शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024:- घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
4
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
6
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
7
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
8
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
9
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
10
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
11
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
12
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
13
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
14
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
15
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
16
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
17
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
18
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
19
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
20
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण

दाखल्यांसाठी दलालांचा ‘सेतू’

By admin | Published: July 01, 2014 10:52 PM

सेतू केंद्रातून दुकानदारी !

बुलडाणा : सेवेतून समाधान, या मूळ उद्देशाने महाराष्ट्र शासनाचा उपक्रम म्हणून एकात्मिक नागरिक सुविधा केंद्र सेतू सुरु करण्यात आले आहेत. नागरिकांना विविध शासकीय प्रमाणपत्र वेळेवर मिळण्यासाठी सेतू सुरू असले तरी येथे मुख्य उद्देशालाच हरताळ फासली जात आहे. सेतुवर दलालांचा सुळसुळाट वाढल्याने सामान्य नागरिकांना प्रमाणपत्र मिळविण्याकरिता मनस्ताप सहन करावा लागत आहे. कुठलाही दाखला हवा असेल तर जादा पैसे मोजा व त्वरित दाखला घ्या, असाच अनुभव सर्वत्र आहे. आज ह्यलोकमतह्ण चमूने बुलडाणा, खामगाव व मेहकर या तीन महत्त्वाच्या शहरांमधील सेतू केंद्रांचे ह्यस्टिंग ऑपरेशनह्ण केले. यामध्ये सेतू केंद्रावरील दलालांचा सुळसुळाट चटकन नजरेत आला. दाखल्यांसाठी सेतू कार्यालयातील दलालांचा हात धरला म्हणजे तुमचे काम त्वरित होते, असे बिनदिक्कत सांगणारे अनेक नागरिक भेटले.या सेतू केंद्रावर जादा पैसे देणार्‍याचीच कामे होत असल्याने आधी त्यांची कामे व नंतर नियमानुसार करणार्‍यांची अशी परिस्थिती आहे. त्यामुळे सामान्य नागरिक येथे त्रस्त असून, त्याची तसदी घेण्यास कोणीही तयार नाही. तर या सर्व प्रकारावर कोणाचेही नियंत्रण नसल्याचे दिसून येते. त्यामुळे शासनाची कागदपत्रे देण्यासाठीची कालर्मयादा येथे नावालाच दिसून येते.जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, नॉन क्रिमीलेअर सर्टिफिकेट वय, अधिवास प्रमाणपत्र, डोंगरी विभागाचे प्रमाणपत्र, शेतकरी असल्याबद्दलचा दाखला, अस्वच्छ व्यवसाय प्रमाणपत्र, ड्रायव्हींग लायसन्स तसेच चालक-वाहकासाठी आवश्यक प्रमाणपत्र, तसेच सर्व प्रकारचे प्रतिज्ञालेख सेतूमधून मिळतात. सेतूमार्फत जातीचा दाखला व नॉन क्रिमीलेअरसाठी २0 रुपये तर इतर सर्व प्रमाणपत्रासाठी १५ रुपयांची पावती दिली जाते. ** सेतू केंद्रातून दुकानदारी !