहाटेचा शपथविधी आठवत नाही का, त्यांनतर झालेल्या गोष्टी. शरद पवार आणि अजित पवार यांना भेटायची जागा 'चोरडिया' या नावाच्या ठिकाणी मिळावी हे पण कमाल आहे, असा खोचक टोला राज ठाकरेंनी अजित-शरद पवार गुप्त भेटीवर लगावला.
सध्या दोन दिवसांपूर्वी काय बोलले जाते आणि दोन दिवसांनी काय होते हे काही पत्रकारांना नवीन नाहीय, असे युतीच्या चर्चांवर राज ठाकरेंनी उत्तर दिले. सर्वच बाजुंनी सगळीकडे कन्फ्युजन आहे. हळूहळू हे सर्व दूर होईल. पनवेलला परवा मेळावा आहे, मुंबई गोवा रस्त्याच्या दुरावस्थेवर मी तेव्हाच बोलेन, असा इशारा राज ठाकरेंनी दिला.