नीलेश शहाकार/ऑनलाइन लोकमतबुलडाणा, दि. 28 - अडखळत्या आयुष्यात एकमेकांसोबत संसार उभा करण्याची स्वप्न रंगविणाऱ्या प्रेमी युगलाला नेहमीच सगेसोयऱ्यांचा विरोध असतो. याच विरोधामुळे दिव्यांग असलेल्या प्रियकर व प्रियसीला एकमेकांपासून वेगळे व्हावे लागल्याची घटना येथे गुरूवारी घडली. जिल्ह्याच्या सिमा ओलांडून पुण्याहून बुलडाण्याला आलेल्या दोन्ही पायांनी अपंग तरुणीला प्रियकराच्या वडिलांच्या विरोधामुळे निराश होवून परत जावे लागले.बुलडाणा जिल्ह्यातील रहिवासी व सध्या पुण्यात कॉल सेंटरवर काम करणारा दोन्ही पायांनी अपंग प्रदिप(बदललेले नाव) या तरुणाचे प्रेम दोन्ही पायांनी अपंग असलेल्या पुण्यातील प्रेमलता(बदललेले नाव) हिच्याशी जुळले. लग्न करून आयुष्य सोबत घालविण्याच्या आणाभाका त्यांनी घेतल्या. मात्र, प्रकरणाची भनक लागताच तरूणाच्या वडिलांनी त्याला त्याच्या वडिलांनी गावीपरत बोलाविले. प्रदीप गावी परत आल्यावर त्याचा प्रेमलताशी संपर्क होईना.त्यामुळे प्रेमविरहात व्याकूळ झालेली प्रेमलता त्याचा शोध घेत त्याने दिलेल्या पत्यावर बुधवारी त्याच्या घरी पोहोचली.त्याच्या कुटुंबीयांना मात्र प्रेमलता- प्रदिपचे हे प्रेम मान्य नव्हते. मुलाच्या वडिलांनी दोघांच्या विवाहाला नकार दिला. तेवढ्यावर ते थांबले नाही तर, तीला मारहाण करून घराबाहेर काढले. जन्मजात अपंग असणारी प्रेमलता व दोन्ही पायाने अपंग प्रदिप या दिव्यांग पे्रमीयुगलांनी प्रेमाची परिभाषच बदलून टाकली खरी, मात्र प्रेमाला आंधळे म्हणाऱ्या निष्ठुर समाजाने त्यांच्या प्रेमाला अपंगही करुन सोडले. यातून तो दुखात बुडाला तर तिच्या वाटल्या आले सुधारगृह.मदतीला धावले दामिनी पथकएक अपंग तरुणी बुलडाणा बसस्थानिक २७ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास रडत असताना पोलिसांच्या दृष्टीस पडली. त्यामुळे सदर तरुणीच्या मदतीसाठी दामिनी पथकाला पाचारण करण्यात आले. यावेळी पथक प्रमुख सायरा शाह, आशा पवार, कविता मोरे, संगिता म्हसाळ, ज्योती जाधव यांनी तत्काळ बसस्थानिक गाठून सदर तरुणीची केली असता संपूर्ण प्रकार समोर आला. त्यानंतर तिला सुधारगृहात पाठविण्यात आले. सदर अपंग तरुणी पुण्यातील असून ती प्रियकराच्या शोधात बुलडाण्यात आली होती. या दरम्यान तीला बऱ्याच अडचणीला तोंड द्यावे लागल्याची भावना तीने स्वत: पथकाजवळ व्यक्त केली. तीच्या सुरक्षेसाठी रात्रभर सुधारगृहात ठेवून आज सकाळी तीला पुण्याला रवाना करण्यात आले.- सायरा शाह, दामिनी पथकप्रमुखपोलीस स्टेशन, बुलडाणा
दिव्यांग प्रेमी युगुलाच्या प्रेमात कुटुंबीयांचा अडसर
By admin | Published: September 28, 2016 5:06 PM