मुंबई : भारतीय हवाई दलासाठी ब्रिटन हवेतून हवेत मार करणारी अत्याधुनिक क्षेपणास्त्रे पुरविणार असल्याचे ब्रिटनचे वित्तमंत्री जॉर्ज ऑसबोर्न यांनी सोमवारी येथे सांगितले. भारतात झालेल्या सत्तांतरानंतर नव्या सरकारशी व्यापक संपर्क प्रस्थापित करण्यासाठी परराराष्ट्रमंत्री विल्यम हेग व वित्तमंत्री ऑसबोर्न यांच्या नेतृत्वाखाली ब्रिटनचे आजवरचे सर्वात मोठे शिष्टमंडळ सध्या भारतात आले आहे. दौ:याच्या पहिल्या टप्प्यात दोन्ही ब्रिटिश मंत्र्यांनी भारताच्या आर्थिक राजधानीत विविध क्षेत्रंतील मान्यवराशी संवाद साधला.
त्यावेळी केलेल्या भाषणात ब्रिटनच्या वित्तमंत्र्यांनी सांगितले की, भारतीय हवाई दलास प्रगत क्षेपणास्त्रे पुरविण्यासाठी भारतीय संरक्षण मंत्रलय व ब्रिटनमधील एमबीडीए यांच्यात 25क् दशलक्ष पौंडांचा करार झाला आहे. यानुसार भारतीय हवाई दलातील जग्वार लढाऊ विमानांच्या ताफ्यासाठी ब्रिटन लघु पल्ल्याची हवेतून हवेत मारा करू शकणारी क्षेपणास्त्रे पुरविणार आहे. ही क्षेपणास्त्रे हवाई दलात ‘न्यू जनरेशन क्लोज कॉम्बॅट मिसाईल’ या नावाने दाखल होतील.
या करारामुळे ब्रिटनमध्ये 25क् नवे रोजगार निर्माण होतील, असे सांगून ऑसबोर्न म्हणाले की, हा करार भारत व ब्रिटन या दोघांच्या दृष्टीने लाभदायी आहे. यामुळे आपल्याकडे उपलब्ध असलेले अत्याधुनिक संरक्षणविषयक तंत्रज्ञान उपलब्ध करून देऊन भारतीय सेनादलांच्या आधुनिकीकरणास हातभार लावण्याची कटिबद्धता अधोरेखित झाली आहे.
परराष्ट्रमंत्री विल्यम हेग म्हणाले की, भारतीय जनतेने नव्या सरकारला बदल आणि सुधारणोसाठी जनादेश दिला असल्याने भारत आणि ब्रिटन यांच्यातील मैत्रीसंबंध अधिक घट्ट करण्यास नव्याने वाव मिळणार आहे. भारतातील नव्या सरकारसोबत बिरटन प्रामुख्याने ती क्षेत्रत अधिक घनिष्ट संबंध प्रस्थापित करू इच्छित असल्याचे सांगून हेग म्हणाले की, मंदीच्या गर्तेत अडकलेली अर्थव्यवस्था पुन्हा सुदृढ करण्याचा आम्हाला अनुभव आहे व सर्व भारतीयांच्या कल्याणासाठी मोदी सरकार हाती घेणार असलेल्या योजनांसाठी आमच्या अनुभावाचा फायदा होऊ शकेल. दुसरे असे की, विद्यार्थी, संशोधक, ज्ञान व कौशल्य यांची देवाणघेवाण उभयपक्षी लाभदायी असल्याने शैक्षणिक संबंध वाढविण्यावरही आमचा भर असेल. तिसरे म्हणजे, उभय देशांचे सामायिक हित व मूल्ये यांच्या वृद्धीसाठी आम्ही परराष्ट्र धोरणाच्या माध्यमातून भारताच्या अधिक जवळ येऊ इच्छितो. (प्रतिनिधी)
च्या करारामुळे ब्रिटनमध्ये 25क् नवे रोजगार निर्माण होतील, असे सांगून ऑसबोर्न म्हणाले की, हा करार भारत व ब्रिटन या दोघांच्या दृष्टीने लाभदायी आहे. यामुळे आपल्याकडे उपलब्ध असलेले अत्याधुनिक संरक्षणविषयक तंत्रज्ञान उपलब्ध करून देऊन भारतीय सेनादलांच्या आधुनिकीकरणास हातभार लावण्याची कटिबद्धता अधोरेखित झाली आहे.
च्मंदीच्या गर्तेत अडकलेली अर्थव्यवस्था पुन्हा सुदृढ करण्याचा आम्हाला अनुभव आहे विद्यार्थी, संशोधक, ज्ञान व कौशल्य यांची देवाणघेवाण उभयपक्षी लाभदायी असल्याने शैक्षणिक संबंध वाढविण्यावरही आमचा भर असेल. तिसरे म्हणजे, उभय देशांचे सामायिक हित व मूल्ये यांच्या वृद्धीसाठी आम्ही परराष्ट्र धोरणाच्या माध्यमातून भारताच्या अधिक जवळ येऊ इच्छितो.