गोरेगाव (जि़ गोंदिया) : तालुक्यातील मुंडीपार येथील एका व्यक्तीला दारुबंदीच्या गुन्ह्यासाठी पोलीस कोठडी घेण्याची धमकी देत पाच हजार रुपये घेताना साहाय्यक पोलीस निरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी दुपारी अटक केली. उमाकांत काशीराम सरोदे असे अटक केलेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. मुंडीपार येथील एका व्यक्तीविरुद्ध गोरेगाव येथे दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला होता. २३ डिसेंबर २०१४ रोजी तक्रारदार हे स्वत: पोलीस ठाण्यात हजर झाले होते़पोलीस कोठडी न मागता न्यायालयीन कोठडीसाठी १० हजार रुपयांची मागणी त्यांनी केली़ तडजोडीअंती ५ हजार रुपये देण्यात ठरले़ त्यानंतर त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली़ त्यानुसार एसीबीने सापळा रचून मंगळवारच्या दुपारी २.४५ वाजतादरम्यान एपीआय सरोदे याला रंगेहाथ पकडण्यात आले. (प्रतिनिधी)
लाचखोर पोलीस अधिकारी जेरबंद
By admin | Published: January 07, 2015 1:27 AM