मुंबई : महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान या राज्यांतील संस्कृती, जीवनशैली आणि व्यक्तिचित्रण उलगडणारे ‘ब्राऊन’ हे रचना देवेंद्र दर्डा यांचे छायाचित्र प्रदर्शन कलारसिकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारे आहे. तर पंधरा वर्षांच्या आर्यमन देवेंद्र दर्डा याने ‘लिटल प्लॅनेट’ हे निसर्ग आणि वन्यजीवन संवर्धनाच्या उद्देशाने केलेले छायाचित्रण पुढच्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरत आहे.भायखळ्याच्या द ग्रेट ईस्टर्न मिल कम्पाउंड येथील नाइन फिश आर्ट गॅलरी येथे शुक्रवारी सायंकाळी या छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल, जेएसडब्ल्यू फाऊंडेशनच्या अध्यक्षा संगीता जिंदाल, प्रसिद्ध छायाचित्रकार अतुल कसबेकर, पर्यावरणतज्ज्ञ बिट्टू सहगल, सुप्रसिद्ध छायाचित्रकार अविनाश गोवारीकर, चित्रकार दीपक शिंदे व भाजपा प्रवक्त्या शायना एन. सी. यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाले. या प्रदर्शनातील छायाचित्रे न्याहाळताना कलारसिकांचे भान हरपून गेले होते. हे प्रदर्शन सोमवारपर्यंत सकाळी १०.३० ते सायंकाळी ७ या वेळेत सर्वांसाठी खुले आहे. ‘ब्राऊन’ या छायाचित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून येणारा सर्व निधी ग्रामीण भागातील लहान मुलांच्या शिक्षणासाठी जवाहरलाल दर्डा फाऊंडेशनला सुपुर्द करण्यात येईल. लहानग्यांसाठी शालेय गणवेश, वह्या-पुस्तके, पेन्सील-पेन या शैक्षणिक साहित्यासाठी सहकार्य करण्यात येणार आहे. दहावीत शिकत असलेल्या आर्यमन दर्डा यांच्या ‘लिटल प्लॅनेट’ या प्रदर्शनातून मिळणारा निधी वन्यजीवन व निसर्गाच्या संवर्धनासाठी देण्यात येणार आहे.राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी शनिवारी सायंकाळी छायाचित्र प्रदर्शनाला भेट देऊन पाहणी केली. प्रत्येक छायाचित्र बारकाईने न्याहाळत छायाचित्रकार रचना दर्डा आणि आर्यमन दर्डा यांना शाबासकी दिली. लहानग्या आर्यमनला भविष्यातही निसर्ग संवर्धनासाठी कार्य करण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्याचप्रमाणे प्रत्येक शालेय विद्यार्थ्याला सामाजिक जबाबदारीचे बाळकडू घरातूनच दिले पाहिजे, असेही मुख्यमंत्र्यांनी आवर्जून नमूद केले.अतिशय सुंदर अशा प्रकारची छायाचित्रे दोन्ही प्रदर्शनांत आहेत. एकीकडे वेगळ्या प्रकारचे खºया भारताचे प्रतिबिंब पाहायला मिळते आहे, सामान्य माणसाच्या चेहºयावरचे भाव रचना दर्डा यांनी मनमोहक पद्धतीने टिपले आहेत. तर दुसरीकडे यंग आर्टिस्ट आर्यमनने वाइल्डलाइफचे छायाचित्रण केले आहे. छायाचित्रण उत्तम आहेच; मात्र या प्रदर्शनांचा मुख्य उद्देश आहे, तोही तितकाच महत्त्वाचा आहे. वंचितांच्या शिक्षणासाठी आणि वन्यजीवनाच्या संवर्धनासाठी या प्रदर्शनांचा उपयोग होतो आहे, त्यामुळे दोन्ही छायाचित्रकारांचे मन:पूर्वक अभिनंदन.- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
‘ब्राऊन’ आणि ‘लिटल प्लॅनेट’ ही छायाचित्र प्रदर्शने अक्षरश: मंत्रमुग्ध करणारी आहेत. आर्यमनने केनिया, दक्षिण आफ्रिका, टांझानिया, भारत या ठिकाणी काढलेल्या छायाचित्रांवरून निसर्गाचे आगळे दर्शन झाले. रचना दर्डा यांनीही ग्रामीण भारताचे चित्रण कॅमेºयातून अचूकपणे टिपले आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून करण्यात येणारे समाजकार्य अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे मुंबईकरांनीही नक्की या प्रदर्शनाला भेट द्यावी.- अमृता फडणवीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी
दोन्ही प्रदर्शनांचे वैशिष्ट्य म्हणजे छायाचित्र टिपताना त्यामागे छायाचित्रकारांनी केलेला विशिष्ट विचार दिसून येत आहे. त्यामुळे एखादा दरवाजा असो किंवा प्राणी त्याचे छायाचित्र टिपताना वैशिष्ट्यपूर्ण मुद्रा कॅमेºयात बंदिस्त करण्यात दोन्ही छायाचित्रकारांना यश मिळाले आहे. तसेच, या प्रदर्शनाच्या आयोजनामागील उद्देशही तितकाच पूरक असून भविष्यातही असे अनेक उपक्रम राबविण्यासाठी दोघांनाही खूप शुभेच्छा!- अविनाश गोवारीकर, प्रसिद्ध छायाचित्रकारगेल्या काही वर्षांत झपाट्याने होत असलेला पर्यावरणाचा ºहास, ही गंभीर समस्या आहे. याविषयी, लहानग्यांना समजून सांगणे बºयाचदा कठीण होते. मात्र आता आर्यमनने केलेल्या छायाचित्रणाच्या माध्यमातून या पिढीला पर्यावरण संवर्धनाविषयीचे महत्त्व समजेल. या वयात आर्यमनने छायाचित्रणासाठी निवडलेला विषय, त्यामागील उद्देश हा पुढच्या पिढीसाठी प्रेरणादायक आहे. तर रोजच्या जगण्यात, व्यस्त दिनक्रमात आपल्या नजरेतून आजूबाजूचे बरेचसे सौंदर्य निसटून जाते. मात्र रचना यांनी हेच सौंदर्य कॅमेºयात बंदिस्त केले आहे आणि ही कला खºया अर्थाने वाखाण्याजोगी आहे.- अतुल कसबेकर, प्रसिद्ध छायाचित्रकार
या छायाचित्र प्रदर्शनामागील उद्देश हा अत्यंत महत्त्वाचा आहे. समाजात जागृती आणण्यासाठी आपली आवड सूचक पद्धतीने मांडली आहे. त्यामुळे यातून सर्वांनी प्रेरणा घेतली पाहिजे. शिवाय, प्रत्येकाने निसर्गसंवर्धनासाठी स्वत:पासून सुरुवात करणे, हीच निसर्ग वाचविण्यासाठी पहिली पायरी ठरेल.- जयकुमार रावल, पर्यटनमंत्री
रचना आणि आर्यमन दर्डा या दोघांनीही केलेले छायाचित्रण अत्यंत सुंदर आहे. या प्रदर्शनामागील उद्देश सकारात्मक असून, समाजाच्या मुख्य प्रवाहापासून वंचित असणाºया लहानग्यांसाठी यामुळे शिक्षणाची कवाडे खुली होणार आहेत. तसेच आर्यमनने एवढ्या लहान वयात केलेला प्रबोधक विचार प्रेरणा देणारा आहे.- दीपक शिंदे, चित्रकार