अकोला : मयत झालेल्या ग्रामसेवकाच्या कुटुंबाला नवृत्ती वेतन त्वरित लागू करण्यासाठी गरजेचे असलेल्या नादेय प्रमाणपत्र देण्यासाठी ३ हजार रु पयांची लाच उपसरपंच पदावर कार्यरत सहकार्यामार्फत स्वीकारणार्या आकोट पंचायत समितीमधील विस्तार अधिकार्याला गुरुवारी दुपारी २.३0 वाजता सुमारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी अटक केली. पोलिसांनी या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल केला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक उत्तमराव जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, आकोट पंचायत समितीमध्ये रामकृष्ण वानखडे हे ग्रामसेवक पदावर कार्यरत होते. १८ जुलै २0१३ रोजी आकोट येथे त्यांचे अपघाती निधन झाले. त्यांचे कुटुंब नवृत्ती वेतन, उपदान, अर्जित रजेचे रोखीकरण, गटविमा योजना, भविष्य निर्वाह निधीचे पैसे मिळण्यासाठी त्यांची पत्नी रेखा वानखडे (३५) यांनी संबंधित कार्यालयामध्ये पत्रव्यवहार केला; परंतु त्यांना वर्षभर संबंधित कार्यालयाने प्रतिसादच दिला नसल्याने रेखा वानखडे यांनी जिल्हा परिषदेसमोर २४ मार्च २0१४ रोजी बेमुदत उ पोषणाचा इशारा दिला होता. जि.प. उपमुख्य कार्यकारी अधिकार्यांनी त्याची दखल घेत, त्यांना भविष्य निर्वाह निधी व उपदान ग्रॅच्युईटी दिली आणि कुटुंब नवृत्ती पेन्शन लागू करण्यासाठी आकोट पंचायत समितीचे गटविकास अधिकार्यांना आदेश दिले. गटविकास अधिकार्यांनी रेखा वानखडे यांचा प्रस्ताव विस्तार अधिकारी सुधाकर संभाजी लोथे यांच्याकडे पाठविला; परंतु सुधाकर लोथे याने विधवा महिलेस नवृत्ती वेतन नादेय प्रमाणपत्र देण्यासाठी ५ हजार रुपयांची लाच मागितली. त्यामुळे रेखा वानखडे यांनी सुरुवातीला ३ हजार रुपये व नंतर दोन हजार देण्याची तयारी दाखविल्याने, विस्तार अधिकारी लोथे याने तीन हजार रुपये वडाळी येथील फिरोज नामक इसमास देण्याचे सांगितले. फिरोजने ३ हजार रुपयांची लाच स्वीकारली. त्यानंतर उर्वरित दोन हजारांची लाच घेऊन ४ सप्टेंबर रोजी लोथे याने आकोट येथील क्वॉलिटी हॉटेल येथे बोलाविले. या ठिकाणी त्याने त्याचा सहकारी वडाळीचा उपसरपंच शोएबउद्दीन सैफुद्दीन याला पाठविले आणि त्याने दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताच दबा धरून बसलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी शोएबउद्दीनला अटक केली. नंतर पोलिसांनी विस्तार अधिकारी सुधाकर लोथे यालाही गजाआड केले. ही कारवाई पोलिस निरीक्षक मंगेश मोहोड यांनी केली.
मयत ग्रामसेवकाच्या पत्नीला नवृत्ती वेतन नादेय प्रमाणपत्रासाठी मागितली लाच
By admin | Published: September 05, 2014 1:37 AM