Breaking: काँग्रेसचं ठरलं! उद्धव ठाकरेंना बिनविरोध निवडून देणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2020 07:09 PM2020-05-10T19:09:38+5:302020-05-10T19:50:26+5:30

Vidhan Parishad Election: ९ जागांसाठी १० उमेदवार घोषित केल्याने तिढा वाढला होता. यावर काँग्रेसने माघार घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध होणार आहे. 

Breaking: Congress decided! Legislative Assembly elections will be unopposed hrb | Breaking: काँग्रेसचं ठरलं! उद्धव ठाकरेंना बिनविरोध निवडून देणार

Breaking: काँग्रेसचं ठरलं! उद्धव ठाकरेंना बिनविरोध निवडून देणार

Next

मुंबई : विधान परिषदेच्या ९ जागांसाठी येत्या २१ मे रोजी निवडणूक होणार आहे. यामध्ये खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखिल ही निवडणूक लढणार आहेत. यामुळे ही निवडणूक शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेससाठी महत्वाची ठरणार आहे. या ९ जागांसाठी १० उमेदवार घोषित केल्याने तिढा वाढला होता. यावर काँग्रेसने माघार घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध होणार आहे. 


उद्या अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असून आज हा तिढा  सोडविण्यासाठी महाविकास आघाडीच्या तीन प्रमुख पक्षांमध्ये बैठक झाली. या बैठकीला शिवसेनेकडून संजय राऊत, एकनाथ शिंदे, अनिल परब, मिलिंद नार्वेकर हे उपस्थित होते. तर  राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार, जयंत पाटील आणि काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण उपस्थित होते. 


दरम्यान, बाळासाहेब थोरातांनी काँग्रेस एक उमेदवार मागे घेत असल्याचे सांगत महाविकास आघाडी पाचच उमेदवार देणार असल्याचे स्पष्ट केले. यामुळे ही निवडणूक बिनविरोध करण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार काँग्रेस दुसरा उमेदवार राज किशोर मोदी यांचा अर्ज मागे घेणार आहे. 

 

महत्वाच्या बातम्या...

लय भारी! विप्रोच्या दानशूर अझीम प्रेमजींनी पटकावला जगात तिसरा नंबर

एकच धून 6 जून! रायगडावर शिवराज्याभिषेक होणारच; छत्रपती संभाजीराजेंची घोषणा

Vidhan Parishad Election: ९ जागांसाठी १० उमेदवार; तिढा सोडवण्यासाठी महाविकास आघाडीची बैठक

Vidhan Parishad Election: ...तर शिवसेनेने एक जागा कमी लढवावी, भाजपाचा युतीधर्मावरून टोला

Vidhan Parishad Election: राष्ट्रवादीकडून 'या' नेत्यांना विधान परिषदेची उमेदवारी

पीओकेवरून तणाव; पाकिस्तानची एफ १६, मिराज लढाऊ विमाने घिरट्या घालू लागली

Web Title: Breaking: Congress decided! Legislative Assembly elections will be unopposed hrb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.