ऑनलाइन लोकमत
बुलडाणा, दि. 5 - एस.टी महामंडळातील निवृत्त कर्मचारी व त्यांच्या पत्नीला मोफत प्रवास सलवत मिळावी, तसेच संघटनेच्या विविध प्रलंबित मागण्यासाठी ईपीएस-९५ निवृत्ती कर्मचारी समन्वय समितीकडून आज ५ जून रोजी सकाळी ११ वाजता एस.टी विभाग नियंत्रक कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी सदर कार्यालयाबाहेर निदर्शने करीत आपल्या विविध मागण्यांसदर्भात विभाग नियंत्रकांना सेवानिवृत्तीधारकांच्या शिष्टमंडळाने निवेदन दिले. निवेदनत नमूद आहे की, ईपीएस-९५ निवृत्ती कर्मचारी समन्वय समितीकडून राज्यातील विविध क्षेत्रातील सेवानिवृत्तीधारकांच्या मागण्यासंदर्भात वेळोवेळी आंदोलन करण्यात आले. याची दखल घेते, मुख्यमंत्री फडणवीस यांनी फेबु्रवारी महिण्यात मागण्या मान्य करण्याबाबत आश्वासन दिले होते. मात्र यानंतर हे आश्वासन नंतर हवेत विरले.यामुळे सेवानिवृत्तीधारक व एस.टी महामंडळातील निवृत्त कर्मचाºयांच्या मागण्या शासनदरबारी मांडणासाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
स्थानिक जयस्तंभ चौकातील गांधीभवनातून सकाळी निघालेल्या या मोर्चाचे नेतृत्व समितीचे राष्ट्रीय सचिव कमांडर अशोक राऊत यांनी केले. यावेळी समितीचे प्रमुख एस.एम.बैरवार, महावीर काळे, एस.एन.सोमवंशी यांच्यासह जिल्हाभरातील सेवानिवृत्त महिला पुरुष सहभागी झाले होते.(प्रतिनिधी)