शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
2
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
3
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
4
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
5
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
6
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
7
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
8
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
9
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
10
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
11
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
12
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
13
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
14
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos
15
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
16
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
17
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
18
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
19
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
20
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य

दिग्गजांकडून ‘डीं’च्या आठवणींना उजाळा

By admin | Published: March 26, 2017 3:27 AM

लोकमान्य टिळकांपासून ते इंदिरा गांधीपर्यंतचा काळ पाहिलेले भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे

मुंबई: लोकमान्य टिळकांपासून ते इंदिरा गांधीपर्यंतचा काळ पाहिलेले भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांनी देशात कम्युनिझम आणला. संस्कृतचे अभ्यासक, साहित्याचे आस्वादक आणि कामगारांचे नेते असणारे डांगे कामगारांसाठी स्वत: रस्त्यावर उतरले, अशा आठवणींना राजकीय पक्षाच्या दिग्गजांनी ‘डीं’च्या आठवणींना उजाळा दिला. कॉ. श्रीपाद अमृत डांगे यांची कन्या रोझा देशपांडे आणि जावई बानी देशपांडे यांनी लिहिलेल्या ‘एस.ए. डांगे - एक इतिहास’ या पुस्तकाचे प्रकाशन दादरच्या योगी सभागृहात राष्ट्रवादी काँगे्रस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. या चरित्रग्रंथ प्रकाशन सोहळ््याचे अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, रोझा देशपांडे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, खासदार संजय राऊत, मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार, ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर उपस्थित होते. डांगे यांना भारताचा सर्वाेच्च पुरस्कार ‘भारतरत्न’ देऊन गौरविण्यात यावे, अशीही विनंती सोहळ्यात करण्यात आली. सोहळ््याचे अध्यक्ष सुशीलकुमार शिंदे म्हणाले, ‘आम्ही मार्क्स, लेनिन पाहिला नाही, पण डांगेच्या रूपाने आम्ही आपल्या देशात लेनिन पाहिला. ‘डी’ हे फक्त डाव्या विचारसरणीचे नव्हते, त्यांनी सगळ््या विचारसरणी आत्मसात केल्या होत्या. सर्व वाद (इजम) त्यांनी काळात होणाऱ्या बदलांनुसार वापरले. समाज बदल्यावर त्यांनी विचार बदलत सर्वांना सामावून घेतले. सुरुवातीच्या काळात ‘डीं’वर दगडफेक झाली, तरी दगडांना बदलायची शक्ती त्यांच्या विचारांमध्ये होती. त्यांचे विचार कधीच संपणार नाहीत, जोपर्यंत देशात गरीब माणूस आहे, तोपर्यंत त्यांचे विचार संपणार नाहीत. १९३६ ला फैजपूरच्या अधिवेशनात काँग्रेसचे सदस्य होण्यासाठी कॉ. डांगेनी प्रयत्न केले होते. त्यामुळे ते ‘काँग्रेसचे प्रॉडक्ट’ होते, असे म्हटले, तरी वावगे ठरणार नाही. ‘गांधी विरुद्ध लेनिन’ हे डांगेचे पुस्तक भाषांतर करून स्वत: लेनिनने वाचले होते.’ (प्रतिनिधी)उद्धव ठाकरे यांनी सांगितले, शिवसेना आणि कम्युनिस्ट यांच्या विचारांमध्ये मतभेद होते, पण ते भेद व्यक्तिगत पातळीवर कधीच आले नाहीत. शिवसेनेच्या अधिवेशन झाले, तेव्हा डांगे उपस्थित होते. आम्हाला नेहमीच डांगे थोर पुरुष आहेत, असे घरातल्यांनी मनावर बिंबवले होते. डांगे यांनी आपले विचार नेहमीच ठोसपणे मांडले. आताच्या पिढीने कोणाकडे पाहावे, असे व्यक्तिमत्त्व नाही आणि काय शिकावे, हे त्याहून कळत नाही. बाळासाहेबांचे प्रबोधनकार ठाकरे, आचार्य अत्रे आणि डांगे हे तीन गुरू होते. कुमार केतकर म्हणाले, अजूनही देशात, महाराष्ट्रात मोठ्या नेत्यांविषयी गैरसमज आहेत, हे नवीन नाही. लोकमान्य टिळकांच्या बाबतीतही तेच होते. डांगे यांच्यावर १९२९ रोजी राजद्रोह आणि कम्युनिस्टच्या आरोपाखाली तुरुंगात जावे लागले. त्या वेळी कोर्टाकडे मागणी करून त्यांनी कम्युनिस्ट विचारांचा खरा अभ्यास केला, तेव्हा कोणतेही साधन उपलब्ध नव्हते. तरीही त्या वेळी तुरुंगात त्यांनी पुस्तके वाचून अभ्यास केला आणि युक्तिवाद करताना मांडले.शरद पवार यांनी सांगितले, हे फक्त डांगेंचे चरित्र नसून, देशातील विशिष्ट कालावधीचे चित्र उभे करणारे आहे. डांगेच्या कम्युनिझमच्या विचाराला राष्ट्रवादाची किनार होती, असे सांगताना शरद पवार यांनी डांगेंची एक आठवण सांगितली. ‘वाचावे काय आणि वाचावे कसे’ या विषयावर डांगे यांचे भाषण होते. या वेळी एक तास ‘वाचावे कसे’ या विषयावर बोलले होते, हे भाषण मी आयुष्यभर विसरू शकणार नाही. टिळकांच्या ‘स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे’ या विचाराचा प्रभाव एका पिढीवर झाला, ही डांगेंची पिढी होती. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर डांगेंना संसदेमध्ये जाण्याची संधी मिळाली, सर्वोत्तम भाषणाच्या खंडात डांगे यांचेही भाषण समाविष्ट आहे. संघर्ष लोकांपर्यंत पोहोचवलाडांगे यांनी लोकमान्य टिळक ते इंदिरा गांधी असे एक शतक पाहिले. पितृऋण फेडायचे असल्यास प्रत्येक पुढाऱ्याच्या मुलींनी त्यांचे चरित्र लिहावे. त्यांनी केलेला संघर्ष, त्यांना काय करावे लागले, त्यांनी काय केले नाही, हे सर्वांपर्यंत पोहोचेल. एखादी मुलगी तिच्या वडिलांविषयी कधीच खोटे बोलणार नाही. त्यांनी १८ वर्षे तुरुंगात काढली, पण तिथेच ते अनेक भाषा शिकले, अशा आठवणींना डांगे यांच्या कन्या रोझा देशपांडे यांनी उजाळा दिला. आजकाल पुुढारी तुरुंगात जात नाहीत, पण कामगारांसाठी डांगे स्वत: तुरुंगात गेले होते. माझ्या पुस्तकाचे नाव ‘आयुष्य कसे जगावे’ असा आहे. मला कोणी हा प्रश्न विचारला असता, तर मी डांगेंसारखे जगावे, असा सांगितले असते. गेल्या काही वर्षांत पुस्तके विकत घेऊन वाचण्याचे प्रमाण कमी झाले आहे, असे मनोहर जोशी यांनी सांगितले. 1991 ला मुंबई विद्यापीठ डांगे ना डी. लीट देणार होते. त्या वेळी अभाविपच्या माध्यमातून आम्ही त्याला विरोध केला होता. त्याचे पापक्षालन म्हणून मरणोत्तर डी. लीट डांगे यांना दिलीच पाहिजे, असे पत्र मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री, विद्यापीठाचे कुलगुरू यांना दिल्याचे आशिष शेलार यांनी आज सांगितले.