फेब्रुवारी मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या 12 वी परीक्षेचा निकाल उद्या लागणार आहे. याची घोषणा राज्य उच्च माध्यमिक शिक्षण विभागाने केली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या 12 वीच्या परीक्षेचा निकाल उद्या, 16 जुलै 2020 रोजी जाहीर होणार आहे. दुपारी 1 वाजता मंडळाच्या अधिकृत वेबसाईट्सवर हा निकाल विद्यार्थी-पालकांना पाहता येईल. याबाबतची अधिकृत माहिती नुकतीच देण्यात आली आहे. महाराष्ट्र बोर्डाच्या mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटवर बारावीचा निकाल पाहता येणार आहे. याबाबत नुकतीचं अधिकृत माहिती आता देण्यात आली आहे. कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने गेले अनेक दिवस १२वीच्या विद्यार्थ्यांचं लक्ष या निकालाकडे लागून राहिलं होतं. अखेर बोर्डाने आज निकालाचा दिवस जाहीर केला आहे.
निकालाच्या दुसर्या दिवसापासून परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यास विषयांमध्ये त्याने संपादित केलेल्या गुणांची पडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत, पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी विभागीय मंडळाकडे http://verification.mh-hsc.ac.in या मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करता येईल. त्याचप्रमाणे शाळा व ज्युनियर कॉलेजमध्येही अर्ज करता येणार आहे. गुणपडताळणीसाठी 17 ते 27 जुलैपर्यंत छायाप्रतीसाठी 17 जुलैपासून 5 ऑगस्टपर्यंत अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहेत.
उत्तरपत्रिकेचे मूल्यांकनासाठी उत्तरपत्रिकेची छायाप्रत मिळाल्यापासून पाच दिवसांत विहित नमून्यात शुल्क भरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक राहिल. तसेच परीक्षेस सर्व विषयांसह प्रविष्ट होऊन उत्तीर्ण होणार्या विद्यार्थ्यांसाठी लगतच्या दोनच संधी श्रेणी किंवा गुणसुधार योजनेंतर्गत उपलब्ध राहतील, अशी माहिती राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली.
या लिंकवर निकाल पाहता येईल...
www.maharesult.nic.inwww.hscresult.mkcl.orgwww.maharashtraeducation.com
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या इयत्ता 12 वीची परीक्षा आज (18 फेब्रुवारी) पासून सुरु होत (Maharashtra Board HSC Exam) आहे. मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळातून 15 लाख विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. 18 फेब्रुवारीपासून 18 मार्चपर्यंत बारावीची परीक्षा घेतली जाणार आहे. (HSC Result 2020 Maharashtra Board)
बारावीच्या परीक्षेसाठी 9 विभागीय मंडळातून एकूण 15 लाख 05 हजार 027 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यात 8 लाख 43 हजार 552 विद्यार्थी तर 6 लाख 61 हजार 325 विद्यार्थिनी आहेत. या परीक्षेसाठी विज्ञान शाखेतील 5 लाख 85 हजार 736 विद्यार्थी, कला शाखेतून 4 लाख 75 हजार 134 विद्यार्थी, वाणिज्य शाखेतून 3 लाख 86 हजार 784 विद्यार्थी परीक्षेला बसणार आहे. तर व्यावसायिक अभ्यासक्रमाचे 57 हजार 373 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. यंदा बारावीच्या परीक्षेसाठी 9 हजार 923 कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. तर संपूर्ण राज्यात 3 हजार 036 परीक्षा केंद्र आहेत.
अन्य महत्वाच्या बातम्या...
कुठेय लॉकडाऊन; कुठेय मंदी! भारतातल्या सर्वांत महागड्या फ्लॅटची खरेदी; किंमत पाहून हादरालआशेचा किरण! कोरोना लसीवर उद्या होऊ शकते 'पॉझिटिव्ह' घोषणा; पुण्याच्या सीरम इन्सिट्युटचाही मोठा वाटा
Reliance AGM 2020: कोरोना लसीवर नीता अंबानींची मोठी घोषणा; इतिहासात पहिल्यांदाच भाषण
गेहलोत यांची सचिन पायलटांवर वैयक्तीक टीका; काँग्रेस नेतृत्व झाले नाराज
...तर 2 अब्जांनी पृथ्वीवरील लोकसंख्या कमी होईल; कोरोना महामारीनंतर मोठा इशारा
...तेव्हा सुशांत कुठे होता? मोदी भेटीवरून भाजपा खासदाराचा बॉलिवूडकरांना सवाल
सोने स्वस्त झाले! झटपट जाणून घ्या आजचे दर
फ्लिपकार्टचा कोरोनाकाळात चौकार! 1.2 अब्ज डॉलरची गुंतवणूक; बाजारमुल्य $24.9 अब्जांवर
एकतर सैन्याची नोकरी सोडा किंवा फेसबुक; याचिकाकर्त्या लेफ्टनंट कर्नलला न्यायालयाने सुनावले
बापरे! लग्नासाठी व्हर्जिनीटीची गॅरंटी देतेय मॅट्रिमोनियल साईट Shadi.com; विचारताच माफी मागितली