निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला नवे नाव दिले आहे. आज दुपारी चार वाजेपर्यंत शरद पवार गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह देण्यास सांगितले होते. यापुढे शरद पवार गटाला नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार असे ओळखले जाणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवारांना दिल्यानंतर निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला त्यांच्या पक्षाचे नाव देण्यास सांगितले होते. याची मुदत आज दुपारी ४ वाजता संपली होती. असून शरद पवार गटाने तीन नावांचा प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे दिला होता. यापैकीच एक नाव निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. तसेच राज्यसभा निवडणुकीपुरते हे नाव असल्याचेही आयोगाच्या आदेशात म्हटले गेले आहे.
नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी – शरद पवार, नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार आणि नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी – एस अशी तीन नावे शरद पवार गटाने दिली होती. शरद पवार वटवृक्ष चिन्हासाठी आग्रही होते. आता चिन्ह कोणते देतात हे देखील औत्युक्याचे ठरणार आहे.