शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाला काय विचारावं हे पण उद्धव ठाकरेंना माहिती नाही"; राज ठाकरेंची बोचरी टीका
2
काँग्रेसची पाकिस्तानची भाषा, पीएम मोदींचा पुण्यातून हल्लाबोल; शरद पवारांवर एक शब्दही नाही
3
"माझा मुलगा हॉस्पिटलमध्ये असताना हा माणूस विकला गेला"; राज ठाकरे दिलीप लांडेंवर भडकले
4
अमित शाहांचा मुंबईकरांना शब्द; म्हणाले, "बांगलादेशी, रोहिग्यांना वेचून वेचून बाहेर काढणार"
5
"फूट पडली तर काँग्रेस तुमचं आरक्षण हिरावून घेईल..."; मोदींनी विरोधकांवर त्यांचाच डाव उलटवला!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'माझी बॅग तुझ्याकडेच देतो, घेऊन येत जा,मात्र त्यातील कपडे चोरू नको'; उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचले
7
"भाजपसाठी काश्मीर सत्तेपेक्षा प्रिय, उद्धव ठाकरेंनी सांगावं की..."; अमित शाहांचा मविआवर हल्लाबोल
8
महायुतीला किती जागा मिळतील? CM शिंदेंनी थेट आकडाच सांगितला; म्हणाले, “जनतेचा विश्वास...”
9
"जेव्हा-जेव्हा हिंदूंमध्ये फूट पडली, तेव्हा-तेव्हा देशाचा एक भाग वेगळा झाला"; 'बटेंगे तो कटेंगे'वर शेखावत थेटच बोलले
10
"मुख्यमंत्री केलं तर वरचढ होईल म्हणून अजित पवारांना पण...; भुजबळांचा शरद पवारांविषयी गौप्यस्फोट
11
भाजपच्या सभेत मिथुन चक्रवर्तींचे पाकिट चोरले; स्थानिक नेत्यांची चोराला अपील, व्हिडिओ व्हायरल
12
"५ वर्षापूर्वी अमित शाह, शरद पवार अन् गौतम अदानी..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
13
“उद्धव ठाकरेंच्या बॅगेत असे काय आहे? एवढी आगपाखड करायचे कारण काय?”; शिंदे गटाने डिवचले
14
"समजूत काढायला गेले अन् तिथेच बसले"; येवल्यात भुजबळांवर शरद पवारांचा हल्लाबोल
15
Shocking! एक कार शेकडोंच्या गर्दीत घुसली; 35 जणांचा मृत्यू, ४३ जखमी, ड्रायव्हर कोमात
16
डोनाल्ड ट्रम्प यांनी कुणाला बनवलं NSA? नाव जाणून पाकिस्तानलाही धढकी भरेल; भारतासाठी आहेत खास!
17
किरकोळ महागाई RBI च्या हाताबाहेर गेली; रेपो रेटमध्ये कपात होणे शक्य नाही?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्रिपदावरुन महाविकास आघाडीमध्ये वाद? उद्धव ठाकरेंनी एका शब्दात विषयच संपवला
19
महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी काँग्रेसचा 'मेगा प्लॅन'! पुढच्या ६ दिवसांत काय करणार? २ गोष्टींवर असेल सर्वधिक फोकस
20
“मविआ सत्तेत आल्यास शेतकरी कर्जमाफी, महिलांना खटाखट ३ हजार देऊ”; राहुल गांधींची गॅरंटी

लाचखोरीची लाट! कारवाईचा खान्देशभर तडाखा

By admin | Published: May 14, 2014 12:31 AM

शासकीय कामांसाठी लाच घेणार्‍या नायब तहसीलदार, वीज अभियंता, जलसंधारण खात्याच्या उपविभागीय अधिकार्‍यासह पाच खादाडांना आज लाचलुचपत प्रतिबंधात्मक खात्याच्या पथकांनी रंगेहाथ पकडले.

लाचखोरीची लाट! कारवाईचा खान्देशभर तडाखा

जळगाव/धुळे/तळोदा : शासकीय कामांसाठी लाच घेणार्‍या नायब तहसीलदार, वीज अभियंता, जलसंधारण खात्याच्या उपविभागीय अधिकार्‍यासह पाच खादाडांना आज लाचलुचपत प्रतिबंधात्मक खात्याच्या पथकांनी रंगेहाथ पकडले. वीज अभियंत्याला ‘शॉक’ सातपुड्याच्या दुुर्गम पाड्यांना वीजपुरवठा मिळावा या शिफारस पत्रासाठी २० हजार रुपयांची लाच स्वीकारणार्‍या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकार्‍यांनी रंगेहाथ पकडले. वीज वितरण कंपनीच्या तळोदा कार्यालयाचे कनिष्ठ अभियंता आशिष मनोहर गायकवाड व पिंपळखुंटा ता. अक्कलकुवा उपकेंद्राचे आॅपरेटर अजितसिंग कुबेरसिंग इंगळे अशी या लाचखोर आरोपींची नावे आहेत. गमण येथील जिल्हा परिषद सदस्य किरसिंग हुण्या वसावे यांनी वीज कंपनीकडे अर्ज केलेला आहे. कनिष्ठ अभियंता आशिष गायकवाड यांची शिफारस हवी होती. यासाठी गायकवाड यांनी, किरसिंग वसावे यांच्याकडे २० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. ही बाब वसावे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयास कळविली. सापळा रचल्यावर आॅपरेटर अजितसिंग याने लाच स्वीकारून कनिष्ठ अभियंता गायकवाड यांच्याकडे दिली. तेव्हा पथकाने दोघांना अटक केली. पोलीस उपअधीक्षक अनिल वडनेरे व सहकार्‍यांनी ही कारवाई केली. धुळ्यात दोघे सापडले रूदावली, ता.शिरपूरच्या नवीन शर्तीच्या कूळवहिवाटीच्या जमिनीची सौदा पावती व करारनामा करून खरेदी केली होती. या जमिनीच्या खरेदी विक्रीची परवानगी मिळण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात कूळवहिवाट शाखेत प्रस्ताव सादर केला होता. या शाखेचे नायब तहसीलदार सुभाष दीक्षित व अव्वल कारकून हिलाल सोनवणे यांनी परवानगी मिळवून देण्यासाठी तक्रारदाराकडे दीड लाखाची लाच मागितली. त्यांनी सरळ अ‍ॅन्टीकरप्शन विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी कूळवहिवाट शाखेत दीक्षित व सोनवणे यांना एक लाखाची लाच घेताना पथकाने पकडले. या दोन संशयितांची चौकशी करण्यात येत आहे. अडीच लाखांची रोकड जप्त दीक्षित यांच्या कार्यालयातील कपाटातून एक लाख ४२ हजार ६०० रूपयांची रोकड जप्त केली. जलसंधारण हादरले निंभोरा व धार ता.धरणगाव येथील बंधार्‍याच्या कामाचे बिल काढण्यासाठी ११ हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी लघुसिंचन (जलसंधारण) विभागाचे उपविभागीय अधिकारी सुरेश एकनाथ शिंपी यांना अटक केली.