शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

शहरातील विकासकामांना ब्रेक

By admin | Published: October 18, 2016 12:48 AM

राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी दुपारी नगर परिषदांच्या निवडणुकांची घोषणा करताना पहिल्यांदाच संपूर्ण जिल्ह्यासाठी आचारसंहिता लागू केली

पुणे : राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी दुपारी नगर परिषदांच्या निवडणुकांची घोषणा करताना पहिल्यांदाच संपूर्ण जिल्ह्यासाठी आचारसंहिता लागू केली आहे. त्यामुळे अचानकपणे महापालिकेच्या सर्व विकासकामांना मोठा ब्रेक बसला आहे. यापाठोपाठ विधान परिषदेची आचारसंहिता लागू होणार आहे, त्याचबरोबर डिसेंबरनंतर स्वेच्छा निधी खर्च करण्यावर बंधने टाकण्यात आली आहेत, त्यापाठोपाठ पालिका निवडणुकांची आचारसंहिता लागणार आहे. त्यामुळे आगामी काळात प्रस्तावित असलेली पालिकेची कोट्यवधी रुपयांची सर्व विकासकामे अडचणीत सापडली आहेत.नगरपालिकांची घोषणा करताना ज्या जिल्ह्यांमध्ये चारपेक्षा जास्त नगर परिषदांच्या निवडणुका होत आहेत, तिथे संपूर्ण जिल्ह्यासाठी आचारसंहिता लागू राहील, असे निवडणूक आयोगाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यामध्ये १० नगर परिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. मतमोजणी पूर्ण होईपर्यंत ही आचारसंहिता लागू राहणार आहे. पुणे जिल्ह्यातील नगर परिषदांसाठी १४ डिसेंबरला मतदान होऊन १५ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यासाठी १५ डिसेंबरपर्यंत आचारसंहिता लागू राहणार आहे.महापालिका प्रशासनाने आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. महापालिकेतील पदाधिकारी महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष यांच्याकडून रात्रीच शासकीय गाड्या प्रशासनाकडे परत करण्यात आल्या. त्याचबरोबर महापालिकेच्या वतीने आता कोणतेही उद्घाटन, भूमिपूजन, सत्कारसमारंभ आदी कार्यक्रम घेतले जाणार नसल्याचे नगरसचिव कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले. आचारसंहितेचा सर्वांत मोठा फटका विकासकामांना बसणार आहे. >आचारसंहितेच्या अचानक घोषणेने गोंधळमहापालिकेसाठी आचारसंहिता लागू होणार असल्याची कोणतीही कल्पना नसताना अचानक नगर परिषदा निवडणुकांसाठी महापालिकेलाही आचारसंहिता लागू करण्यात आल्याने मोठा गोंधळ उडाला. आचारसंहितेच्या घोषणेची अंमलबजावणी लगेच सुरू झाल्याने त्याचे पालन करण्यासाठी पालिकेच्या विविध विभागांमध्ये धावपळ उडाली. मात्र त्याची स्पष्ट नियमावली उपलब्ध न झाल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे फोन करून त्याबाबत विचारणा केली जात होती.>स्थायी समिती व मुख्यसभेला कोणत्याही विकासकामांना १५ डिसेंबरपर्यंत मंजुरी देता येणार नाही. त्याचबरोबर अंदाजपत्रकामध्ये प्रस्तावित असलेली तसेच वर्गीकरणाने निधी उपलब्ध करून देण्यात आलेल्या कोणत्याही विकासकामांची वर्कआॅर्डर आता काढता येणार नाही. केवळ ज्या कामांची वर्क आॅर्डर निघालेली आहे, तीच कामे यापुढे सुरू राहणार आहेत. नगर परिषदांच्या निवडणुकांपाठोपाठ विधान परिषदेची आचारसंहिता लागू होणार आहे. नगर परिषदांची आचारसंहिता १५ डिसेंबरपर्यंत आहे, त्यापाठोपाठ आता विधान परिषदेच्या निवडणुकांचा निकाल लागेपर्यंत ही आचारसंहिता कायम राहील. त्यानंतर काही दिवसांमध्येच महापालिकेची आचारसंहिता लागणार आहे. त्यामुळे अंदाजपत्रकामध्ये प्रस्तावित असलेल्या विकासकामांना मंजुरी घेऊन त्याची वर्कआॅर्डर घेण्यासाठी केवळ काही दिवसांचाच कालावधी हातामध्ये राहणार आहे.आचारसंहितेची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाकडून जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्याची अंमलबजावणी योग्यरीतीने होते आहे ना याची तपासणी करण्यासाठी पोलीस अधीक्षक, सीईओ, आयकर विभाग, बँकेचे अधिकारी यांच्या समितीकडून केली जाणार आहे.>सोमवारी सायंकाळचे उद्घाटनाचे ४ कार्यक्रम रद्दनिवडणूक आयोगाकडून आचारसंहितेची घोषणा झाल्याने महापालिकेच्या वतीने सोमवारी सायंकाळी आयोजित करण्यात आलेले वडगाव जलशुद्धीकरण केंद्राचे उद्घाटन, शिवाजीराजे भोसले कलामंदिर, सिंहगड विकास उद्यान, सुलोचना कुदळे जलतरण तलाव उद्घाटन आदी कार्यक्रम रद्द करण्यात आले. आचारसंहिता संपेपर्यंत (१५ डिसेंबर) कोणताही उद्घाटन व भूमिपूजनाचा कार्यक्रम घेता येणार नाही.>सर्व नगरसेवकांचा उर्वरित वॉर्डस्तरीय निधी लॅप्सनगर परिषदांच्या निवडणुकांसाठी लागू करण्यात आलेली आचारसंहिता १५ डिसेंबरपर्यंत असणार आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या नवीन आदेशानुसार महापालिका निवडणुकांपूर्वी ३ महिने अगोदरपासूनच खासदार, आमदार व नगरसेवक यांना त्यांचा स्वेच्छा निधी वापरता येणार नाही. त्यामुळे १५ डिसेंबरपासून पुन्हा नवीन आचारसंहिता लागू होईल. त्यामुळे सर्व नगरसेवकांचा उर्वरित वॉर्डस्तरीय निधी लॅप्स झाल्यात जमा आहे.