शहरं
Join us  
Trending Stories
1
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
2
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
3
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
4
मराठा आरक्षणासाठी पती- पत्नीने घेतले विषारी द्रव, प्रकृती चिंताजनक 
5
माझे काम पाहून धीरुभाई अन् टाटाही चकीत झाले; नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा...
6
साताऱ्यात काँग्रेसला हवा माण, वाई अन् कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ
7
छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल; पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणलं
8
परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट, प्रकृतीची केली विचारपूस
9
अक्षय शिंदेचा मृतदेह ठाण्यात दफन करण्यास मनसेचा विरोध, कळवा पोलिसांना दिलं पत्र
10
देशातील पहिली एअर ट्रेन दिल्लीत सुरू होणार; जगातील कोणत्या देशांमध्ये आहे 'ही' सुविधा?
11
मनोजराव कोणालाही भेटायचे नाही, तब्यतेची काळजी घ्या; संभाजीराजेंचा मनोज जरांगे यांना सल्ला
12
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पंतप्रधान मोदींनी फोन करून केले अभिनंदन
13
विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट किती जागा जिंकणार? NCP चा इंटरनल सर्व्हे सर्वांनाच चकित करणारा!
14
264 धावा नव्हे...; रोहित शर्माच्या नावावर याहूनही एक मोठा विक्रम! मोडणे एखाद्या स्वप्नासारखे
15
बक्षिसाची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करा, 'त्या' पोलिसांची मनसेला विनंती
16
चीनच्या नव्या अस्त्रामुळे जग चिंतेत, ही क्षेपणास्त्रंसुद्धा क्षणार्धात करू शकतात कुठलंही शहर नष्ट
17
"भाजपचे सरकार आल्यास PoK जम्मू-काश्मीरमध्ये सामील होईल", योगी आदित्यनाथ यांचे जनतेला आश्वासन
18
आता सीबीआयला तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
19
धक्कादायक! सासूचा रुग्णालयात मृत्यू; जावयाने मृतदेह घेऊन गाठली बँक, केली पैशांची मागणी...
20
"मोदी खूप शक्तिशाली आहेत, अमाप पैसा आहे, पण...", अरविंद केजरीवालांचा निशाणा

ज्येष्ठांच्या छळवणुकीला ‘मुलगा’,‘सून ’जबाबदार!

By admin | Published: June 15, 2016 2:43 AM

ज्येष्ठ नागरिकांच्या छळात दिवसेंदिवस वाढ होत असून या छळवणुकीला मुलगा आणि सून अधिक जबाबदार असल्याचे धक्कादायक सत्य हेल्पेज इंडियाच्या सर्वेक्षणातून उघडकीस आले आहे.

