शशी करपे,
वसई- आठ महिन्यांपूर्वी वसईच्या कोळीवाडा परिसरातूनगाब झालेल्या फरजाना शेख यांच्या मुलीला गोरखपूर येथे पळवून नेल्याचे उजेडात आले असतानाच याच परिसरातून, नेमक्या त्याच काळात गायब झालेल्या आणखी दोन अल्पवयीन तरुणींची उत्तरप्रदेशातील वेगवेगळया ठिकाणांहून सुटका करण्यात आल्याने वसईत खळबळ उडाली. एका प्रकरणात आरोपीला अटक करण्यात आली असली तरी दोन अल्पवयीन मुलींच्या गायब होण्या मागील रहस्य उलगडण्याचे काम पोलीस करीत आहेत. यामागे अनैतिक मानवी व्यापार करणारी एखादी टोळी असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून पोलीस या प्रकरणात अतिशय गोपनीय तपास करीत असल्याने अधिक माहिती मिळणे कठीण झाले आहे. वसई कोळीवाड्यातील एका अल्पवयीन मुलीला फूस लावून तिला उत्तर प्रदेशच्या गोरखपूर शहरात पळवून नेणाऱ्या तरुणाला तब्बल आठ महिन्यांनी वसई पोलिसांनी अटक केली आहे. सोबत पोलिसांच्या तपास पथकाला याखेरीज उत्तरप्रदेशच्या विविध भागातून एकूण तीन मुलींचा शोध लागल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. तपास पथकाने तीन मुलीची सुटका केली असून त्यातील २१ नोव्हेंबर २०१५ च्या प्रकरणातील आरोपी सद्दाम अन्सारी विरुद्ध अपहरण आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करून अटक केलीआहे.वसई गावातील झेंडाबाजार येथे राहणाऱ्या एका सामान्य कुटुंबातील फरजाना शेख यांनी आपल्या १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला वसई कोळीवाड्यात काही दिवसांपूर्वी रहावयास आलेल्या आरोपी सद्दाम अन्सारी (२२) याने १९ आॅक्टोबर २०१५ रोजी फूस लावून पळवून नेल्याची तक्रार वसई पोलीस ठाण्यात केली होती. फरजाना हिने याप्रकरणी केलेल्या तक्रारीकडे पोलिसांनी दुर्लक्ष केल्याने हे प्रकरण गंभीर बनले होते. >फरजानांच्या प्रयत्नामुळे तिघींची सुटकावसई पोलिस ठाण्यात २०१५-२०१६ मध्ये फराजांना शेख यांच्या मुलीची मिसिंग तक्रार दाखल झाल्यानंतर पाठोपाठ दोन अल्पवयीन मुली गायब झाल्याच्या तक्रारी दाखल झाल्या होत्या. मात्र या तिघींचा शोध काही लागत नव्हता,अखेर फरजाना शेख च्या अथक प्रयत्नाने केवळ त्यांच्याच नाही तर इतर दोन मुलीही आठ महिन्यांनी पोलिसांच्या हाती लागल्या.एकंदर हा प्रकार अनैतिक मानवी वाहतुकीचा असून या सर्व मुली उत्तर प्रदेशाच्या गोरखपूर जिल्ह्यातील विविध गावामधून सापडल्यामुळे वसईच्या झेंडाबाजार,कोळीवाडा ते उत्तरप्रदेश ,गोरखपूर असा नेमका संबंध काय? याचा तपास वरिष्ठाकडून होणे गरजेचे आहे.>पोलिसांनी केले होते दुर्लक्षपोलिसांनी प्रेम प्रकरणातून मुलगी पळाली असल्याचे कारणपुढे करीत या गंभीर तक्रारीकडे दुर्लक्ष केल ेहोते. मात्र, मुलीची आई फरजाना शेख यांनी आपल्या अल्पवयीन मुलीच्या शोधासाठी वसई पोलिसांशी संघर्ष सुरुकेला, प्रसंगी पोलीस ठाण्याच्या पायऱ्यांवर धरणेही धरले होते.फरजाना शेख यांनी गृहराज्यमंत्री आणि शेवटी राज्याचे पोलीस महासंचालक यांच्याकडे धाव घेतली होती. त्यामुळे दबाव आल्यानंतर पोलिसांनी सद्दामला शोधण्यासाठी उत्तरप्रदेशात पथके रवाना केली होती. शेवटी त्याला अल्पवयीन मुलीसह गोरखपूर येथून ताब्यात घेण्यात आले होते.