पुणे : चार्टर्ड अकाऊंटन्टची (सीए) परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सोमनाथ गिरम याची शासनाच्या ‘कमवा व शिका’ योजनेच्या ब्रॅण्ड अॅम्बॅसिडरपदी नियुक्ती करण्या संदर्भातील अध्यादेश नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी काढला जाईल. राज्यातील विद्यापीठांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांशी गिरम वर्षभर संवाद साधणार आहेत, असे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.चहा विकून सीएची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सोमनाथाच्या कामगिरीची व जिद्दीची दखल घेऊन तावडे यांनी शासनाच्या ‘कमवा व शिका’ योजनेच्या ब्रॅण्ड अॅम्बॅसिडरपदी त्याच्या नियुक्तीची घोषणा केली होती. परंतु अडीच महिन्यांनंतरही त्याची अंमलबजावणी झाली नव्हती.
ब्रँड अॅम्बेसेडरचा अध्यादेश आठवडाभरात
By admin | Published: April 19, 2016 4:17 AM