शहरं
Join us  
Trending Stories
1
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
2
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
3
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
4
मराठा आरक्षणासाठी पती- पत्नीने घेतले विषारी द्रव, प्रकृती चिंताजनक 
5
माझे काम पाहून धीरुभाई अन् टाटाही चकीत झाले; नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा...
6
साताऱ्यात काँग्रेसला हवा माण, वाई अन् कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ
7
छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल; पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणलं
8
परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट, प्रकृतीची केली विचारपूस
9
अक्षय शिंदेचा मृतदेह ठाण्यात दफन करण्यास मनसेचा विरोध, कळवा पोलिसांना दिलं पत्र
10
देशातील पहिली एअर ट्रेन दिल्लीत सुरू होणार; जगातील कोणत्या देशांमध्ये आहे 'ही' सुविधा?
11
मनोजराव कोणालाही भेटायचे नाही, तब्यतेची काळजी घ्या; संभाजीराजेंचा मनोज जरांगे यांना सल्ला
12
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पंतप्रधान मोदींनी फोन करून केले अभिनंदन
13
विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट किती जागा जिंकणार? NCP चा इंटरनल सर्व्हे सर्वांनाच चकित करणारा!
14
264 धावा नव्हे...; रोहित शर्माच्या नावावर याहूनही एक मोठा विक्रम! मोडणे एखाद्या स्वप्नासारखे
15
बक्षिसाची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करा, 'त्या' पोलिसांची मनसेला विनंती
16
चीनच्या नव्या अस्त्रामुळे जग चिंतेत, ही क्षेपणास्त्रंसुद्धा क्षणार्धात करू शकतात कुठलंही शहर नष्ट
17
"भाजपचे सरकार आल्यास PoK जम्मू-काश्मीरमध्ये सामील होईल", योगी आदित्यनाथ यांचे जनतेला आश्वासन
18
आता सीबीआयला तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
19
धक्कादायक! सासूचा रुग्णालयात मृत्यू; जावयाने मृतदेह घेऊन गाठली बँक, केली पैशांची मागणी...
20
"मोदी खूप शक्तिशाली आहेत, अमाप पैसा आहे, पण...", अरविंद केजरीवालांचा निशाणा

ताशी १३0च्या वेगाला ‘ब्रेक’

By admin | Published: December 29, 2016 2:05 AM

मुंबई उपनगरीय लोकलचा प्रवास भविष्यात आणखी वेगवान व्हावा, यासाठी ताशी १३0च्या वेगाने लोकल चालविण्याचे ‘स्वप्न’ एमआरव्हीसीने (मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन)

मुंबई : मुंबई उपनगरीय लोकलचा प्रवास भविष्यात आणखी वेगवान व्हावा, यासाठी ताशी १३0च्या वेगाने लोकल चालविण्याचे ‘स्वप्न’ एमआरव्हीसीने (मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन) बाळगले होते. यासाठी सहा लोकल एमआरव्हीसीकडून मुंबईत दाखल केल्या जाणार होत्या, परंतु आरडीएसओच्या चाचणीत ‘नापास’ झाल्याने वेगवान लोकल दाखल करण्यासाठी सिमेन्स कंपनीशी असणारे कंत्राट एमआरव्हीसीने रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ताशी १३0च्या वेगाला ब्रेकच लागला आहे. एमआरव्हीसीकडून एमयूटीपी-१ अंतर्गत सिमेन्स कंपनीच्या लोकल गेल्या १० वर्षांत टप्प्याटप्प्यांत दाखल झाल्या. पश्चिमबरोबरच मध्य रेल्वेवरही लोकल दाखल झाल्यानंतर, त्या प्रवाशांच्या पसंतीस उतरल्या. त्याच वेळी एमयूटीपी-१ अंतर्गत ताशी १३0 किमी वेगाने धावणाऱ्या लोकल मुंबई उपनगरीय रेल्वेमार्गावर चालविण्याचा निर्णयही एमआरव्हीसीने घेतला. मात्र, एमयूटीपी-१मध्ये असलेले अन्य मोठे प्रकल्प पाहता, ताशी १३0 वेगाच्या लोकलचा प्रकल्प एमयूटीपी-२मध्ये समाविष्ट करण्यात आला. या लोकलसाठी सिमेन्स कंपनीशी १0८ बोगींचा (चाकांचा आकार) करार करण्यात आला. त्याची एकूण किंमत ही ६0 कोटी रुपये ठरवण्यात आली. प्रत्येक डब्यासाठी दोन बोगी, याप्रमाणे ५४ डब्यांसाठी या बोगी बसविण्याचे ठरवले. म्हणजेच नऊ डब्यांच्या सहा नव्या लोकल दाखल करण्याचे उद्दिष्ट एमआरव्हीसीने ठेवल, परंतु या लोकल दाखल करण्यापूर्वी त्यांना तांत्रिक चाचणी पास करणे आवश्यक होते. रेल्वेच्या आरडीएसओकडून (रिसर्च डिझाइन अँड स्टँडर्ड आॅर्गनायझेशन) करण्यात येणाऱ्या खडतर चाचणीतून पास झाल्यानंतरच, ताशी १३0 किमी वेगाचे स्वप्न पूर्ण होणार होते. मात्र, आरडीएसओकडून एका बोगीच्या घेण्यात आलेल्या चाचणीत सिमेन्स नापास झाली. त्यामुळे एमआरव्हीसीने सर्व १0८ बोगींचे असणारे कंत्राटच रद्द करण्याचा निर्णय घेतला. या बोगी डब्यांना जोडून नव्या लोकल चेन्नईतील रेल्वेच्या आयसीएफमध्ये बनविल्या जाणार होत्या. (प्रतिनिधी)चाचणीत लोकल नापासया संदर्भात एमआरव्हीसीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक प्रभात सहाय यांना विचारले असता, करार रद्द करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. १0८ बोगींचे हे कंत्राट होते, परंतु आरडीएसओच्या चाचणीत नापास झाल्याने कंत्राट रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.- बम्बार्डियर कंपनीच्या ७२ लोकल पश्चिम रेल्वेमार्गावर टप्प्याटप्प्यांत दाखल होत आहेत. या लोकलचा जास्तीत जास्त वेग ताशी ११0पर्यंत जाऊ शकतो.सध्या पश्चिम व मध्य रेल्वेवर धावणाऱ्या सिमेन्स कंपनीच्या लोकल या ताशी १00पर्यंत वेगाने धावू शकतात.भविष्यात मुंबईतील रेल्वे ट्रॅकचा वेग आणखी वाढल्यास या लोकलही तेवढ्याच वेगाने धावतील, याप्रमाणे त्याचे नियोजन करण्यात आले होते. ताशी १३0च्या वेगाने धावणाऱ्या लोकल आणून त्या जलद मार्गावर चालविण्याचे स्वप्न होते.पश्चिम व मध्य रेल्वेवर बारा डबा लोकल धावत आहेत. त्यामुळे नऊ डबा लोकल आणून नक्की कोणता फायदा साध्य होणार होता, असा सवालही उपस्थित होत आहे.