कोरेगाव भीमा : स्पेन येथील माद्रिद येथे संपन्न झालेल्या १९ ते २६ ऑगस्ट रोजी झालेल्या जागतिक युवा तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत धनुर्विद्या कंपाऊंड प्रकारात भारतीय संघात खेळलेल्या कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील तुषार संजय फडतरे याने भारताला कांस्य पदक मिळवुन दिल्याने देशासह महाराष्ट्राची मान उंचावली आहे. ग्रामीण भागात नवख्या असलेल्या धर्नुविद्या प्रकारात शेतकरी कुटुंबातील तुषार फडतरे याने मिळविलेल्या यशामुळे शहरी भागातील मुलांपुढे आदर्श उभा केला आहे. मुळचा कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील शेतकरी कुटूंबातील तुषार संजय फडतरे हा पिंपरी-चिंचवड येथील डी. वाय. पाटील महाविद्यालयात बी. कॉम दुस-या वर्षात शिकत असून गेली दोन वर्षे प्रशिक्षक प्रशांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली धनुर्विद्या कंपाऊंड प्रकाराचे प्रशिक्षण घेत आहे. मित्रांसोबत महाविद्यालयीन शिक्षण घेताना धर्नुविद्येची आवड निर्माण झाल्याने त्याने शिक्षणासोबतच धनुर्विद्या खेळातही करीयर करण्याचे ध्येय जोपासले होते. त्यासाठी तो पर्वती ते पिंपरी याठिकाणी रोज सकाळी ये-जा करित धर्नुविद्येचे प्रशिक्षण घेऊ लागला. तर कोरेगाव भीमा येथील विविध विकास सोसायटीचे अध्यक्ष असलेले वडील संजय फडतरे यांनीही तुषारची खेळाची आवड लक्षात घेवून त्यांस परदेशी बनावटीचे सुमारे अडीच लाख किंमतीचे धनुष्यबाण विकत घेवून दिले. त्यानुसार रोज सराव व महाविद्यालयीन शिक्षण असे दुहेरी कसरत सुरु झाली. या दरम्यान त्याने राज्य व राष्ट्रीय पातळीवरही यश मिळवले. तुषारची ही मेहनत लक्षात घेवून राष्ट्रीय खेळाडू असलेले प्रशिक्षक प्रशांत शिंदे यांनीही त्यास कसून सराव व तंत्रशुद्ध प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. नुकत्याचे स्पेनमध्ये माद्रिद येथे झालेल्या जागतिक युवा तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत तुषारने सांघिक कामगिरी करीत सुखबीर सिंग, संगमप्रीतसिंग बिस्ला या सहका?्यांसमवेत नेत्रदिपक कामगिरी करीत धनुर्विद्या कंपाऊंड प्रकारात कोलंबिया संघाचा पराभव करीत भारताला प्रथमच कांस्यपदक मिळवून दिले. या जागतिक स्पर्धेत २५ देशांनी सहभाग घेतला. ... पुढील स्पर्धांकडे लक्ष.... कंपाउंड या प्रकारात प्रथमच तुषार मुळे महाराष्ट्राला प्रथमच कांस्यपदकाचे यश मिळाले असून येणा?्या वर्षभरात होणा?्या सिनियर वर्ल्ड कप, एशियन चॅम्पियनशिप, वर्ल्ड युनिव्हर्सिटी, कॉमनवेल्थ गेम, एशियन गेम्स, यात त्याने प्रतिनिधित्व करावेभारतासाठी पदक मिळवून देशाचे नाव उज्वल करावे, अशी अपेक्षा प्रशिक्षक प्रशांत शिंदे यांनी व्यक्त केली आहे. मला देशासाठी खेळता आले नाही, मात्र माज्या विद्यार्थ्यांनी देशासाठी पहिल्याच प्रयत्नात खेळुन कास्य पदक मिळविल्याचा आनंद मोठा असुन यापुढे आॅलिम्पिकमध्येही यश मिळवण्यावर भर देण्यासाठी सातत्याने त्याचा सराव सुरु ठेवण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान या यशामुळे डि. वाय. पाटील विद्यालयाचे कुलपती डॉ .पी. डी. पाटील, विश्वस्त डॉ. स्मिता जाधव , फिजीओ थेरपीस्ट डॉ. वैभव पाटिल , यांच्यासह विविध मान्यवरांनी त्याचे अभिनंदन केले आहे. --------------------
तुषार फडतरेची आजवरची कामगीरी तुषार याने २०१५ साली सब ज्युनिअर राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्ण , शालेय राज्यस्तरीय स्पर्धेत ३ सुवर्ण , २०१६ साली शालेय राष्ट्रीय स्पर्धेत २ सीलव्हर , १ ब्रांझ , वरिष्ठ राज्यस्तरिय स्पर्धेत ३ सुवर्ण , १९ वषार्खालील राज्यस्तरिय धनुर्विद्या स्पर्धेत तीन सुवर्ण पदकांची कमाई करुन ८ व ९ नोव्हेंबर २०१६ रोजी जबलपुर (मध्यप्रदेश) येथे होणा-या शालेय राष्ट्रीय स्पर्धेत निवड होऊन सुवर्ण पदक , २०१६ -१७-१८ या सलग तीन वर्षात ज्युनिअर राज्यस्तरीय स्पर्धेत सलग तीन सुवर्ण पदक मिळविले त्यासह आंतर महाविद्यालय स्पर्धेत व विभागातही सुवर्ण पदक मिळविले आहे.
वसतीगृहात गेला अन धुनर्धर झाला पुण्यात शाहु कॅलेजला शिक्षणासाठी गेला वसतीगृहात रुम मिळाली नाही , त्याठिकाणी असलेल्या क्रिडासाठी राखीव रुममध्ये जागा मिळाली. तेथे असलेल्या सुशांत हंसनुर व सुरज अनपट या धर्नुधरांमुळे खेळाकडे आकृष्ट झाला अन तीन महिन्यातच मुंबई महापौर चषक स्पर्धेत सुवर्ण पदक प्रशिक्षक रणजीत चामले यांच्या मार्गदर्शनाखाली मिळवित यशाची सुरु झालेली घौडदौड आज जागतिक स्पर्धेत ब्रांझ मिळवीत यशस्वीपणे चालु ठेवली.