आंबोली (जि. सिंधुदुर्ग) : आंबोलीतील कावळेसाद पाँर्इंटवरुन दरीत पडलेले दोघे युवक मद्यधुंद अवस्थेत होते. नशेतच मौजमस्ती करताना त्यांच्या जीवावर बेतल्याचे स्पष्ट झाले आहे. चार दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने ही वास्तव परिस्थिती उजेडात आली आहे.सोमवारी सायंकाळी गडहिंग्लज येथील पोल्ट्री काम करणारे सात युवक आंबोली कावळेसाद येथे वर्षा पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी आले होते. यातील इम्रान गार्दी व प्रशांत राठोड हे ‘फिरून येतो’, असे सांगून तेथून निघून गेले. यावेळी ते एका हातात दारूची बाटली आणि एका हाताने दरीच्या बाजूला असलेल्या रेलिंगवर मौजमजा करता करता ते कावेळसादच्या खोल दरीत पडले. सुरूवातीला दरीत पडल्याबाबत साशंकता वाटत होती. पण व्हीडीओनंतर रात्री उशिरा पोलिसांकडून दोन्ही युवक दरीत पडल्याचे सांगण्यात आले.हा व्हिडीओ त्या दिवशी कावळेसाद पॉर्इंट येथे आलेल्या कर्नाटकच्या गु्रपमधील कोणत्या तरी युवकाने चित्रीत केल्याचे पुढे आले आहे.शोधकार्यात अडथळेसांगेली, आंबोली व कोल्हापूर येथील शोधपथके दरीत त्यांचा शोध घेत आहेत. दाट धुके तसेच खाली मोठा पाण्याचा प्रवाह यामुळे मृतदेह वाहून पुढे जात असल्याने शोधकार्यात अडचणी येत आहेत.बुधवारी रात्री कोल्हापूरच्या शोध पथकातील दोघांना दरीतून वर येता आले नसल्याने त्यांनी दरीतच राहण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यांना तेथे बरेच अस्वस्थ वाटत होते. गुरूवारी सायंकाळी सांगेली (सिंधुदुर्ग) येथील शोधपथकाने त्यांना वर आणले. त्यावेळी त्यातील एकाला ताप आला होता.
मद्यधुंद अवस्थेतच ‘ते’ दोघे दरीत पडले, आंबोली घटनेचा व्हिडिओ व्हायरल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2017 3:52 AM