नवी दिल्ली : अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परिक्षा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने हिरवा झेंडा दाखविला असून यूजीसीकडून गाइडलाइन्स जारी करण्यात आल्या आहेत. यानुसार येत्या सप्टेंबरच्या अखेरीस परीक्षा घेण्याचे आदेश विद्यापीठांना देण्यात आले आहेत.
केंद्रीय गृहमंत्रालयाने शिक्षण विभागाला पत्र पाठविले असून विद्यापीठांना अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यास अनुमती दिली आहे. तसेच उच्च शिक्षण संस्थाही परीक्षा घेऊ शकणार आहेत. मात्र, या परीक्षा युजीसीच्या गाइडलाइन्सनुसार घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. युजीसीही लवकरच परीक्षांसाठी नियमावली जाहीर करणार असल्याचे म्हटले होते. तसेच केंद्रीय आरोग्य खात्याच्या नियमांनुसार परीक्षा व्हाव्यात, असेही या पत्रामध्ये म्हटले आहे.
यानुसार यूजीसीकडून परीक्षासंदर्भात नव्या गाइडलाइन्स जारी करण्यात आल्या आहेत. विद्यापीठ आणि शैक्षणिक संस्थांसाठी सूचना करण्यात आली असून यामध्ये सप्टेंबर 2020 अखेरीस परीक्षा घेण्याचे म्हटले आहे. परीक्षेचे माध्यम ऑनलाईन किंवा ऑफलाईन असावे असेही सांगितले आहे. विद्यार्थ्यांच्या करिअरसाठी परीक्षा महत्त्वाच्या, असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे यामध्ये म्हटले आहे.
तसेच जे विद्यार्थी या परीक्षेला बसू शकणार नाहीत त्यांच्यासाठी विद्यापीठ विशेष परिक्षेचे आयोजन करेल, असेही मानव संसाधन विकास मंत्रालयाने म्हटले आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
देशाच्या राजकारणात लवकरच खळबळ; शरद पवारांच्या मातोश्रीभेटीनंतर राऊतांची मोठी घोषणा
ठाकरे सरकारला दणका! अंतिम वर्षाच्या परीक्षा होणार; केंद्रीय गृहमंत्रालयाचं शिक्षण विभागाला पत्र
गुड न्यूज! महाराष्ट्रातील नव्या कोरोनाग्रस्तांच्या संखेत मोठी घट
टाटा पुन्हा मदतीला धावले! मुंबई मनपाला १० कोटी, १०० व्हेंटीलेटर्स, २० रुग्णवाहिका
ठरलं! 8 जुलैपासून हॉटेल्स - लॉज उघडणार, पण...; महाराष्ट्र सरकारची मोठी घोषणा
एक दोन नाही! 11 अमेरिकी लढाऊ विमानांनी चोहोबाजुंनी घेरले; चिनी सैन्य पाहतच राहिले
गृहमंत्र्यांनी पोलीस बदल्यांची मुख्यमंत्र्यांना कल्पनाच दिली नसेल; देवेंद्र फडणवीसांना वेगळीच शंका
लढाईला तयार रहा! PUBG चा नवा मॅप येड लावणार; उद्या मोठी अपडेट मिळणार