शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘एक्झिट पोल’ इतके गोंधळलेले का आहेत? 'हे' यावेत किंवा 'ते' यावेत; पण...
2
Maharashtra Vidhan Sabha: आतापर्यंत कोणत्या पक्षाचा स्ट्राइक रेट राहिला सर्वाधिक?
3
दगाफटका टाळण्यासाठी काँग्रेसकडून खबरदारी, विदर्भातील आमदारांन विशेष विमानाने सुरक्षित ठिकाणी हलवणार
4
निवडणुकीत डिपॉझिट वाचवण्यासाठी उमेदवारांना किती मतांची गरज असते?; जाणून घ्या सविस्तर
5
मणिपुरात आमदाराच्या घरातून दीड कोटीचे दागिने लुटून नेले; जमावाने केली नासधूस
6
यशस्वीचा ऑस्ट्रेलियातील पहिला डाव अयशस्वी! टीम इंडियाचा युवा हिरो स्टार्कसमोर ठरला झिरो (VIDEO)
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कामात यशस्वी व्हाल, आर्थिक लाभ होण्याची शक्यता!
8
Zomato च्या झीरो सॅलरी ऑफरमध्ये नवा टर्न; बॅकफायरनंतर दीपिंदर गोयल यांनी आता काय केल?
9
जगभर : सौदी अरेबियाने १०१ परदेशी नागरिकांना लटकवलं फासावर!
10
याला म्हणतात संस्कार! कैलाश खेर समोर येताच गौरव मोरे पडला पाया, अभिनेत्यावर होतोय कौतुकाचा वर्षाव
11
IND vs AUS : बुमराहच्या नेतृत्वाखाली या दोन नव्या चेहऱ्यांना मिळाली पदार्पणाची संधी
12
‘ती’ वादग्रस्त विधाने आयोगाच्या रडारवर; केंद्रीय मुख्य आयुक्तांनी मागवले अहवाल
13
सत्ता आमचीच! सत्ताधारी महायुती आणि विरोधी मविआच्या नेत्यांचे दावे 
14
करवीर ते कुलाबा 40 टक्के मतांचे अंतर; असे का ते समजून घ्या!
15
टक्क्याचा धक्का कुणाला? निवडणुकीत मतदारांमध्ये सुप्त लाट
16
बीड जिल्ह्यात मतदान केंद्र फोडले; ४० जणांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल
17
दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानमध्ये ५० ठार; मृतांमध्ये आठ महिला, पाच लहान मुलांचा समावेश
18
Maharashtra Vidhan Sabha ELection 2024: मुंबईत कोणत्या शिवसेनेसाठी मतटक्का वाढला?
19
विशेष लेख: कट्टर उजवे आणि वादग्रस्त - ऑल द प्रेसिडेंट्स मेन....
20
अदानींवर अमेरिकेत लाचप्रकरणी खटला; आरोप निराधार, आम्ही निर्दोष : अदानी

Budget 2023: तीन नवीन रेल्वे कॉरिडॉरची घोषणा, ४० हजार बोगींचे वंदे भारत मानकांमध्ये रूपांतर

By नजीर शेख | Published: February 02, 2024 12:21 PM

Budget 2023: चाळीस हजार सामान्य रेल्वे बोगींचे वंदे भारत मानकांमध्ये रूपांतर करण्यासह पायाभूत सुविधांशी संबंधित तीन नवीन रेल्वे कॉरिडॉर निर्माण करण्याची  घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात केली.

- नजीर शेखछत्रपती संभाजीनगर - चाळीस हजार सामान्य रेल्वे बोगींचे वंदे भारत मानकांमध्ये रूपांतर करण्यासह पायाभूत सुविधांशी संबंधित तीन नवीन रेल्वे कॉरिडॉर निर्माण करण्याची  घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात केली. मालवाहतुकीसाठी बांधण्यात येत असलेल्या रेल्वे कॉरिडॉरशिवाय ऊर्जा, खनिज व सिमेंट कॉरिडॉर, पोर्ट कनेक्टिव्हिटी कॉरिडॉर आणि उच्च रहदारी घनता कॉरिडॉरची घोषणा केली.

ऊर्जा आणि सिमेंट कॉरिडॉरचा वापर सिमेंट आणि कोळसा वाहतूक करण्यासाठी स्वतंत्रपणे केला जाईल. पोर्ट कनेक्टिव्हिटी कॉरिडॉर हा देशातील प्रमुख बंदरे जोडेल. तर उच्च रहदारी घनता कॉरिडॉर हा जास्त गर्दी असलेल्या रेल्वे मार्गांसाठी असेल. उच्च-वाहतूक कॉरिडॉरमधील गर्दी कमी केल्याने केवळ प्रवासी गाड्यांचे संचालनच वाढणार नाही तर सुरक्षितता सुनिश्चित होईल आणि प्रवासाचा वेग वाढेल. पॅसेंजर गाड्यांचे कामकाज सुधारण्यासही मदत होईल. हे तीन आर्थिक कॉरिडॉर सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी)  वाढीला गती देतील तसेच दळणवळणावरील खर्च कमी करतील. पीएम गती शक्ती उपक्रमांतर्गत ओळखल्या गेलेल्या या प्रकल्पांचा उद्देश मल्टी-मॉडल कनेक्टिव्हिटी वाढवणे हा आहे. तसेच समर्पित मालवाहतूक (डेडिकेटेड फ्रेट)  कॉरिडॉरमुळे विकासदर वाढण्यासाठी मदत होऊ शकेल. या स्वतंत्र मार्गिकांमुळे मालवाहतूक सुलभ होऊ शकेल. तसेच प्रवासी वाहतुकीलाही याचा फायदा होऊ शकेल, असा विश्वास सीतारामन यांनी व्यक्त केला. 

