शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
5
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
6
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
7
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
8
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
9
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
10
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
11
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
12
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
13
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
14
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
15
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
16
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
18
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
19
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
20
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे

Budget 2020: शेतकऱ्यांचे वर्गीकरण करूनच योजना राबवाव्यात- पोपटराव पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2020 3:35 AM

असंघटित क्षेत्रातला शेतकरी हा सर्वांत मोठा घटक आहे़ त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न योग्य पद्धतीने कोणी मांडत नाही.

-पोपटराव पवार

असंघटित क्षेत्रातला शेतकरी हा सर्वांत मोठा घटक आहे़ त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न योग्य पद्धतीने कोणी मांडत नाही. ग्रामीण विकासाचा विचार करताना त्यात प्रामुख्याने शेतकरी आणि त्याच्याभोवतीचे घटक डोळ्यासमोर असले पाहिजेत. केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी अर्थसंकल्पात १६ कलमी कार्यक्रम जाहीर केला आहे. शेती, सिंचन व ग्रामीण विकास यांच्यासाठी एकत्रित तीन लाख कोटींची घोषणा केली आहे़ मात्र, शेती योजना राबविताना सरसकटीकरण टाळायला हवे़ शेतकºयांचे वर्गीकरण करून त्यानुसार योजनांची अंमलबजावणी आवश्यक आहे़ पड जमिनीवर सोलर योजनेसाठी तरतूद करण्यात आली आहे़ मात्र, या योजनेत सुसूत्रीकरणाचा अभाव दिसतो.

केंद्र सरकारने सेंद्रिय खते, शेती क्षेत्रात गुंतवणूक, सोलर ऊर्जा, ग्रामपंचायती फायबर आॅप्टिक केबलने जोडणे, अशा विविध योजनांसाठी तरतूद केली आहे़ तसेच स्वच्छ भारत योजनेसाठी १२ हजार ३०० कोटींची तरतूद आहे़ स्वच्छ भारत योजनेची अंमलबजावणी करताना ही योजना वैयक्तिक लाभांशी जोडायला हवी. गावे फायबर ऑप्टीक केबलने जोडून सर्व योजनांचे लाभ गावातून मिळायला हवेत. त्यासाठी ग्रामपंचायती सकाळी १० ते ५ वाजेपर्यंत सुरू राहायला हव्यात़ त्यासाठी कर्मचारी नेमण्याचे अधिकार ग्रामपंचायतींना मिळायला हवेत़ त्यासाठी स्वतंत्र तरतूदही १५व्या वित्त आयोगात करायला हवी़ १५ व्या वित्त आयोगाचा निधी देताना पाच हजार लोकसंख्येचा निकष रद्द करायला हवा.

कुसुम सोलर पंप योजना राबविताना एजन्सीवर अवलंबून न राहता महावितरणला अधिकार मिळायला हवेत. शेतकऱ्यांना सोलरचा परतावा कसा मिळणार याची स्पष्टता यायला हवी़ या अर्थसंकल्पात मनरेगाची तरतूद करायला हवी होती़ ती दिसत नाही़ शेतकामाला मनरेगाशी जोडून शेतकºयांना थेट मजुरी, सर्व पिकांना हमीभावाची तरतूद या अर्थसंकल्पात अपेक्षित होती़ कृषी योजना राबविताना बारामाही व सहामाही बागायतदार, अवर्षणग्रस्त शेतकरी, कोरडवाहू शेतकरी, नोकरदार शेतकरी असे वर्गीकरण करणे आवश्यक आहे. 

ग्रामीण भागातील महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंसाठी बाजारपेठ निर्माण करण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करायला हवी होती़ छोट्या शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळत नाही, यासाठी तरतूद असायला हवी होती.शहरी भाग गृहीत धरून अर्थसंकल्प सादर केला जातो़ हा अर्थसंकल्प शेतीकेंद्रित असायला हवा.

यंदा अर्थसंकल्पात १६ कलमी कार्यक्रम, कुसुम योजना, रस्त्यांची तरतूद या बाबी चांगल्या आहेत़ अर्थसंकल्पातील तरतुदींची अंमलबजावणी व्हावी. अन्यथा, ‘नेहमीच येतो पावसाळा’, अशी त्याची अवस्था व्हायची़शेतमालाचे भाव वाढले की शहरी वर्गातून ओरड होते़ मात्र, भाव एका पिकाचे वाढतात तर इतर पिके तोट्यातच असतात. त्यावर कोणी बोलत नाही़ त्यामुळे सर्व शेतमालाला हमीभाव हवा़ त्यातून महागाईही आटोक्यात राहू शकते आणि शेतकºयांना निश्चित उत्पन्न मिळेल.

टॅग्स :budget 2020बजेटbudget expert speaksबजेट तज्ञांचा सल्लाbudget sector analysisबजेट क्षेत्र विश्लेषणFarmerशेतकरी