पश्चिम महाराष्ट्रातील पहिली न्यूरो कॅथलॅब, न्यूरो नेव्हिगेशन आणि क्युसा अशा जागतिक दर्जाच्या अद्ययावत तंत्रज्ञानयुक्त सुविधांमुळे मेंदू आणि मणक्यांच्या शस्त्रक्रियेचे हुकमी डेस्टिनेशन म्हणून वेस्टर्न इंडिया इन्स्टिट्यूट आॅफ न्यूरोसायन्सेस (विन्स) चा देशभरात लौकिक आहे़ पश्चिम महाराष्ट्रातील मेडिकल टुरिझममधले अग्रगण्य सेंटर म्हणून ‘विन्स’ला ओळखले जाते़ कोल्हापुरात न्यूरो सर्जरी क्षेत्रातील तज्ज्ञांची परिषद झाली़ या परिषदेतील सगळ्यांच्या कुतुहलाचा विषय ठरलेले प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ़ संतोष प्रभू यांच्याशी ‘लोकमत’ने साधलेला हा संवाद़़प्रश्न : न्यूरो सर्जरी क्षेत्राबद्दल थोडेसे ?उत्तर : न्यूरो सर्जरी म्हणजे मेंदूच्या विविध विकारासंबंधीच्या शस्त्रक्रिया़ त्यामध्ये मेंदूमध्ये वा मेंदूच्या आजूबाजूच्या ठिकाणी असलेले ट्यूमर, मेंदूतील रक्तवाहिन्यांवर तयार झालेले बलून्स शस्त्रक्रियेद्वारा काढून टाकणे, अपघातात इजा झालेल्या मेंदूवरील शस्त्रक्रिया आदींचा समावेश आहे़ गेल्या तेवीस वर्षात मेंदुविकारासंबंधीच्या २० हजार शस्त्रक्रिया केल्या आहेत. परदेशी रूग्णांवरही विन्समध्ये शस्त्रक्रिया केल्या आहेत.प्रश्न : मेंदूच्या शस्त्रक्रियेदरम्यान मृत्यूदराच्या प्रमाणाबद्दल काय सांगाल? उत्तर : मेंदूच्या विकारांबाबत पूर्वी लोकांमध्ये जागृती नव्हती़ आता ही जागृती वाढली आहे़ दरवर्षी आम्ही सुमारे तीनशे बे्रन ट्युमर्स शस्त्रक्रियेद्वारा काढतो़ पूर्वी तंत्रज्ञानाचा अभाव असल्यामुळे मेंदूवरील शस्त्रक्रियेदरम्यान किंवा त्यानंतर होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण तीस ते पस्तीस टक्क्यांपर्यंत होते, आता मात्र हे प्रमाण अगदी १ टक्क्यांवर आले आहे़ आमच्याकडे असलेले न्यूरो नेव्हिगेश तंत्र जणू मेंदूचा जीपीएसच आहे़ या तंत्राने मेंदूच्या नेमक्या कोणत्या भागात ट्यूमर आहे, त्याचा अचूक शोध घेतला जातो़ त्यानंतर ट्रॅक्टोग्राफी तंत्रज्ञानाच्या मदतीने ट्यूमर असलेल्या भागापुरतीच शस्त्रक्रिया केली जाते, त्यामुळे मेंदूच्या इतर भागांना हानी पोहोचत नाही़ त्यामुळे पूर्वीच्या तुलनेत मेंदूवर शस्त्रक्रियेनंतर किंवा शस्त्रक्रियेदरम्यान होणाऱ्या मृत्यूदराचे प्रमाण नगण्य आहे़ प्रश्न : मेंदूविकार शस्त्रक्रियेतील प्रभू स्पेशालिटीचे रहस्य ?उत्तर : आम्ही आंतरराष्ट्रीय दर्जाचे तंत्रज्ञान वापरतो़ न्यूरो कॅथ लॅब, कॉम्प्युटर गाईडेड न्यूरो सर्जरी, क्युसा या तंत्रज्ञानाच्या मदतीने काम करणारी स्पेशल टीम ‘विन्स’कडे आहे़ न्युरोसर्जरीबरोबरच स्पायरल नेव्हिगेशन व एण्डोस्कोपीचा वापर करून मणक्यावरील सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्यात येतात. मणक्यांमधील ट्यूमर काढण्यासाठी क्युसा तंत्रज्ञानाची मदत घेतली जाते़ १९९१ पासूनचा या क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव आणि जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान ही आमची बलस्थाने आहेत़ मुंबई आणि पुण्याच्या तुलनेत आपल्याकडे कमी दरात शस्त्रक्रिया केल्या जातात़प्रश्न : गोरगरिबांना उपचारांसाठी सवलत योजना उपलब्ध आहे काय ? उत्तर : गोरगरिबांना उपचारादरम्यान येणाऱ्या खर्चाला मदत करण्यासाठी के. पी़ प्रभू ट्रस्टकडून हातभार लावला जातो़ याशिवाय विन्सचा राजीव गांधी जीवनदायी योजनेमध्ये समाविष्ट होत आहे़ याबाबतची प्रक्रिया सुरू आहे़ पुढील महिन्यापासून ‘विन्स’मध्ये राजीव गांधी जीवनदायी योजनेतंर्गत रुग्णांना उपचाराची सोय उपलब्ध होईल. प्रश्न : सहयोगी प्राध्यापक ते ख्यातनाम न्यूरोसर्जन या प्रवासातील टप्पे ?उत्तर : वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर मुंबईतील केईएममध्ये १९८७ ते १९९१ या कालावधीमध्ये ‘सहयोगी प्राध्यापक’ म्हणून काम केले़ यावेळी मेंदूच्या शस्त्रक्रियेसाठी केईएममध्ये कोल्हापूरहून येणाऱ्या रुग्णाच्या नातेवाईकांची राहण्याची-खाण्याची हेळसांड व्हायची़ उपचारासाठी येणारे लोक व्हरांड्यात झोपायचे़ त्यामुळे न्यूरो सर्जरीची सोय कोल्हापुरात व्हावी, यासाठी कोल्हापूरमध्ये १९९१ ला न्यूरो सर्जरी सेंटरची स्थापना केली तेव्हापासून वर्ल्ड क्लास न्यूरो सर्जन सेंटरपर्यंतचा हा प्रवास हा यशस्वीपणे सुरू आहे़ कोल्हापूरबरोबरच कनार्टक, गोवा, सोलापूर, नांदेड, जळगाव तसेच राजस्थान, गुजरात तसेच कॅनडा, इंग्लड, युएई येथूनही मेंदूच्या विकाराने ग्रस्त ‘विन्स’कडे धाव घेत घेतात़- संदीप खवळे थेटसंवाद
तंत्रज्ञानामुळे मेंदूची शस्त्रक्रिया झाली सुलभ
By admin | Published: February 25, 2015 10:10 PM