कडेगाव (सांगली) : नेर्ली (ता. कडेगाव) येथे प्रेमप्रकरणातून दोघा सख्ख्या भावांना बाराजणांनी बेदम मारहाण केली आणि विवस्त्र करून त्यांची धिंड काढली. ही घटना सोमवारी रात्री आठच्या सुमारास घडली. याप्रकरणी १२ जणांच्या विरोधात कडेगाव पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून, सात जणांना पोलिसांनी अटक केली आहे.किशोर गोरख मुळीक (२२) व मीनानाथ गोरख मुळीक (२४) अशी या भावांची नावे आहेत. किशोर याचे गावातीलच एका तरुणीशी प्रेमसंबंध होते. यासंदर्भात दोन्ही घरांतत्यांच्या लग्नाविषयी चर्चा सुरू होती. हे प्रकरण मिटविण्यासाठी संबंधित मुलीच्या वडिलांनी किशोरच वडील गोरख भानुदास मुळीक (५०) यांना घरी बोलाविले होते. यावेळी वडिलांसह किशोर व मोठा भाऊ मीनानाथ, आई आशा असे चौघेही तेथे गेले होते. त्यावेळी पुन्हा वाद होऊन या चौघांना तेथील १२ जणांनी लाथा-बुक्क्यांनी तसेच काठीने मारहाण करून गंभीर जखमी केले. त्यानंतर किशोर व मीनानाथ यांची धिंड काढली. चित्रफीत बनवल्याचा राग!मुलीच्या कुटुंबियांनी लग्नाला विरोध केल्याने किशोर चिडलेला होता. त्यातूनच त्याने मीनानाथ याच्या मदतीने प्रेयसीची चित्रफीत बनविली आणि गावातील काही मित्रांच्या मोबाईलवर पाठविली होती. ती चित्रफीत परिसरात अनेकांच्या मोबाईलवर फिरत असल्यामुळे मुलीच्या कुटुंबियांनी त्यांनी धिंडी काढल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये होती.
प्रेमप्रकरणातून दोघांची विवस्त्र धिंड
By admin | Published: December 24, 2014 2:22 AM