ठाणे : महाड आणि पोलादपूर मार्गावरील सावित्री नदीवरील ब्रिटीशकालीन पूल वाहून गेल्यानंतर ठाणे महापालिकेनेदेखील येथील ठाणे आणि कळव्याला जोडणाऱ्या कळवा खाडीवर असलेल्या ब्रिटीशकालीन पूल पवई आयआयटीने तो दोन दिवसात पूर्णपणे बंद करावा, असे स्पष्ट केले होते. परंतु त्याची दखल पालिकेने १३ दिवसानंतर घेतली असून, अखेर आता हा पूल सर्वच वाहनांसाठी आणि पादचाऱ्यांसाठीदेखील कायमचा बंद करण्यात आला आहे. महाड येथील सावित्री नदीवरील ब्रिटीशकालीन पुल वाहून गेल्याने महाराष्ट्रातील सर्वच ब्रिटीशकालीन पुलांचे स्ट्रॅक्चरल आॅडीट करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. त्यानुसार ठाण्यातही ठाणे आणि कळव्याला जोडणारा सुमारे १५० वर्षापूर्वीचा ब्रिटीशकालीन पूल आहे. दगडांचा वापर करून हा पूल उभारण्यात आला आहे; परंतु तीन वर्षांपूर्वी या पुलाच्या बुरजाचे काही दगड निखळू लागल्याने हा पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला होता. त्यानंतर या पुलाला काहीशी डागडुजी करून हा पूल दुचाकी आणि तीनचाकी हलक्या वाहनांसाठी खुला करण्यात आला होता. परंतु पालिकेने पुन्हा २०१४ मध्ये केलेल्या एका सर्व्हेनंतर या पुलावरुन अवजड वाहने जाणे शक्य नसल्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले होते. दुचाकी आणि तीनचाकी वाहनांना येथून प्रवेश दिला जात होता. दरम्यान महाडच्या घटनेनंतर पालिकेने हा पुल ४ आॅगस्टपासून हलक्या वाहनांसाठी देखील बंद केला होता. परंतु येथे लावण्यात आलेले बॅरीकेट्सच्या मधून दुचाकींची वाहतूक सुरुच होती. पादचारी देखील आपला जीव मुठीत घेऊन येथून चालत होते. (प्रतिनिधी)>दुचाकी सोडाच पादचाऱ्यांसाठीही धोकादायकमागील महिन्यात आयआयटीचा अहवाल महापालिकेकडे आला होता. या अहवालानुसार येथून दुचाकी सोडाच पादचाऱ्यांसाठीही पूल धोकादायक असल्याचे नमूद केले होते. दोन दिवसात पूर्णपणे बंद करावा असेही सांगितले होते. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे वाहतूक वळवावी लागेल.
ब्रिटीशकालीन कळवा पूल वाहनांसाठी बंद!
By admin | Published: November 05, 2016 3:40 AM