शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"अनेक राजे-महाराजे आले आणि गेले, पण…"; अजमेर शरीफसंदर्भात कोर्टाची नोटीस, PM मोदींवर भडकले ओवेसी
4
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
5
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
6
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
7
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
8
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
9
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
10
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
11
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
12
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
13
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
14
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
15
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
16
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
17
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
18
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
19
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
20
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज

नाफेडच्या तूर खरेदीला ‘ब्रेक’

By admin | Published: February 24, 2017 1:00 AM

खरेदी केलेली तूर साठवण्यासाठी गोदामेच नसल्याने जिल्ह्यात सुरू असलेल्या नाफेडच्या तूर खरेदीला ब्रेक

वाशिम : खरेदी केलेली तूर साठवण्यासाठी गोदामेच नसल्याने जिल्ह्यात सुरू असलेल्या नाफेडच्या तूर खरेदीला ब्रेक लागला आहे. पाचपैकी तीन केंद्रे बंद करण्यात आली असून, येत्या चार दिवसांत उर्वरित दोन केंद्रेही बंद होण्याच्या मार्गावर आले आहेत. जिल्ह्यातील तीन ठिकाणी नाफेडची खरेदी बंद झाल्यानंतर शेतकऱ्यांची पुन्हा पिळवणूक होत असून, कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हमीभावापेक्षा खूप कमी दराने तुरीची खरेदी होत असल्याचे दिसत आहे.यंदा जिल्ह्यात ६३ हजार हेक्टर क्षेत्रावर तुरीची पेरणी झाली. गतवर्षीपेक्षा १९ हजार हेक्टरनी तुरीचे क्षेत्र वाढले होते. त्यामुळे या पिकाच्या उत्पादनात थोडी वाढ झाली असल्याने बाजारात या शेतमालाची मोठी आवक होत आहे. दरम्यान, शासनाने जाहीर केलेल्या ५ हजार ५० रुपये प्रति क्विंटलच्या दरापेक्षा कमी दरात व्यापाऱ्यांकडून तुरीची खरेदी करण्यात येत असल्याने शेतकरी अडचणीत आले होते. अशात जिल्ह्यात पाच ठिकाणी राष्ट्रीय सहकारी कृषी पणन महामंडळाकडून (नाफेड) तुरीची हमीभावाने खरेदी सुरू करण्यात आली. त्यामुळे नाफेडकडे शेतकऱ्यांचा कल वाढला. जिल्ह्यात २२ फेब्रुवारीपर्यंत नाफेडकडून ७६ हजार क्विंटलहून अधिक तूर खरेदी करण्यात आली. त्यामध्ये नाफेडसाठी महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महामंडळाने (एमएससीएफ) वाशिम, अनसिंग, मालेगाव आणि कारंजात मिळून ५८ हजार ९०० क्विंटल तूर खरेदी केली, तर विदर्भ पणन महामंडळाने (व्हीसीएमएफ) मंगरुळपीर येथे १८ हजार क्ंिवटल तुरीची खरेदी केली आहे. (वाणिज्य प्रतिनिधी)