ऑनलाइन लोकमत
औसा, दि. 5 - मामा वारल्याचे दुःख त्यांच्या ऊरात होते. डोळ्यातली आसवे बाजूला ठेवून ते दोघे अंत्यविधीचे साहित्य आणायला निघाले. अंत्यविधीचे साहित्य घेऊन परत फिरले. पण विधीलिखित वेगळेच होते. ते दोन्ही तरुण ज्या दुचाकीवरुन येत होते त्या दुचाकीला एका बसने चिरडले. या दोघांवर नियतीने अशा प्रकारे घाला घातल्याने जावळी येथील सुरवसे आणि हेबाळे कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. नितीनव बेंबाडे व संजय सुरवसे अशी मयत झालेल्या तरूणांची नावे आहेत.
जावळी येथील तुकाराम सुरवसे यांचा बुधवारी रात्री ह्रदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला होता. त्यांच्यावर गुरुवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार होते. या अंत्यसंस्कारासाठी लागणारे साहित्य आणण्यासाठी नितीन बब्रुवान हेंबाडे (२५) व संजय मुगळे (३२) हे दोन तरुण आपल्या एम.एच.२४ ए.एम. ०१९१ या मोटारसायकलने सकाळी जावळीहून लामजन्याला गेले होते.
लामजना येथे साहित्य खरेदी करुन ते परत जावळी कडे परत फिरले. मात्र लामजना येथील प्राथमिक आरोग्य केंन्द्राच्या समोर लातूरहून उमरगाकडे जाणाऱ्या निलंगा- लातूर - कलबुर्गी या एम. एच.२४ बी.टी.१९३८ या वेगात निघालेल्या बसने चिरडले. ही धडक ईतकी जोरात होती की अक्षरशः बसने २० फुट फरफरटत नेले. यात दोन्ही तरुणाचा मृत्यू झाला. अंत्यविधीचे साहित्य घेऊन जाणाऱ्या या दोन तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना जावळी येथे कळताच जावळी गावात कळताच संपूर्ण गावावर दुःखाचा डोंगर कोसळला. नात्यातीलच तीन कुटुंबावर एकाच वेळेला हा दुःखाचा डोंगर कोसळल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.