शहरं
Join us  
Trending Stories
1
वंचितने आपणच पाठिंबा दिलेल्या अपक्षाला दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
2
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
3
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
4
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
5
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
7
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
8
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
9
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
10
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
12
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
13
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
14
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
15
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
16
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
17
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
18
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
19
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
20
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान

Maharashtra SSC Result 2022 Live: दहावीच्या निकालात कोकण-कन्या सुस्साट...! राज्यात ९६.९४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2022 11:02 AM

Maharashtra SSC 10th Board Result today : राज्याचा इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाला असून यंदाही कोकण विभागानं निकालात बाजी मारली आहे. 

Maharashtra SSC MSBSHSE 10th result 2022 : राज्याचा इयत्ता १० वीचा निकाल जाहीर झाला असून दरवर्षी प्रमाणे यंदाची कोकण विभागानं बाजी मारली आहे. कोकण विभागातून सर्वाधिक  विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, तर नाशिक विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे. तर राज्याचा निकाल एकूण  ९६.९४ टक्के इतका लागला आहे. आज सकाळी ११ वाजता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने पत्रकार परिषद घेत दहावीच्या निकालाची सविस्तर माहिती दिली. आता दुपारी १ वाजता विद्यार्थ्यांना निकाल ऑनलाइन पद्धतीनं पाहता येणार आहे.

उत्तीर्ण मुलींचा ९७.९६ टक्के तर मुलांचा ९६.०६ टक्के निकाल लागला आहे. २४ विषयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. 

विभागानुसार लागलेले निकाल टक्केवारी...

पुणे: 96.96% नागपूर: 97% औरंगाबाद: 96.33% मुंबई: 96.94% कोल्हापूर: 98.50% अमरावती: 96.81 % नाशिक: 95.90% लातूर: 97.27%  कोकण: 99.27%

निकालाची ठळक वैशिष्ट्ये

या परीक्षेस राज्यातील पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून एकूण १५,८४,७९० नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १५,६८,९७७ विद्यार्थी प्रविष्ट झाले असून त्यापैकी १५,२१,००३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व उत्तीर्णतेची टक्केवारी ९६.९४ आहे.

या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळामधून एकूण ५४,१५९ पुनर्परिक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ५२.३५१ विद्यार्थी प्रविष्ट झाले असून त्यापैकी ४१,३९० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी ७९.०६ आहे.

सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्याथ्र्यांचा कोकण विभागाची उत्तीर्णतेची टक्केवारी ९९. २७ अशी सर्वाधिक असून सर्वात कमी उत्तीर्णतिची टक्केवारी नाशिक विभागाची ९५.९० अशी आहे. सर्व विभागीय मंडळातून नियमित मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९७.९६ असून मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९६.०६ आहे. म्हणजेच मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा १.९० ने जास्त आहे.

या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळामधून एकूण ८,१६९ दिव्यांग विद्याथ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ८,०२९ दिव्यांग विद्यार्थी प्रविष्ट झाले असून त्यापैकी ७,५७९ दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी ९४.४० आहे. एकूण २४ विषयांचा निकाल १००% टक्के लागला आहे.

राज्यातून नियमित उत्तीर्ण विद्याथ्यांपैकी ६,५०,७७९ विद्यार्थी प्राविण्यासह प्रथम श्रेणीत ५,७०,०२७ विद्यार्थी प्रथम श्रेणीत २.५८,०२७ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत, ४२.१७० विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

राज्यातील २२,९२१ माध्यमिक शाळांतून १६,३८,९६४ विद्याथ्र्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १२,२९० शाळांचा निकाल १००% लागला आहे. 

यंदा राज्यात ९ विभागीय मंडळांमार्फत १५ मार्च ते ४ एप्रिल दरम्यान दहावीची परीक्षा झाली. १६,३९,१७२ विद्यार्थी या परीक्षेसाठी राज्यभरातून बसले होते. विद्यार्थ्यांना विषयनिहाय गुण संकेतस्थळांवरून उपलब्ध होतील, निकालाची प्रत (प्रिंट) देखील घेता येईल. 

कुठे पाहता येईल निकाल?mahresult.nic.insscresult.mkcl.orgssc.mahresults.org.in 

पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे आवश्यक आहे. त्यानंतर पाच दिवसांत शुल्क जमा करून ऑनलाईन अर्ज करणे बंधनकारक आहे.

टॅग्स :SSC Resultदहावीचा निकालssc examदहावी