शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

दोघेही युतीचे मारेकरी

By admin | Published: January 28, 2017 1:09 AM

मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना, भाजपा दोघांनाही युती नकोच होती. त्यामुळे एकमेकांना स्वीकारार्ह होणार नाहीत, अशा अटी टाकल्याने दोघेही युतीचे मारेकरी

यदु जोशी / मुंबईमुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना, भाजपा दोघांनाही युती नकोच होती. त्यामुळे एकमेकांना स्वीकारार्ह होणार नाहीत, अशा अटी टाकल्याने दोघेही युतीचे मारेकरी असल्याचे संपूर्ण घटनाक्रमावरून स्पष्ट होते.दोन्ही पक्षांचे नेते चर्चेला बसलेले असतानाच २२७ उमेदवारांची यादी तयार करण्याचे काम वेगात सुरू होते. शिवसेनेने युतीची वाट न बघता वचननामादेखील जाहीर केला. राज्यामध्ये सत्तेत असलेल्या दोन पक्षांपैकी मुंबईवर राज्य कोणाचे ही वर्चस्वाची घमासान लढाई आता बघायला मिळणार आहे.मुंबई महापालिकेत शिवसेना मोठा भाऊ तर भाजपा लहान हे आजवरचे समीकरण. राज्यात भाजपा नंबर एकचा पक्ष झाला तरी मुंबईतील शिवसेनेचे मोठेपण कायमच होते. युतीच्या बोलणीची सुरुवात करतानाच, भाजपाने हे मोठेपण नाकारत समसमान म्हणजे २२७ पैकी ११४ जागा मागितल्या. ‘आपण तर मुंबईचे राजे!’ ही भावना असलेल्या शिवसेनेला त्यांच्या अंगणात आपल्या बरोबरीने कोणी येऊ पाहातेय, हे मान्य होणेच शक्य नव्हते. दोनच दिवसांत सेनेने ठणकावून सांगितले, ‘६० जागा घ्या नाहीतर घरी जा.’ भाजपाला आॅफर देण्यापेक्षा अपमानित करण्याचच केवळ हेतू असावा, असे या आकड्यावरून जाणवले. शिवसेना साठची फार तर ७५ ते ८० जागा देईल, हे लक्षात घेऊन भाजपानेही ११४ चा हेका सोडला नाही. युती होण्यातील तो सगळ््यात मोठा अडसर शेवटपर्यंत कायम राहिला. भाजपानेही नवीन प्रस्ताव शेवटपर्यंत दिला नाही किंवा युतीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अनुकूल असल्याने, ते शेवटच्या क्षणी उद्धव ठाकरे यांच्याशी बोलून युतीची गाडी रुळावर आणतील, असे वाटत होते, पण तसे घडले नाही. स्वबळावर लढण्याचा पक्षांतर्गत दबाव मुख्यमंत्र्यांवर सुरुवातीपासूनच होता. शिवसेनेकडून ७५-८० जागा घेऊन लढण्यापेक्षा २२७ जागा लढून मोठे यश मिळवावे, हा विचार मुख्यमंत्र्यांनी शेवटच्या टप्प्यात पक्का केला आणि वर्षा व मातोश्रीदरम्यान एरवी अनेक विषयांवर चर्चेसाठी असलेली हॉटलाइनच बंद पडली.