मुंबई : ज्येष्ठ नागरिकांच्या छळात दिवसेंदिवस वाढ होत असून या छळवणुकीला मुलगा आणि सून अधिक जबाबदार असल्याचे धक्कादायक सत्य हेल्पेज इंडियाच्या सर्वेक्षणातून उघडकीस आले आहे. जगभरात १५ जून हा दिवस जागतिक ज्येष्ठ नागरिक छळवणूक विरोधी दिन मानला जातो. या पार्श्वभूमीवर मंगळवारी हेल्पेज इंडिया संस्थेने ही माहिती पत्रकार परिषदेत दिली. या वेळी संस्थेचे अध्यक्ष प्रकाश बोरगावकर, अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. प्रताप दिघावकर आणि सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते मुंबई मराठी पत्रकार संघात ज्येष्ठांच्या अ‍ॅपचे अनावरण करण्यात आले. काहीच महिन्यांपूर्वी ज्येष्ठ महिलेवर सुनेकडून होणारा छळ कॅमेऱ्यात कैद झाला होता. प्रसारमाध्यमांनी या अत्याचाराला वाचा फोडल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांवर होणाऱ्या हिंसेच्या अनेक घटना समोर आल्या. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक अजूनही असुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले. शिवाय घरांमध्ये एकटे राहणारे ज्येष्ठ नागरिकही नाहक बळी पडत आहेत, अशी माहिती दिघावकर यांनी या वेळी दिली. या वेळी ज्येष्ठांचे प्रलंबित असलेले धोरण, मागण्या आणि समस्यांविषयी चर्चा झाली. राज्य शासनाने नुकतेच राज्यपातळीवर ज्येष्ठांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी समित्यांची स्थापना केली आहे. त्यामुळे आता ज्येष्ठांच्या समस्या सोडविण्यासाठी कृतिशील पाऊल उचलले जाण्याची आशा बोरगावकर यांनी व्यक्त केली.(प्रतिनिधी)हेल्पेज सर्वेक्षण, तरुणांची मते- ७३% तरुणांनी ज्येष्ठांवरील अत्याचाराची कबुली दिली आहे.- ७२.४% तरुण अर्वाच्च शिवीगाळ करून ज्येष्ठांना त्रास देतात. तर ४३.१% तरुण ज्येष्ठांकडे दुर्लक्ष करून त्यांची मानसिक छळवणूक करतात.- ३४.७ % तरुणांच्या मते सुनेकडून ज्येष्ठांना मानसिक त्रास दिला जातो. तर २३ % मुले ज्येष्ठांच्या छळवणुकीस कारणीभूत असतात. येत्या काही महिन्यांत सुनांच्या छळवणुकीमध्ये वाढ झाली असून ती ५०.२% इतकी झाली आहे. - ३१.५% तरुणांच्या मते ज्येष्ठांकडे पैसे नसतील तर ते मानसिक, शारीरिक त्रासाला बळी पडतात.- २९% तरुणांच्या मते पालकांना मारणे त्यांना शिवीगाळ करणे सर्वसामान्य आहे.- ५३.२% तरुणांच्या मते संपत्तीच्या वादावरून पालकांचा छळ होतो. तर ३५.७% तरुणांच्या मते नातेसंबंधातील अडचणीमुळे ज्येष्ठ नागरिकांना मानसिक त्रास दिला जातो.- सर्वेक्षणानुसार ज्येष्ठांची छळवणूक १८ ते ३४ वयोगटातील कुटुंबीयांकडून होते.हेल्पेज sos अ‍ॅप एका क्लिकवर तक्रारज्येष्ठ नागरिकांसाठी असलेले हे अ‍ॅप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध असून त्याद्वारे ज्येष्ठ नागरिक अडचणीच्या काळात मदत मागू शकतात. यातील मदतीच्या पर्यायावर क्लिक केल्यानंतर हेल्पेज इंडियाशी संलग्न अशा हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधून ज्येष्ठ नागरिक त्यांच्या समस्या कोणत्याही भाषांमध्ये मांडू शकतील. त्यांच्या शंकेचे निरसन करण्यात येईल. शिवाय त्यांच्यावर जर शारीरिक अत्याचार होत असतील तर तातडीने पोलिसांची मदत मिळण्याची सोयदेखील या अ‍ॅपद्वारे करण्यात आली आहे.ज्येष्ठ नागरिकांनी ही काळजी घ्यावी- घरात नव्या नोकराला ठेवताना त्याची इत्थंभूत माहिती घ्या. - अधिक सुरक्षेसाठी घरी काम करणाऱ्याचा फोटो आणि सही असलेले कागदपत्र जवळच्या पोलीस स्थानकात जमा करावेत.- एकट्या राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनी कोणत्याही अनोळखी इसमाला घरात घेऊ नये. - आर्थिक व्यवहाराची वाच्यता कोणाकडेही करू नये. - घरातील सदस्यांकडून ज्येष्ठ नागरिकाचा छळ होत असेल तर सामाजिक संस्था अथवा पोलीस स्थानकात तातडीने तक्रार करावी.