शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
2
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
3
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
4
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
5
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
6
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
7
Priyanka Gandhi : "महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
8
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
9
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
10
Sankashti Chaturthi 2024: संकष्टीने सुरु होणारा आठवडा बाराही राशींसाठी ठरणार लाभदायी!
11
'या' १८ जिल्ह्यांमध्ये आता हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत
12
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
13
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
14
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
16
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
17
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
18
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर
19
विशेष लेख: भारतीय कप्तान काय घरी बसून बाळाचं डायपर बदलणार?
20
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक घेणार १.२५ अब्ज डॉलर्सचं लोन, पाहा काय आहे प्लान?

भाऊ बीजेच्या दिवशी संपला एसटी संप!, दिवसभरात २४,५१२ फे-या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 6:56 AM

ऐन दिवाळीत सुरू झालेला एसटी कर्मचा-यांचा संप उच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर शुक्रवारी म्हणजेच ऐन भाऊबीजेच्या आदल्या रात्री मागे घेण्यात आला. त्यामुळे भाऊबीजेचा सण सर्वांनाच उत्साहात साजरा करता आला.

मुंबई : ऐन दिवाळीत सुरू झालेला एसटी कर्मचा-यांचा संप उच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर शुक्रवारी म्हणजेच ऐन भाऊबीजेच्या आदल्या रात्री मागे घेण्यात आला. त्यामुळे भाऊबीजेचा सण सर्वांनाच उत्साहात साजरा करता आला. शनिवारी राज्यभरातील सर्व आगारांतून २४ हजार ५१२ फे-या झाल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली. दिवाळीच्या दिवसांतच एसटीच्या फे-या रद्द झाल्याने प्रवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला. उच्च न्यायालयाने हा संप बेकायदा ठरवल्याने अखेर ९६ तासांनंतर शुक्रवारी मध्यरात्री संप मागे घेण्यात आला. भाऊबीजेला सकाळच्या सत्रातच ९० टक्के सेवा सुरू झाली. दुपारपर्यंत राज्यातील एसटी वाहतूक पूर्वपदावर आल्याची माहिती महामंडळाने दिली.राज्यभरात ७० लाख प्रवासी, १३,७०० मार्ग, १६,५०० बसेस इतके मोठे एसटीचे जाळे आहे. संप पुकारल्यामुळे गेले चार दिवस प्रवासी मुले, अपंग, रुग्ण, वृद्ध व्यक्तींचे हाल झाले असल्याचे हायकोर्ट म्हणाले.कर्मचाºयांवर काही प्रमाणात जरी अन्याय होत असला तरी समाजाला वेठीस धरून ते संप पुकारू शकत नाहीत. त्यांनी तक्रारींचे निवारण संबंधित यंत्रणेकडून करून घ्यावे. संघटना यंत्रणेकडे न्याय मागण्यास तयार नसल्याने व कायद्याचे उल्लंघन केल्याने हा संप बेकायदेशीरठरवत आहे, असे न्यायालयाने सांगितले.>संघटना सुप्रीम कोर्टात?न्यायालयाचा आदर राखत संप मागे घेण्यात आला आहे. संपकाळात कर्मचाºयांचे आर्थिक नुकसान होऊ नये, यासाठी महामंडळाला विनंती करणार आहोत. या काळात प्रवाशांना झालेल्या त्रासाबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करत आहोत, असे एसटी कामगार संघटनेचे सरचिटणीस हनुमंत ताटे यांनी सांगितले. याशिवाय उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देता येईल का? यासंदर्भात आम्ही कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेत आहोत. याबाबत सोमवारी निर्णय घेऊ.>महामंडळाचा आक्षेपकायद्यानुसार कामगार संघटनांनी संपाची नोटीससहा आठवडे आधी देणे बंधनकारक आहे. मात्र या संघटनांनी केवळ १४ दिवस आधी नोटीस दिली. एसटी ही लोकोपयोगी सेवा असल्याने अशा प्रकारे १४ दिवस आधी नोटीस देऊन संघटनांनी कायद्याचे उल्लंघन केले आहे.>उच्चस्तरीय समिती सदस्यअर्थ सचिव, परिवहन सचिव, परिवहन आयुक्त, उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक आणि एक वरिष्ठ अधिकारी>सरकारची भूमिका : संघटनेशी अनेकदा चर्चा झाली असून, हा संप मिटवण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. संघटनेने तक्रारी उच्चस्तरीय समितीपुढे मांडाव्यात, ही समिती दोन महिन्यांत वेतनवाढीबाबत निर्णय घेईल. मात्र यासाठी संघटनांनी तत्काळ संप मागे घ्यावा.>न्यायालयाचे निर्देश२३ आॅक्टोबर रोजी उच्चस्तरीयसमिती स्थापन करा२४ आॅक्टोबर रोजी माहिती द्याउच्चस्तरीय समितीने१५ नोव्हेंबरपर्यंत अंतरिमअहवाल सादर करावावेतनवाढीचा २२ डिसेंबरपर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश

टॅग्स :ST Strikeएसटी संप