शहरं
Join us  
Trending Stories
1
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
2
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
3
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
4
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
5
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
6
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
7
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
8
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
9
TATA IPL Auction 2025 Live: डेव्हिड वॉर्नर पुन्हा अनसोल्ड; हैदराबादला २०१६ मध्ये बनवलं होतं चॅम्पियन
10
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
11
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
12
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
13
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
14
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
15
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
16
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
17
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
18
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
19
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम

महापालिकांमुळे रेल्वेला लागतोय ‘ब्रेक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 6:56 AM

शहरातील लाइफलाइन असलेली लोकल सध्या अवक्तशीरपणामुळे चर्चेत आहे. मध्य रेल्वेवरील ३५ लाखांहून अधिक प्रवाशांचा लेटमार्क लोकलच्या वेळापत्रकावर अवलंबून असतो.

- महेश चेमटेमुंबई : शहरातील लाइफलाइन असलेली लोकल सध्या अवक्तशीरपणामुळे चर्चेत आहे. मध्य रेल्वेवरील ३५ लाखांहून अधिक प्रवाशांचा लेटमार्क लोकलच्या वेळापत्रकावर अवलंबून असतो. सिग्नल यंत्रणेत बिघाडामुळे लोकल खोळंबतात तथापि महापालिकांच्या ढिल्या कारभारामुळे लोकलचे मोटरमन चिंतेत आहेत. रेल्वे फाटक बंद करण्यासाठी रेल्वे प्रशासनाच्या वतीने सर्व कामे पूर्ण झाली आहेत. पण संबंधित महापालिकांच्या वेळकाढूपणामुळे लोकलला ब्रेक लागत असल्याची माहिती समोर येत आहे.मुलुंड ते सीएसएमटी परिसरात फाटक नसल्यामुळे लोकलचा वेग जलद आणि सुरक्षित राखण्यात रेल्वे प्रशासनाला यश मिळाले आहे. हार्बर मार्गावर चुनाभट्टी येथे फाटक सुरू आहे. हे फाटक वाहनांसाठी जास्त काळ खुले राहिल्यास त्याचा परिणाम लोकल सेवांवर होतो. सद्य:स्थितीत चुनाभट्टी स्थानकातील फाटक बंद करण्यासाठी संबंधित यंत्रणा काम करत आहे. सिग्नल यंत्रणेत बिघाड, ओव्हरहेड वायर तुटणे, रेल्वे रुळाला तडा या प्रकारांमुळे लोकलचे वेळापत्रक विस्कळीत होते. तथापि उपनगरीय लोकल विस्कळीत झालेल्या आकडेवारींनुसार, ‘सरासरी १५ दिवसांतून एकदा सिग्नल यंत्रणेत बिघाड आणि ३० दिवसांतून एकदा तडा जाणे’ हे प्रकार घडतात, असे रेल्वेच्या अधिकाºयांनी खासगीत सांगितले. उलट ठाणे स्थानकातील पुढील फाटक उघडे असल्याने एक लोकल थांबली असता त्यामागील अन्य लोकल सेवांवर परिणाम होतो. गर्दीच्या वेळी दर चार मिनिटांनी लोकल धावते. एक लोकल फेरी खोळंबली अथवा विलंबाने धावली असता त्याचा परिणाम सर्व लोकलवर होऊन लोकलचे वेळापत्रक कोलमडते. दिवा स्थानकात दिवसातून ३० ते ४० वेळा फाटक उघडण्यात येते आणि बंद होते, तर ठाकुर्ली, टिटवाळा, शहाड, खारीगाव (कळवा) येथे प्रत्येकी १० ते १५ वेळा फाटकांची उघडझाप केली जाते. यामुळे दिवसभरातील सुमारे १०० फेºयांना लेटमार्क लागत असल्याची माहिती आली आहे.