तहसिल कार्यालयातील सेतू केंद्र तसेच महसूल प्रशासनाच्या महा-ई-सेवा केंद्रावर सद्यस्थितीत उत्पन्नाचा, जातीचा, वय व आधिवासी दाखला काढण्यासाठी विद्यार्थ्यांसह पालकांची तोबा गर्दी होत आहे. परंतु या सेतू केंद्रांवर दाखल्यांसाठी मनमानी शुल्क वसूल केले जात आहेत. सेतू चालविणारे नागरिकांची लूट करत असून, सेतूकेंद्रातून त्यांनी दुकानदारी थाटल्याचे धक्कादायक वास्तव ह्यलोकमतह्णने केलेल्या स्टींग ऑपरेशनमध्ये समोर आले आहे. सध्या शाळा व महाविद्यालयात प्रवेश प्रक्रिया सुरू असून, त्यासाठी विद्यार्थ्यांना जातीचा दाखला, उत्पन्नचा दाखला, नॉन क्रिमिलेअर, डोमेसाईल आदी प्रमाणपत्रांची आवश्यकता असते. त्यामुळे ही कागदपत्रे मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांसह पालकांचा ओढा सेतू सुविधा तसेच महा- ई-सेवा केंद्रावर दिसुन येत आहे. त्याचबरोबर जातिचे प्रमाणपत्र, सातबारा उतारा, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र, आम आदमी विमा योजना, राजीव गांधी जिवनदायी आरोग्य योजना, जन्म नोंद, मृत्यू नोंद आदी प्रमाणपत्रांसाठी सेतू सुवधिा आणि महा- ई-सेवा केंद्रावर गर्दी आहे. विद्यार्थ्यांसह नागरिकांनाही या दस्ताऐवजाची अत्यंत गरज निर्माण झाली आहे. सेतू सुविधा आणि महा-ई-सेवा केंद्रावर विद्यार्थी व नागरिकांच्या गरजेचा गैरफायदाच घेतला जात आहे. प्रमाणपत्र किंवा दाखल्याची पावती कुठेच दिली जात नाही. तसेच उत्पन्नाचा दाखला अर्जंटसाठी ५0 ते १00 रुपये, शपथपत्रासाठी २0 रुपये, नियमानुसार १५ रुपयात मिळणारे नॉन क्रिमिलेअर साठी २२0 रुपये यासह इतर प्रमाणपत्रांचे मनमानी शुल्क आकारले जात आहेत. तर वाईंडरकडुन घेण्यात येणार्‍या शुल्कामध्येही चांगलीच तफावत आढळुन आली. काही ठिकाणी तर शपथपत्र आदी केसेसवरील तिकिट काढुन दलाला मार्फत विक्री होत असल्याचे वास्तव आहे.यावेळी लोकमत प्रतिनिधींनी सेतू केंद्रावरील विद्यार्थ्यांशी संवाद साधला असता, पैसे भरुनही कित्येक दिवस प्रमाणपत्र मिळत नसल्याचे सांगण्यात आले. ग्रामीण भागातून येणार्‍या विद्यार्थ्यांना पैसे सरकवुनही सेतू केंद्राच्या पायार्‍याच सद्यस्थितीत झिजवाव्या लागत आहेत. येथील सेतू केंद्रावर विद्यार्थ्यांसह महिला व वृद्धही ताटकळत बसत असल्याचे पाहावयाला मिळाले. परंतु इतरांपेक्षा अधिक पैसे सरकविणार्‍यांना दाखल्यासाठी जास्त आटापिटा करावा लागत नसल्याचे वास्तवही यानिमित्त समोर आले.** विद्यार्थ्यांची लूटबुलडाणा येथील सेतु केंद्रावर नेहमीच गर्दी असते. या गर्दीमध्ये दलालांची टोळी सक्रीय आहे. मी काम करून देतो असे सांगत पैसे दिले की कुठलाही दाखल त्वरीत मिळतो. बारावी व दहावी नंतरच्या इंजिनिअरींग, मेडीकल, विविध डिप्लोमा, पदवी आदी शाखेच्या प्रवेश प्रक्रीया सुरु झाल्या आहे. यासाठी उत्पन्नाचा दाखला, जातीचे दाखले, नॉन क्रिमिलेयर, रहिवासी दाखला, राष्ट्रीयत्वाचा दाखला आदी दाखल्यांची आवश्यता असते. यामुळे दाखल मिळविण्यासाठी पालक आणि विद्यार्थ्यांची मोठी गर्दी होती. शिवाय ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र, आम आदमी विमा योजना, राजीव गांधी जिवनदायी आरोग्य योजना साठी ज्येष्ठ नागरिकही रांगेत उभे होते.