शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
राहुल गांधींनी कोर्टात हजर राहावे; वीर सावरकर बदनामी प्रकरणी पुणे कोर्टाचे आदेश
3
ISRO आणि SpaceX ची भागीदारी यशस्वी, इलॉन मस्क यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
5
पुतिन, झेलेन्स्कींनी मला भेटून तोडगा काढावा; तिसरे महायुद्ध टाळायलाच हवे -डोनाल्ड ट्रम्प
6
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
7
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
8
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
9
धर्म धोक्यात नाही तर आरक्षण धोक्यात आहे, श्रीकृष्ण आयोग लागू करा -प्रकाश आंबेडकर
10
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
11
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा
12
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
13
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
14
निवडणूक निकालानंतर बेकायदा होर्डिंग्ज लावल्यास कारवाई करा; हायकोर्टाचे राज्य सरकार, पोलीस प्रमुखांना निर्देश
15
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
16
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
17
विशेष लेख: अझरबैजानमधल्या हवामानबदल परिषदेवर चिंतेचे मळभ!
18
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
19
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
20
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार

अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून; विधिमंडळ सभागृहात उमटणार तीव्र राजकीय संघर्षाचे पडसाद 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2023 6:22 AM

राज्यपाल रमेश बैस यांच्या अभिभाषणाने अधिवेशनाला प्रारंभ होईल.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यात सध्या सुरू असलेल्या तीव्र राजकीय संघर्षाचे तीव्र पडसाद सोमवारपासून सुरू होणाऱ्या राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उमटण्याची शक्यता आहे. २४ मार्चपर्यंत चालणाऱ्या अधिवेशनात ९ मार्चला अर्थसंकल्प सादर होणार आहे.  

राज्यपाल रमेश बैस यांच्या अभिभाषणाने अधिवेशनाला प्रारंभ होईल. शिवसेनेतील सत्तासंघर्ष टोकाला पोहोचला असून आरोप- प्रत्यारोपांचा धुराळा उठला असताना सत्ताधारी भाजप- शिंदे सेना विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यात अधिवेशनातही कुरघोडीचे राजकारण पाहायला मिळेल, अशी चिन्हे आहेत. विधिमंडळातील शिवसेनेच्या कार्यालयाच्या ताब्यावरून दोन्ही गट आमने-सामने येण्याची शक्यता आहे. १४ मार्चपासून सरकारी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाची हाक दिली आहे. 

कसबा आणि पिंपरी- चिंचवडमधील विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल २ मार्चला लागणार असून त्या निमित्ताने राजकीय वातावरण ढवळून निघेल आणि अधिवेशनातही त्याचे पडसाद उमटतील.

विरोधकांची आज बैठक; चहापानावर बहिष्कार? n मविआच्या नेत्यांची बैठक रविवारी दुपारी विधानभवनात होईल. त्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार पत्रपरिषद घेऊन अधिवेशनातील मविआची रणनीती जाहीर करतील. n मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परंपरेनुसार सायंकाळी  बोलविलेल्या चहापानावर विरोधक बहिष्कार टाकण्याची शक्यता अधिक आहे. 

टॅग्स :Budgetअर्थसंकल्प 2023Maharashtraमहाराष्ट्र