शहरं
Join us  
Trending Stories
1
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
2
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
3
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
4
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
5
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
6
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
7
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
9
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
10
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
11
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
13
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
14
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
15
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
16
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
17
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
18
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
19
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
20
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष

Budget 2021: "नाशिक मेट्रोचे मॉडेल स्वीकारले ही आनंदाची बाब"; फडणवीसांकडून नागपूर, नाशिककरांचं अभिनंदन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2021 2:03 PM

Budget 2021, Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांच्याकडून नागपूर आणि नाशिककरांचं अभिनंदन

मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी संसदेत अर्थसंकल्प सादर केला. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या या अर्थसंकल्पाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. दरम्यान, केंद्र सरकारची राष्ट्रीय रेल्वे योजना २०३० पूर्णपणे तयार  असल्याची घोषणा करत यासाठी एकूण १.१० लाख कोटींचे बजेट केंद्र सरकारकडून रेल्वेला देण्यात आले आहे, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे. तसेच, रेल्वेशिवाय मेट्रो आणि परिवहन बस सेवा वाढवण्यावर फोकस करण्यात आला आहे. त्यासाठी १८ हजार कोटींची गुंतवणूक मेट्रो आणि इतर परिवहन सेवेवर खर्च करण्यात येणार आहेत. मेट्रोचे जाळं देशातील शहरांमध्ये पसरवण्यावर जोर दिला जाईल. यात कोच्ची, बंगळुरू, चेन्नई यांच्यासह महाराष्ट्रातल्या नागपूर, नाशिक शहरातील मेट्रो प्रकल्पांना चालना देण्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे. (Budget 2021 Latest News and updates)

अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील नाशिक आणि नागपूरच्या मेट्रो प्रकल्पांची घोषणा करण्यात आल्यानंतर भाजपाचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून नागपूर आणि नाशिककरांचे अभिनंदन केले आहे. तसेच, केंद्र सरकारने नाशिक मेट्रोचे मॉडेल स्वीकारले ही आनंदाची बाब आहे. नाशिक मॉडेल देशातील इतर शहरांमध्ये स्वीकारले जाईल. हे विकासाचे आणि नवनिर्माणाच्या धोरणाचे यश आहे. नाशिक मेट्रोसाठी 2092 कोटी आणि नागपूर मेट्रो दुसऱ्या टप्प्यासाठी 5976 कोटी रुपये आत्मनिर्भर भारत अतंर्गत देण्यात आल्याची माहित देत देवेंद्र फडणवीसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि  केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे आभार मानले आहेत.

दरम्यान, भारतीय रेल्वेसोबत सार्वजनिक परिवहन सेवेला प्रोत्साहन देण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे. त्यासाठी रेल्वेशिवाय मेट्रो आणि परिवहन बस सेवा वाढवण्यावर फोकस करण्यात आला आहे. याशिवाय, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हायवे प्रकल्पावरही भर दिला आहे. तामिळनाडू नॅशनल हायवेसाठी १.०३ लाख कोटींची घोषणा केली आहे, यात इकॉनोमिक कॉरिडोर बनवला जाईल, केरळमध्ये ६५ हजार कोटी रुपयांचे राष्ट्रीय महामार्ग उभारले जातील, मुंबई-कन्याकुमारी इकॉनोमिक कॉरिडोरची घोषणाही यंदाच्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. पश्चिम बंगालमध्येही कोलकाता-सिलीगुडी नॅशनल हायवे प्रकल्पाची घोषणा करण्यात आली आहे. त्याचसह आसाममध्ये पुढील ३ वर्षात हायवे आणि इकॉनोमिक कॉरिडोर बनवण्यात येईल, असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले आहे

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNirmala Sitaramanनिर्मला सीतारामनNarendra Modiनरेंद्र मोदीbudget 2021बजेट 2021