राहुल वाडेकर,
विक्रमगड- पक्ष्यांचा किलबिलाट, पाण्याचा खळखळाट असे शांत व निसर्गसौदर्य लाभलेल्या विक्रमगडमधील मोस्ट पॉप्युलर पिकनिक पाईट म्हणजेच पलुचा धबधबा. नंतर विक्रमगडकरांची शान असलेला व बारमाही पाणी असलेला खांडचा बंधारा असून निसर्गाने भरभरुन दिलेल्या या भागात पावसाळयात मनसोक्त आनंद लुटणाऱ्यांचाही गर्दी असते.विक्रमगड तालुक्यातील निसर्गाने मुक्त उधळण करून येथील पर्यटकांना सर्व काही भरभरुन दिले आहे. त्यामुळै शनिवार व रविवार पलूचा धबधबा व खांडचा बंधारा येथे पर्यटकही येत असतात. व पाण्यामध्ये डुुंबण्याचा मनसोक्त आनंद लुटत असतात.पावसाळा सुरु झाला की,या नैसर्गीक सौदर्यात भर घालतात ते येथील पांढरेशुभ्र धबधबे. विक्रमगडपासून डोंगरावर जंगल आहे. हाच जंगलपटटा निसर्गमित्र यांच्यासाठी फार महत्वाचा आहे. विविध प्रजातीचे व रंगीबेरंगी पक्षीही येथे पाहावयास मिळत असल्यानें पक्षी निरिक्षकही या भागात येथे येत असतात. खांडचा बंधारा हा विक्रमगडपासून हाकेच्या अंतरावर वसलेला आहे. जून ते आॅक्टोंबर या काळात येथे पाण्यामध्ये डुंबण्याचा आनंद लुटण्याकरीता पर्यटकही येतात. दगड व चिखलवाट तुुडवतच येथे जावे लागते. या धबधब्यांवर पर्यटकांची गर्दी असते.मुंबई परिसर व अन्य ठिकाणाहून पर्यटक येथील निसर्गाचे अद्भूत रुप पाहावयास येतात. पक्ष्यांचा किलबिलाट,पाण्याचा खळखळाट असे निसर्गसंगीतच येथे पाहावयास मिळते. विविध प्रकारे कीटक, फुलपाखरु, वनस्पती, वनौषधी येथील महत्वाचे घटक आहेत. या भागाच्या डोंगरमाथ्यावरुन पाहाल तर जिथे तिथे हिरवाईचे साम्राज्य आणि त्यातून डोकावणारे छोटे छोटे धबधबे दिसतात. त्यामुळे विक्रमगडचा खांडचा बंधारा खास आकर्षण बनतोय.विक्रमगड पासून अवघ्या १ कि.मी अंतरावर खांड गावानजिक हे पे्रक्षणीय स्थळ आहे. हा बंधारा पावसाळयात कायम पर्यटकांनी भरलेला असतो. विक्रमगडमधील शाळा, कॉलजचे विदयार्थी सहलीसाठी येथे वर्षातून भेट देत असतात.>डुंबण्याची लुटता येते येथे भरपूर मौजविक्रमगड ग्रामपंचायत अंतर्गत याच बंधाऱ्यातून विक्रमगड शहर, यशवंतनगर, वाकडुचापाडा, टोपलेपाडा, संगमनगर आदी भागांना नळाद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. आतापर्यत या बंधाऱ्यामुळे पाण्याची मुबलक सोय झालेली आहे. या बांधारावर पाण्यामध्ये डुंबण्याचा आनंद लुटण्यासाठी वर्षभर गर्दी असते. छोटासा चौकोनी आकाराचा हौदासारखा भाग असून तो जास्त खोलगट नाही व त्यामध्ये पाणी भरुन राहात असल्याने त्यात डुंबण्याची मजा काही औरच आहे.