नवी मुंबई : आॅनलाइन शॉपिंगची सुविधा देणाऱ्या कंपनीच्या वेबसाईटचा डेटा चोरून त्यापासून दुसऱ्या कंपनीची वेबसाईट तयार करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकारात सुमारे १०० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची तक्रार मूळ कंपनीने केल्यानंतर गुन्हे शाखेच्या सायबर सेलने ही कारवाई केली आहे.‘नापतोल’ या कंपनीच्या डेटाचोरीप्रकरणी अटकेत असलेले कमलकमार साबू आणि विक्रम यादव हे दोघेही याच कंपनीचे माजी कर्मचारी असून, कंपनीच्या इतरही काही कर्मचाऱ्यांचा यात समावेश असण्याची शक्यता आहे. साबू आणि यादव यांनी नापतोलच्या वेबसाईटचा आॅनलाइन सोर्स व आवश्यक प्रोग्रामिंग डेटा चोरी करून त्याद्वारे ‘बेस्ट डिल’ व ‘बिग डिल’ अशा दोन नावांनी संकेतस्थळे तयार केली. त्यापैकी एक वेबसाईट तामिळनाडूमध्ये तर दुसरी देशभर अनेक ठिकाणी वापरात आहे. या संकेतस्थळांमार्फत ग्राहकांकडून उत्पादनाची आॅर्डर घेण्यापासून उत्पादन घरपोच करेपर्यंत वापरात येणाऱ्या कार्यप्रणालीचा समावेश आहे. (प्रतिनिधी)
डेटा चोरणाऱ्या दोघांना नवी मुंबईत अटक
By admin | Published: November 14, 2015 3:51 AM