शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांना मोठा दिलासा! 'ट्रम्पेट' चिन्हाचं 'तुतारी' हे मराठी भाषांतर रद्द, निवडणूक आयोगाचा निर्णय
2
Maharashtra Election: "आम्ही फोडणार नाही, पण करेक्ट कार्यक्रम करणार"; सतेज पाटलांचा इशारा
3
देवेंद्र फडणवीसांची स्पष्टोक्ती, मनसे महायुतीत येण्याचा सध्यातरी ‘स्कोप’ नाही
4
कसब्यात हिंदू महासंघाचा मनसे उमेदवाराला पाठिंबा; मतदारसंघात मतांचं गणित बदलणार?
5
जगभरात दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी, न्यूयॉर्कमधील एम्पायर स्टेट बिल्डिंग दिव्यांनी उजळून निघाली
6
सरवणकरांचं कौतुक, राज ठाकरे, बाळा नांदगावकरांवर टीका; ठाकरे गटाचे उमेदवार काय म्हणाले?
7
भाजपचे सर्वात ज्येष्ठ कार्यकर्ते भुलाई भाई यांचे निधन; वयाच्या 111 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
मराठीसाठी लढणाऱ्या पक्षाचे ६ नगरसेवक चोरताना महाराष्ट्रद्रोह नव्हता का?; मनसेचा थेट सवाल
9
मेगा लिलावाआधी प्रीतीच्या PBKS नं केली १०० कोटींपेक्षा अधिक बचत; कुणाच्या पर्समध्ये किती पैसा?
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'मनोज जरांगेंच्या रुपात भारताला गांधी, आंबेडकर, मौलाना आझाम मिळतील';सज्जाम नोमानी काय म्हणाले?
11
'आम्ही त्यांच्याविरोधात प्रचार करू', नवाब मलिकांच्या उमेदवारीवर आशिष शेलार स्पष्ट बोलले...
12
"विश्वासाने जबाबदारी, सत्ता दिली, पण त्यांच्याकडून दुर्दैवाने गैरफायदा घेतला गेला"
13
तिरुपती बालाजी मंदिरातील सर्व कर्मचारी हिंदू असावेत, नवनियुक्त TTD अध्यक्षांचे मोठे विधान
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेतील अपक्ष अर्ज मागे घेणार का? भाजपा नेते सम्राट महाडिक म्हणाले, ;माघारीचा निर्णय कार्यकर्त्यांशी..."
15
IPL मधील ४ कॅप्टन ज्यांना फ्रँचायझी संघानं दिला 'नारळ'
16
नव्या परिवर्तनाकडे चला..! मनोज जरांगे पाटलांचं मुस्लीम-मराठा-दलित समाजाला आवाहन
17
शरद पवार, काँग्रेसने उद्धव ठाकरेंना फसवले; बावनकुळेंनी करून दिली युतीच्या जागावाटपाची आठवण
18
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, कार समोरील वाहनाला धडकली; तीन जण जागीच ठार, तीन जखमी
19
IPL Retention List : अखेर घोषणा झाली! अनेकजण लिलावात; कोणी कोणाला केलं रिटेन? वाचा यादी, विराट मालामाल

राष्ट्रवादी भाजपसोबत जाण्याच्या शक्यतेला ब्रेक; अजित पवारांची भूमिका काय?

By यदू जोशी | Published: May 06, 2023 7:39 AM

ईडी व सीबीआय कारवाई टाळण्यासाठी खेळलेली चाल, ही ठरली वावडीच

मुंबई - शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर ज्या शक्यता व्यक्त केल्या जात होत्या त्या स्वत:च पदावर कायम राहण्याच्या त्यांच्या निर्णयाने संपुष्टात आल्या. तसेच राष्ट्रवादी भाजपसोबत जाण्याच्या शक्यतेलाही ब्रेक लागला. पवार कुटुंबातील काहीजण ईडी, सीबीआयच्या रडारवर आहेत. अनिल देशमुख तुरुंगात गेले होते, नवाब मलिक तुरुंगात आहेत, हसन मुश्रीफ यांच्यावर कधीही मोठी कारवाई होऊ शकते. तपास यंत्रणांच्या कचाट्यातून पक्षाला सोडवायचे असल्याने पवार हे नंतरच्या पिढीला भाजपसोबत जाणे सोपे व्हावे म्हणून पदावरून दूर झाले आहेत, असेही विश्लेषक सांगत होते. मात्र तेही पवार यांनी खोटे ठरविले. 

राजकीय पंडितांची अनेक भाकिते फोलशरद पवार राजीनामा मागे घेणार नाहीत. ते त्यांची कन्या खा. सुप्रिया सुळे यांना राष्ट्रीय अध्यक्षपदी बसवतील आणि राज्यात विरोधी पक्षनेते व त्यांचे पुतणे अजित पवार यांना सर्वाधिकार देतील, असे भाकीत केवळ माध्यमेच नव्हे तर अनेक राजकीय पक्षांचे नेतेही खासगीत वर्तवित होते. सुप्रिया सुळे, अजित पवार यांच्याकडे अनुक्रमे केंद्र व राज्याची धुरा सोपविली की ते दोघे भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतील व नव्या नेतृत्वाने निर्णय घेतला आहे, असे म्हणत शरद पवार कानावर हात ठेवतील, असा तर्कही राजकीय पंडित देत होते. पवार यांनी या सर्व शक्यतांना कात्रजचा घाट दाखवला आहे.

भाजपविरोधाची धार अधिक तीव्र करणार? १९७८ मध्ये पुलोदचा प्रयोग करताना जनसंघाला पवार यांनी मंत्रिमंडळात सामावून घेतले होते. हा अपवादवगळला तर पवार यांचे राजकारण हे भाजपविरोधीच राहिले आहे. आज भाजपसोबत जाण्याचा दबाव पक्षात असताना तसा निर्णय झालाच तर त्या निर्णय प्रक्रियेचा आपण भाग नव्हतो हे सांगण्यासाठी पवार यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचीही जोरदार चर्चा होती. मात्र, भाजपसोबत जाण्याचा आग्रह धरणाऱ्यांच्या दबावाला बळी न पडता पवार हे भाजपविरोधाची धार अधिक तीव्र करतील असेच आजच्या निर्णयावरून दिसते.

भाजपच्या प्रयत्नांना खीळ? राष्ट्रवादीमध्ये सुरू असलेल्या संघर्षातून भाजपसोबत जाण्याचा निर्णय होईल, अशी आशा लावून असलेल्यांचीही तूर्त निराशा झाली आहे.पुढील वर्षीच्या लोकसभा निवडणुकीत भाजप-शिंदे यांना राज्यातून किमान ४२ जागा निवडून आणायच्या आहेत.अजित पवारांच्या माध्यमातून राष्ट्रवादी हा नवा मित्रपक्ष जोडण्याचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रयत्न भाजपकडून केले जात होते. त्या प्रयत्नांनाही आता खीळ बसली आहे. 

अजित पवारांची भूमिका काय? पक्षातील सर्वच नेते शरद पवार यांनी राजीनामा मागे घ्यावा म्हणून आर्जव करत असताना एकटे अजित पवार हे नवीन अध्यक्ष पक्षाला मिळाले तर काय बिघडले, अशी भूमिका घेत होते. मात्र ही भूमिका मान्य झाली नाही, स्वत: शरद पवार यांनीही ती मान्य केली नाही. आता अजित पवार कुठली पाऊले उचलतात याबाबत उत्सुकता असेल.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस