ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. ७ - पुणे महापालिकेच्या प्रभाग रचनेत प्रभागांची मोठ्या प्रमाणावर मोडतोड केल्याचा आरोप होत आहे. भाजपच्या आमदारांचा वरचष्मा ठेवण्यासाठी सलगता या मुख्य सूत्राला हरताळ फासला आहे. भाजपला फायदेशीर ठरेल अशी प्रभागांची मोडतोड करण्यात आली आहे.
पुणे महापालिका प्रभाग रचना आज जाहीर करण्यात आली. प्रभाग सलगताचे सूत्र धुडकवले. प्रभाग रचना केली की तुकडे केले, असा आरोप विरोधकांकडून होत आहे.
प्रभात 7 पाहिल्यास असे दिसते की गोखले नगरचा अर्धा भाग दुसऱ्या प्रभागात तर अगदी खडकीपर्यंतचा भाग यात जोडलेला आहे. दत्तवाडीला जनता वसाहत जोडली आहे. प्रत्यक्षात ते पर्वती जवळ आहे. नवी पेठ येथे पर्वती एरिया आहे. औंध व बोपोडीच्यामध्ये हायवे येत असतानाही त्यांचे एकत्रीकरण केले. आयोगाच्या सूचनेनुसार हे चुकीचे ठरते.
पुणे महानगरपालिका नविन प्रभाग पुढिलप्रमाणे :
१ कळस - धानोरी
२ फुलेनगर -नागपूर चाळ
३ विमाननगर - सोमनाथनगर
४ खराडी - चंदननगर
५ वडगावशेरी - कल्याणीनगर
६ येरवडा
७ पुणे विद्यापीठ - वाकडेवाडी
८ औंध – बोपोडी
९ बाणेर - बालेवाडी- पाषाण
१० बावधन –कोथरूड डेपो
११ रामबाग कॉलनी –शिवतीर्थ नगर
१२ मयूर कॉलनी – डहाणूकर कॉलनी
१३ एरंडवणा - हॅपी कॉलनी
१४ डेक्कन जिमखाना – मॉडेल कॉलनी
१५ शनिवार पेठ - सदाशिव पेठ
१६ कसबा पेठ – सोमवार पेठ
१७ रास्ता पेठ – रविवार पेठ
१८ खडकमाळ आळी – महात्मा फुले पेठ
१९ लोहियानगर - कासेवाडी
२० ताडीवाला रोड - ससून हॉस्पिटल
२१ कोरेगाव पार्क - घोरपडी
२२ मुंढवा – मगरपट्टा सिटी
२३ हडपसर गावठाण – सातववाडी
२४ रामटेकडी- सय्यदनगर
२५ वानवडी
२६ महमदवाडी – कौसर बाग
२७ कोंढवा खुर्द - मिठानगर
२८ सॅलीसबरी पार्क – महर्षी नगर
२९ नवी पेठ – पर्वती
३० जनता वसाहत – दत्तवाडी
३१ कर्वेनगर
३२ वारजे माळवाडी
३३ वडगाव धायरी- सन सिटी
३४ वडगाव बुद्रुक – हिंगणे खुर्द
३५ सहकार नगर – पद्मावती
३६ मार्केटयार्ड – लोअर इंदिरा नगर
३७ अप्पर सुपर इंदिरा नगर
३८ राजीव गांधी उद्यान – बालाजीनगर
३९ धनकवडी - आंबेगाव पठार
४० आंबेगाव दत्तनगर - कात्रज गावठाण
४१ कोंढवा बुद्रुक – येवलेवाडी