मेट्रो, नमो भारतमेट्रो आणि नमो भारत या सेवांचा विस्तार केला जाणार आहे. बड्या शहरांमध्ये मेट्रो आणि नमो भारत सेवा पोहोचवण्यावर भर दिला जाणार आहे. मेट्रो रेल्वे, नमो भारत आवश्यक शहरी परिवर्तनासाठी उत्प्रेरक ठरू शकतात. 

बाजारातही गतीअर्थसंकल्पापूर्वी रेल्वेशी संबंधित कंपन्यांच्या समभागांनी सकारात्मक गती दाखवली. इंडियन रेल्वे कन्स्ट्रक्शन इंटरनॅशनल लिमिटेडचे शेअर्स ३.२६ % वाढले, टेक्समॅको रेल ॲण्ड इंजिनीअरिंगने २.७१ % ची उडी घेतली. 

रेल्वेची गती-शक्ती वाढणारआज संसदेत सादर झालेले अंतरिम बजेट सर्व वर्गातील, सर्व क्षेत्रांना स्पर्श करणारे आहे. ४० हजार नवीन वंदे भारत कोच तयार होणार आहेत. रेल्वे एनर्जी, मिनरल आणि सिमेंट कॉरिडॉर तयार करून वाहतुकीला चालना दिली जाणार आहे. रेल्वे हाय डेन्सिटी ट्रॅफिक कॉरिडॉर बनणार आहे. रेल सागर अंतर्गत पोर्टची वाहतूक वाढविण्यासाठी रेल्वेची क्षमता वाढविली जाणार आहे. २०४७ मध्ये देशाच्या स्वातंत्र्याला १०० वर्षे पूर्ण होणार असून, त्यादृष्टीने नवीन इन्फ्रा स्टक्चर उभे करण्यासाठी देशाला दिशा देणारा अर्थसंकल्प सादर झाला आहे.- रावसाहेब दानवे, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री 

पॅसेंजर रेल्वेंची खरी गरज- अरुण मेघराजअध्यक्ष, मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघ४० हजार सामान्य बोगी वंदे भारत एक्स्प्रेस दर्जाच्या होणार असल्याचे जाहीर करण्यात आले. मात्र, ही श्रीमंतांसाठीच सोय केली जाते, असे वाटतेय. त्यातून तिकीट दर वाढतील. खरे तर प्रवाशांच्या सुविधेसाठी पॅसेंजर रेल्वेंची आवश्यकता आहे. सध्या हा अंतरिम अर्थसंकल्प आहे. त्यामुळे जुलै महिन्यातील नियमित अर्थसंकल्पात सामान्य प्रवाशांच्या दृष्टीने सुविधांची अपेक्षा करता येईल. मात्र, तीन कॉरिडॉरची घोषणा ही नवीन असून रेल्वेच्या पायाभूत सुविधांसाठी ती आवश्यक आहे. अशा प्रकारच्या कॉरिडॉरमुळे मालवाहतूक तसेच प्रवासी वाहतूक अधिक सुलभतेने होण्यास मदत होईल.

महाराष्ट्रात रेल्वेला काय मिळाले?नवीन रेल्वे मार्गिकाnनगर-बीड-परळी रेल्वेमार्ग : २७५ कोटीnबारामती-लोणंद रेल्वे : ३३ कोटीnवर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे : ७५० कोटीnसोलापूर-उस्मानाबाद-तुळजापूर रेल्वेलाइन : २२५ कोटीnधुळे-नार्धना रेल्वे लाइन : ३५० कोटीnकल्याण-मुरबाड-उल्हासनगर रेल्वे लाइन : १० कोटीदुसरी, तिसरी, चौथी मार्गिका प्रकल्पnकल्याण-कसारा तिसरी मार्गिका : ८५ कोटीnवर्धा-नागपूर रेल्वे तिसरी मार्गिका : १२५ कोटीnवर्धा-बल्लार शाहा तिसरी मार्गिका : २०० कोटीnइटारसी-नागपूर तिसरी मार्गिका : ३२० कोटीnपुणे-मिरज रेल्वे दुसरी मार्गिका : २०० कोटीnदौंड-मनमाड दुसरी मार्गिका : ३०० कोटीnवर्धा-नागपूर चौथी लाईन :१२० कोटीnमनमाड-जळगाव तिसरी : १२० कोटीnजळगाव-भुसावळ चौथी मार्गिका : ४० कोटीnभुसावळ-वर्धा तिसरी मार्गिका : १०० कोटीगेज रूपांतरnपाचोरा जामनेर लाइनसाठी : ३०० कोटी,यार्ड रिमोल्डिंगnकसारा : १ कोटीnकर्जत : १० कोटीnपुणे : २५ कोटीमुंबईसाठी काय?    nसीएसएमटीसाठी प्लॅटफॉर्म लांबीकरण : १० कोटी nलोकमान्य टिळक टर्मिनस स्टेशन : २ कोटी

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेBudgetअर्थसंकल्प 2024Maharashtraमहाराष्ट्रbudget expert speaksबजेट तज्ञांचा सल्ला