अमरावती : राज्याच्या इतिहासात हा सर्वाधिक संकटाचा काळ असून विदर्भ, मराठवाड्यात मोठे जलसंकट उभे ठाकले आहे. पाणी अडविण्यासाठी ब्रीज कम बंधारा संकल्पना राबवून भविष्यातील अशा प्रकारच्या जलसंकटावर मात करणे शक्य आहे, असे प्रतिपादन केंद्रीय जलवाहतूक, नागरी रस्ते निर्माण मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी येथे केले.अमरावती येथील सायन्सस्कोर मैदानावर राज्य शासन आणि कृषी विकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कृषी प्रदर्शनी व कार्यशाळेच्या उद्घाटनाप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. या वेळी उद्घाटक म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपस्थित होते. परिवहन मंत्रीदिवाकर रावते, गृह राज्यमंत्री रणजीत पाटील, पालकमंत्री प्रवीण पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)पुणे जिल्ह्यात होणारे दूध उत्पादन हे संपूर्ण विदर्भातही होत नाही. दूध उत्पादनात विदर्भ का माघारला याला कोण जबाबदार, हा संशोधनाचा विषय आहे. मात्र दूध उत्पादनातून रोजगार मिळावा, यासाठी दिल्ली येथील मदर डेअरी विदर्भात ४०० कोटींचा प्रकल्प साकारणार आहे. त्याकरिता जमिनीचा करारही झाल्याचे गडकरी यांनी सांगितले.
‘ब्रीज कम बंधाऱ्या’ने जलसंकटावर मात शक्य
By admin | Published: April 11, 2016 3:11 AM