शहरं
Join us  
Trending Stories
1
"रावसाहेब दानवेंना मुख्यमंत्री करा", युवकाने रक्ताने लिहिले पंतप्रधानांना पत्र
2
महायुतीचे ठरले! अखेर ‘या’ तारखेवर शिक्कामोर्तब; पंतप्रधान मोदी शपथविधीला राहणार उपस्थित
3
काळजीवाहू CM एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीविषयी डॉक्टरांनी दिली महत्त्वाची अपडेट; म्हणाले...
4
काँग्रेसची कठोर भूमिका! बेशिस्त वर्तन खपवणार नाही, पक्ष प्रतिमा मलिन करणाऱ्यांवर कारवाई
5
"ज्यांना कुणाला वाटते, त्यांनी ईव्हीएम हॅक करून दाखवावे"; दानवेंचं जानकरांना खुलं आव्हान
6
“पक्षाने फक्त तिकीट दिले, सभा-सामग्री नाही, वाऱ्यावर सोडले”; काँग्रेस उमेदवाराचा आरोप
7
“काळजीवाहू CM संकल्पनाच नाही, राज्यात राष्ट्रपती राजवटीची स्थिती”; वकिलांचे कायद्यावर बोट!
8
“एकनाथ शिंदेंवर PM मोदी-अमित शाह यांचे भावाप्रमाणे प्रेम”; भाजपा नेत्याचे विधान चर्चेत
9
VIDEO: अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न; तरुणाला लोकांनी पकडून केली मारहाण
10
"...तर आम्ही आपल्या विरोधात उमेदवार देणार नाही"; दिल्ली CM आतिशी यांची भाजप नेत्याला अनोखी ऑफर
11
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रकृती बिघडली, दरे गावी बंगल्यावर डॉक्टरांची टीम दाखल 
12
'भाजपमध्ये नेतृत्वावरून संभ्रम, त्यामुळेच सत्तास्थापनेला विलंब'; अंबादास दानवेंचा मोठा दावा
13
'जय' हो..! पाक 'हायब्रिड मॉडेल'साठी 'कबूल'; आता कसं भारत म्हणेल तसं! पण ठेवल्या या २ अटी
14
"मुख्यमंत्री भाजपचाच, उरलेल्या दोन पक्षांना..."; अजित पवारांकडून मोठी घोषणा
15
ज्या EVM वर लोकसभा जिंकली, त्यावरच नीलेश लंकेंनी शंका घेतली; म्हणाले, “आता विधानसभेला...”
16
“मी स्वतः इंजिनिअर, मला सगळे माहिती आहे, EVM हॅक करता येते”; महादेव जानकर थेटच सांगितले
17
“EVM सेट केले जाते हे दाखवले होते, विश्वास ठेवला नाही, पण आता...”; शरद पवारांचा मोठा दावा
18
"बांगलादेशातील हिंदूंसाठी लवकरात लवकर..."; केंद्र सरकारला संघाचं मोठं आवाहन
19
"अमित शाह यांनी गुन्हा नाही तर केजरीवालांना..."; भाजपाच्या आरोपावर संजय सिंह यांचा पलटवार
20
IND vs PAK : युवीची कार्बन कॉपीच! Nikhil Kumar ची बॅट तळपली; तो आउट झाला अन् मॅच फिरली

कृषी विद्यापीठाचा लाचखोर लेखाधिकारी गजाआड

By admin | Published: May 07, 2016 1:25 AM

लेखापरीक्षणमधील त्रुटी टाळण्यासाठी घेतली लाच, अकोला व यवतमाळ एसीबीची कारवाई.

अकोला - डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या विद्यापीठ अभियंता कार्यालयातील लेखाधिकारी जयाजी माधवराव बागडे याला १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना शुक्रवारी रंगेहाथ अटक करण्यात आली. लेखापरीक्षणातील त्रुटी टाळण्यासाठी तसेच लेखापरीक्षण क्लीअर करून देण्याच्या नावाखाली बागडे याने १५ हजार रुपयांची लाच घेताच अकोला व यवतमाळ लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकार्‍यांनी त्याला रंगेहाथ अटक केली.डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या एका कार्यालयातील आर्थिक व्यवहाराचे लेखापरीक्षण करण्याची जबाबदारी विद्यापीठ अभियंता कार्यालयाचे लेखाधिकारी जयाजी माधवराव बागडे यांच्याकडे होती. त्यामुळे संबंधित कार्यालयाचे अधिकारी बागडे यांना भेटले असता, लेखाधिकारी बागडे याने लेखापरीक्षणातील त्रुटी टाळण्यासाठी आणि लेखापरीक्षण स्पष्ट व योग्य करून देण्यासाठी सदर अधिकार्‍याला १५ हजार रुपयांची लाच मागितली. सदर अधिकार्‍याला लाच द्यायची नसल्याने त्यांनी या प्रकरणाची तक्रार अकोला व यवतमाळ येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. यावरून शुक्रवारी दुपारी जयाजी बागडे याने १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताच सापळा रचून असलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी त्याला रंगेहाथ अटक केली. आरोपी जयाजी बागडे याच्याकडून १५ हजार रुपये हस्तगत करण्यात आले असून, त्याला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई अकोला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे प्रमुख उत्तमराव जाधव व यवतमाळ लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे अधिकारी व कर्मचार्‍यांनी केली.'पीकेव्ही'त प्रथमच अशी कारवाईडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील अधिकार्‍यावर अशा प्रकारची कारवाई प्रथमच असल्याची माहिती समोर आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या जाळयात अडकण्याची ही प्रथमच वेळ असल्याचे वृत्त असून, हे लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे मोठे यश आहे. यवतमाळ व अकोला या दोन ठिकाणच्या अधिकार्‍यांनी ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.एकाच दिवसात छडाजयाजी बागडे याने शुक्रवारीच १५ हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारकर्त्याने शुक्रवारी दुपारीच लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार केली. त्यानंतर दुपारी ४ वाजताच्या सुमारास लाचेची रक्कम स्वीकारण्याचे ठिकाण ठरताच सापळा रचून असलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकार्‍यांनी बागडे याला रंगेहाथ अटक केली.