शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेचं 'मिशन महाराष्ट्र'! राज ठाकरे आज मराठवाड्यात; त्यानंतर नाशिक, पुणे दौरा करणार
2
राष्ट्रवादी प्रवेशाची घोषणा करताच हर्षवर्धन पाटलांचा जुना व्हिडिओ व्हायरल, काय म्हटलंय?
3
अहमदनगर शहराचे नाव 'अहिल्यानगर'; जिल्ह्याचे नाव राहणार तेच; सरकारी आदेश जारी
4
Virat सह अनेक सेलिब्रिटींचे डीपफेक व्हिडीओ बनवून होतेय फसवणूक; बनावट गेमिंग अ‍ॅपद्वारे कोट्यवधींची लूट
5
संतापजनक! "पप्पा वाचवा..." ओरडत पळाल्या मुली; शाळेतून परतताना तरुणांनी काढली छेड
6
'तुम्ही मनी लॉड्रिंग, मानवी तस्करीत...", वैज्ञानिकाला एक व्हिडीओ कॉल अन् गमावले ७१ लाख
7
Jammu And Kashmir : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
8
IND vs NZ सामन्यात 'चिटिंग'? आर. अश्विननंही केली 'चॅटिंग', पण...
9
अमेठीत घडलं 'बदलापूर', आरोपी गंभीर जखमी! पोलिसाची रिव्हॉल्वर हिसकावताना घडली घटना
10
संपादकीय: अभिजात मराठी!
11
"दिवट्या आमदार..."; सुनील टिंगरेंवर शरद पवारांची टीका; अजितदादा म्हणाले, "बदनामीचा प्रयत्न..."
12
"शस्त्र सोडून गांधीवादी विचारानं काम करतोय..."; फुटिरतावादी यासीन मलिकचा कोर्टात दावा
13
शेवटच्या दिवशी अरबाजची 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री; धावत येऊन निक्कीला उचललं, बेडरुममध्ये घेऊन गेला अन्...; सदस्यही पाहतच राहिले
14
Pan Cardबद्दल तुम्हाला किती माहितीये? पॅन क्रमांकाचा अर्थ काय? एकात असतं तुमचं आडनाव
15
"खाऊन पिऊन बिल उधार ठेवून आले"; दावोस दौऱ्यात CM शिंदेंची १.५८ कोटींची थकबाकी, कंपनीची नोटीस
16
Taro Card: देवीची कृपा मिळवून देणारा चैतन्यमयी आठवडा; वाचा तुमचे साप्ताहिक टॅरो भविष्य!
17
अजित पवारांच्या भायखळा NCP तालुकाध्यक्षाची हत्या; मुंबईत रात्री घडला थरार 
18
दररोज घसतोय Ola Electricचा शेअर; ₹१०० च्या खाली आला भाव; काय करावं? एक्सपर्ट म्हणाले...
19
‘त्या’ ९ मंत्र्यांना पक्षात पुन्हा प्रवेश मिळणार नाही; शरद पवारांनी घेतला मोठा निर्णय : देशमुख
20
अबूझमाडच्या जंगलात ३० नक्षल्यांचा खात्मा; घातपाताचा डाव उधळून लावला

परळमध्ये गवसला ब्रिटिशकालीन दगड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2017 3:29 AM

पदपथ व रस्त्यांवरील अतिक्रमण हटवण्याची जोरदार मोहीम महापालिकेने हाती घेतली

मुंबई : पदपथ व रस्त्यांवरील अतिक्रमण हटवण्याची जोरदार मोहीम महापालिकेने हाती घेतली असून, या कारवाईत पालिकेच्या कर्मचाऱ्यांना मैलाचा दगड गवसला आहे. परळ येथील केईएम रुग्णालयामागे एस.एस. राव मार्गावरील पदपथांवर कारवाईदरम्यान ब्रिटिश काळातील या दगडाचा शुक्रवारी सकाळी शोध लागला आहे.बेकायदा बांधकामाला अभय दिल्याप्रकरणी एन विभागाच्या सहायक आयुक्तांना निलंबित करण्यात आले आहे. या कारवाईमुळे सर्व सहायक आयुक्तांचे धाबे दणाणले आहे. त्यामुळे मुंबईत सर्वत्र रस्त्यावरील अतिक्रमण, फेरीवाले, बेकायदा बांधकामांविरोधात जोरदार कारवाई सुरू आहे. अशीच कारवाई शुक्रवारी सकाळी परळ विभागात सुरू असताना पालिकेच्या कामगारांना मैलाचा दगड सापडला. त्यांनी तत्काळ अधिकाऱ्यांना सूचित केले. या दगडावर रोमन अंकात पाच लिहिण्यात आले आहे. तसेच ‘माइल्स’ असे लिहिले आहे. दोन ठिकाणांमधील अंतर दर्शविण्यासाठी रस्त्याच्या कडेला बसविलेल्या दगडाला ‘मैलाचा दगड’ असे म्हणतात. ब्रिटिश काळात असे दहाहून अधिक मैलाचे दगड कुलाबा ते दादर या शहरी भागात बसविण्यात आले होते. (प्रतिनिधी)ब्रिटिश काळातील हे दगड कालांतराने जमिनीखाली गाडले गेले. अतिक्रमणावर कारवाई सुरू असताना अनेकवेळा अशा दगडांचा शोध लागला आहे. असे सात ते आठ दगड असतील ज्यावर आता अतिक्रमणे उभी राहिली आहेत.