मुंबई : विधान परिषदेच्या ९ जागांवर येत्या २१ मे रोजी निवडणूक होणार होती. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसहभाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या ९ जणांनी अर्ज भरला होता. आज या ९ जागांवर निवड करण्यात आली.
काँग्रेसने माघार घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली. महाविकास आघाडीनं ५, तर भाजपानं ४ जणांना उमेदवारी दिली. तसेच आज अन्य डमी उमेदवारांनी अर्ज माघारी घेतल्याने उद्धव ठाकरेंसह ९ जणांची आमदारकी घोषित करण्यात आली.
काँग्रेसचे राजेश राठोड, शिवसेनेचे उद्धव ठाकरे, नीलम गोऱ्हे, राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरी तर भाजपाचे रमेश कराड, गोपीचंद पडळकर, प्रवीण दटके आणि रणजीत सिंह मोहिते पाटील यांना विधान परिषदेचे सदस्यत्व जाहीर करण्यात आले आहे.
विधानसभा सदस्यांद्वारे निवडून द्यावयाच्या विधानपरिषदेच्या एकूण ९ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. त्यासाठी दाखल १४ उमेदवारांच्या नामनिर्देशनपत्रांपैकी एका उमेदवाराचे नामनिर्देशनपत्र अवैध ठरले होते. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा आजचा अखेरचा दिवस होता. १३ उमेदवारांपैकी डॉ. अजित माधवराव गोपछडे (भारतीय जनता पार्टी), संदीप सुरेश लेले (भारतीय जनता पार्टी), किरण जगन्नाथ पावसकर (राष्ट्रवादी), शिवाजीराव यशवंत गर्जे (राष्ट्रवादी) या चार उमेदवारांनी दि.१२ रोजी आपले नामनिर्देशनपत्र मागे घेतले.
महत्वाच्या बातम्या...
उद्धव ठाकरेंची संपत्ती किती? आज पहिल्यांदाच झाला खुलासा
Atmanirbhar Bharat Abhiyan देशात कुठेही रेशनचे धान्य मिळणार, कामगारांना भाडेकरारावर घरं देणार
अवघा देश भिकेला लावला; आता पाकिस्तानी सैन्याला दणक्यात पगारवाढ हवीय