उपनगरीय लोकल मार्गांवर सद्य:स्थितीत शहाड, खारीगाव (कळवा), ठाकुर्ली, दिवा आणि टिटवाळा येथे रेल्वे फाटक सुरू आहे. हे फाटक बंद करण्यासाठी रेल्वेच्या अखत्यारीत असलेली सर्व कामे करण्यात आली. उर्वरित कामे पूर्ण करण्याची जबाबदारी ठाणे महानगरपालिका आणि कल्याण-डोंबिवली महानगरपालिका यांची आहे.मात्र या महापालिका रेल्वे फाटकांवरील आरओबीच्या (रोड ओव्हर ब्रिज) कामाबाबत वेळकाढूपणाचे धोरण स्वीकारत आहे. फाटक सुरू असल्यास लोकलसह एक्स्प्रेसला थांबावे लागते.च्सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळी फाटक उघडल्याने लोकलचे वेळापत्रक पूर्णत: कोलमडते. चार मिनिटांसाठीदेखील लोकल एका जागी राहिल्यास संपूर्ण लोकलसेवांवर लेटमार्क लागतो.शहाड - काम२०१४ साली पूर्णशहाड स्थानकातील फाटक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार रेल्वेने त्यांच्या अखत्यारीत असलेले काम २०१४ साली पूर्ण केले. उर्वरित जबाबदारी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेची आहे. मात्र अद्यापही या महापालिकेकडून या कामाला गती मिळालेली नाही.खारीगाव (कळवा)- मार्च २०१७ मध्ये पूर्णखारीगाव येथील फाटक बंद करण्यासाठी रेल्वेच्या हद्दीतील काम मार्च २०१७ मध्ये पूर्ण करण्यात आले आहे. उरलेले काम ठाणे महानगरपालिका पूर्ण करणार आहे. या कामाला सुरुवात केली आहे, असे ठामपाचे म्हणणे आहे. तथापि, सकाळी आणि संध्याकाळी फाटक पार करण्यासाठी गाड्यांची रांगच लागल्याचे दिसून येते.ठाकुर्ली - जानेवारी२०१८ पर्यंत फाटक बंद होणारठाकुर्ली स्थानकातील फाटक उघडे राहिल्याने लोकलसह एक्स्प्रेसलादेखील खोळंबून राहण्याची वेळ आली आहे. रेल्वे अखत्यारीत असलेले काम शेवटच्या टप्प्यात आले आहे. उर्वरित काम कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे आहे. सदर काम पूर्ण करण्यासाठी जानेवारी २०१८ ही डेडलाइन निश्चित करण्यात आली आहे.टिटवाळा - महापालिकेचा जमीन हस्तांतरणाचा वादटिटवाळा स्थानकातील रेल्वे फाटकाबाबत जमीन हस्तांतरणाचा वाद आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या अखत्यारीत असलेल्या जागेच्या वादामुळे फाटक बंद करण्याचा निर्णय लांबणीवर पडला आहे. दरम्यान, येथील रेल्वेच्या अखत्यारीत असलेली कामे पूर्ण झालेली आहेत.दिवा :दिवा स्थानकातील पुलाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. त्याला रेल-रोड क्रॉसिंगचीदेखील मंजुरी मिळाली आहे. सदर पुलाचे काम ठाणे महानगरपालिका करणार आहे. मात्र अद्यापही ठामपाकडून काम हाती घेण्यात आलेले नाही.दिवा :दिवा स्थानकातील पुलाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. त्याला रेल-रोड क्रॉसिंगचीदेखील मंजुरी मिळाली आहे. सदर पुलाचे काम ठाणे महानगरपालिका करणार आहे. मात्र अद्यापही ठामपाकडून काम हाती घेण्यात आलेले नाही.उपनगरीय लोकल विस्कळीत झालेल्या आकडेवारींनुसार, ‘सरासरी १५ दिवसांतून एकदा सिग्नल यंत्रणेत बिघाड आणि ३० दिवसांतून एकदा तडा जाणे’ हे प्रकार घडतात, असे रेल्वेच्या अधिकाºयांनी खासगीत सांगितले. मात्र रोजच्या विस्कळीतपणाला रेल्वे फाटक जबाबदार असल्याचे अधिकाºयांचे म्हणणे आहे.लोकल सेवा वेळेत सुरू राहावी आणि रेल्वे रुळावरीलअपघात रोखण्यासाठी रेल्वे फाटक बंद करण्याचानिर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला.त्यासाठी दिवसा आणि रात्रकालीन ब्लॉक घेत रेल्वेने त्यांच्या अखत्यारीत असलेली कामे पूर्ण केली. उर्वरितकामे संबंधित महापालिकांची आहेत.ही कामे पूर्ण न झाल्याने संबंधित फाटक बंद केल्यास नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल. यामुळे रेल्वे प्रशासनाला लोकल वेळापत्रकाप्रमाणे चालवणे जिकिरीचे होत आहे.

टॅग्स :Mumbai Localमुंबई लोकलcentral railwayमध्ये रेल्वे