शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
4
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
5
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
6
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
7
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
8
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
9
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
11
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
12
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
13
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
14
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
15
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
16
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
17
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
18
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
19
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
20
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित

लाचखोर पोलिस उपनिरीक्षक, चार पोलिस कॉन्स्टेबल गजाआड

By admin | Published: July 06, 2014 7:39 PM

एसीबी अधिकार्‍यांनी एका पोलिस उपनिरीक्षकासह चार पोलिस कर्मचार्‍यांना गजाआड केले.

अकोला: राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वरील ट्राफिक पॉईंटवरून तीन ट्रक सोडण्यासाठी ३३00 रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) अधिकार्‍यांनी एका पोलिस उपनिरीक्षकासह चार पोलिस कर्मचार्‍यांना गजाआड केले. ही कारवाई शुक्रवारी दुपारी १२ वाजताच्या दरम्यान करण्यात आली. गुरुवारी रात्रीच्यावेळी राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वरून तीन ट्रक ओरिसा राज्यातील कटक येथून अहमदाबादकडे जात असताना, बाळापूरजवळील ट्राफिक पॉईंटवर महामार्ग पोलिसांनी अडविले. ट्रक सोडण्यासाठी एका ट्रकमागे ११00 रुपये असे तीन ट्रकसाठी ३३00 रुपयांची मागणी त्यांनी केली. पहिल्या ट्रकचालकाने आमचे आणखी दोन ट्रक येत आहेत. त्यांच्याकडून पैसे घ्या, असे पहिल्या ट्रकचालकाने सांगितले. त्यामुळे महामार्ग वाहतूक पोलिसांनी पहिला ट्रक सोडून दिला. त्यानंतर दोन ट्रक आले. त्यांना पैशांची मागणी करण्यात आली. ट्रकचालक व पोलिसांमध्ये ३३00 रुपये देण्याची तडजोडसुद्धा झाली; परंतु ट्रकमध्ये काही प्रवासी असल्याने महामार्ग पोलिसांनी कलम ६६/१९२ नुसार कारवाई करण्याची धमकी दिली आणि ही कारवाई टाळण्यासाठीसुद्धा पैशांची मागणी केली. अखेर ट्रकचालकांनी एसीबीकडे तक्रार नोंदविली. त्यानुसार एसीबीचे पोलिस उपअधीक्षक उत्तम जाधव, पोलिस निरीक्षक यू. ए. जाधव यांच्या मार्गदर्शनात सापळा रचण्यात आला; परंतु महामार्ग पोलिसांना संशय आल्याने त्यांनी पैसे घेतले नाहीत; परंतु पैशाची मागणी केल्याप्रकरणी महामार्ग वाहतूक विभागाचे पोलिस उपनिरीक्षक एस.टी. बावस्कर, पोलिस कॉन्स्टेबल सुमेरसिंह राजपूत, गजानन चांभारे, रफिक शेख आणि मोहन वानखडे या पाच जणांना अटक केली.** अशी केली कारवाईलाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार झाल्यानंतर एसीबीचे अधिकारी व कर्मचारी दोन ट्रकमध्ये प्रवासी म्हणून बसून गेले. बाळापूरजवळील ट्राफिक पॉईंटवर ट्रक अडविल्यानंतर महामार्गावर तैनात पीएसआय एस.टी. बावस्कर व त्यांच्या ४ कर्मचार्‍यांनी ट्रकचालकांना लाचेची मागणी केली. त्यानंतर ट्रकची पाहणी केली असता त्यांना ट्रकमध्ये काही प्रवासी दिसले. पोलिसांनी ट्रकमध्ये प्रवासी वाहतूक करण्यास प्रतिबंध असल्याने ट्रकचालकांवर कायदेशीर कारवाई करण्याची धमकी दिली आणि ही कारवाई टाळण्यासाठी पुन्हा लाचेची मागणी केली. अखेर प्रवासी बनलेले लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी व कर्मचारी ट्रकबाहेर आल्यावर पीएसआय बावस्कर व कर्मचार्‍यांची बोबडी वळली.