पुणे : राज्य शासनातर्फे मेडिकल, अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून पुण्यातील अनेक विद्यार्थ्यांनी १८९ ते १९९ पर्यंत गुण मिळवले आहेत. परंतु, राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत पुण्यातील विद्यार्थ्यांचा सीईटीचा टक्का कमी असल्याचे दिसून येत आहे.राज्य समाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे मेडिकल व अभियांत्रिकी प्रवेशासाठी २०० गुणांची सीईटी परीक्षा घेण्यात आली. राज्यातील काही विद्यार्थ्यांनी २०० पैकी २०० गुण घेतले आहेत. पुण्यातील आर्मी पब्लिक स्कूलमधील सृष्टी पाटील हिने १९९ गुण मिळविले आहेत, तर फर्ग्युसन महाविद्यालयातील आयुष ढोका याने १९३ गुण मिळविले आहेत. त्याचप्रमाणे अभियांत्रिकी प्रवेशासाठी दिलेल्या सीईटी परीक्षेत पुण्याच्या श्रेया मेहता हिने १८९, अंकुर बोरसोडे याने १८८ आणि तन्मय पाटील याने १८७ गुण प्राप्त करून यश मिळविले आहे.विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षेत चांगले गुण मिळाले असले तरी जेईई अॅडव्हान्स परीक्षेच्या निकालानंतरच अभियांत्रिकी प्रवेशाला प्रवेश घेण्याबाबतचा निर्णय घेणार असल्याचे विद्यार्थी सांगत आहेत. जेईई अॅडव्हान्स परीक्षेचा निकाल येत्या १२ जून रोजी जाहीर होणार आहे. त्यात मिळणाऱ्या गुणांच्या आधारे आयआयटी किंवा इतर राष्ट्रीय संस्थांमध्ये प्रवेश विद्यार्थी प्रवेश घेणार आहेत. सातत्यपूर्ण अभ्यासामुळे यशपुण्यातील दक्षिण मुख्यालयाच्या आर्मी पब्लिक स्कूलमधील सृष्टी पाटील हिला ‘एमएचटी-सीईटी’मध्ये १९९ गुण मिळाले आहेत. तिला एमबीबीएसला प्रवेश घ्यायचा आहे. या यशाबद्दल बोलताना ती म्हणाली, ‘‘अभ्यासात सातत्य ठेवले. सीईटीचा स्वतंत्र अभ्यास केला नाही. बारावी अभ्यासाबरोबरच हा अभ्यास सुरू होता. खासगी क्लासेसही लावले होते. अकरावीमध्ये असल्यापासून डॉक्टर होण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
‘सीईटी’त पुण्याचे चमकदार यश
By admin | Published: June 02, 2016 12:50 AM