शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.६१ टक्के मतदान, अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क!
2
सदा सरवणकरांच्या कोटवर दिसला उलटा 'धनुष्यबाण'; मनसेच्या अमित ठाकरेंनी केला सरळ
3
IND vs SA 4th T20: भारताचा राग अंपायरवर काढायला गेला, ICC चांगलाच दणका दिला!
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
5
विषारी हवा, प्रदूषणामुळे परिस्थिती गंभीर; दिल्ली सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमचा निर्णय
6
"प्रत्येकीला ३००० द्यायचेत ना?" विनोद तावडे प्रकरणावरुन आस्ताद काळेची पोस्ट, म्हणाला- ED लागेल की बडतर्फी होईल?
7
A R Rahman Divorce: आईवडिलांच्या घटस्फोटावर तीनही मुलांची प्रतिक्रिया; म्हणाले, "याक्षणी..."
8
राज ठाकरेंच्या बनावट सहीचा वापर, मनसेकडून शिवसेनेविरोधात तक्रार; वरळीत काय घडलं?
9
Income Tax Rules: तुमच्या मुलांनी केली कमाई तर, कोण भरणार टॅक्स; काय म्हणतो इन्कम टॅक्सचा नियम?
10
भारताने कारविक्रीमध्ये अमेरिकेला टाकले मागे; नऊ महिन्यांत जगभरात विकल्या ६.५ कोटी चारचाकी
11
लॅपटॉप आयातीत कपात? देशात उत्पादन वाढविणार!
12
आता विमानातही सुसाट इंटरनेट, भारताने पाठवला उपग्रह; मस्क यांच्या रॉकेटमधून पोहोचला अंतराळात
13
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
14
कैलास-मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार? भारत-चीन परराष्ट्रमंत्र्यांत झाली चर्चा
15
अक्षय कुमारने विधानसभेसाठी पहिल्यांदाच केलं मतदान! भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर बजावलं कर्तव्य
16
Baramati Vidhan Sabha Election 2024: बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
17
गडचांदुरात भाजप उमेदवार देवराव भोंगळे यांच्याकडून ६१ लाखांची रक्कम जप्त
18
Maharashtra Election 2024: मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, तुम्ही व्होट केलं का?
19
२ दिवसांत ३५% नी आपटला Mamaearthचा शेअर; गुंतवणूकदारांवर डोक्याला हात लावण्याची वेळ, कारण काय?

अल्पवयीन मुलाला कार चालवू देणे पडले महाग

By admin | Published: August 21, 2016 2:14 AM

परवाना नसतानाही कार चालवणाऱ्या अल्पवयीन मुलाच्या वडिलांना उच्च न्यायालयाने ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला. गेल्या वर्षी या मुलाच्या हातून अपघात झाला होता. त्यात

मुंबई : परवाना नसतानाही कार चालवणाऱ्या अल्पवयीन मुलाच्या वडिलांना उच्च न्यायालयाने ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला. गेल्या वर्षी या मुलाच्या हातून अपघात झाला होता. त्यात कारच्या मागील सीटवर बसलेल्या त्याच्या मित्राला गंभीर दुखापत झाली होती. गेल्या वर्षी १४ नोव्हेंबर रोजी हा अपघात झाला होता. त्याची कार दुभाजकावर आदळून हा अपघात झाला होता. या प्रकरणी कार चालवणाऱ्या मुलावर वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला होता. मात्र, दोन्ही मुलांच्या पालकांनी सामंजस्याने मार्ग काढत एफआयआर रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली. ‘सामान्य परिस्थितीत आम्ही दंड न ठोठावताच एफआयआर रद्द करण्याचा आदेश दिला असता. मात्र ही केस अस्वस्थ करणारी आहे,’ असे उच्च न्यायालयाने म्हटले. ‘कारच्या मालकांनी म्हणजेच मुलाच्या वडिलांनी त्यांच्या अल्पवयीन मुलाला चारचाकी चालवण्याची परवानगी दिली. त्यामुळे प्रतिवादीच्या अल्पवयीन मुलाला गंभीर दुखापत झाली. सरकारी वकिलांनी व्यक्त केलेल्या भीतीशी आम्ही सहमत आहोत. या अशा प्रकारामुळे एखाद्या पादचाऱ्याचा किंवा अन्य वाहनाचा अपघात होऊ शकला असता. परंतु, सुदैवाने असे काही झाले नाही. पण समाजात संदेश जाणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे आम्ही मुलाच्या वडिलांना ५० हजार रुपये दंड ठोठवत आहोत. दंडाची रक्कम त्यांनी दोन आठवड्यांत मुंबईतील टाटा मेमोरियल रुग्णायल व कॅन्सर संशोधन संस्थेकडे जमा करावी,’ असा आदेश उच्च न्यायालयाने दिला. (प्रतिनिधी)