लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : सुमारे सहा महिन्यांपूर्वी झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत एका मतदानकेंद्रावर ईव्हीएममधे घोटाळा होत असल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत अहवाल निवडणूक आयोगाला सादर केला होता. त्यानुसार एका अपक्ष उमेदवाराच्या नावासमोरील बटण दाबले असता ते मत भाजपा उमेदवाराला जात होते ! यामुळे ईव्हीएममध्ये घोटाळा होणे शक्य असल्याचा दावा मुंबई येथील आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केला आहे.लोणार तालुक्यातील सुलतानपूर जिल्हा परिषद सर्कलचे अपक्ष उमेदवार आशा अरुण झोरे यांनी १६ फेब्रुवारी रोजी मतदानादरम्यान होत असलेल्या या गोंधळाची तक्रार निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली होती. त्याआधारे याची चौकशी करण्यात आली. १६ जून रोजी आरटीआय कार्यकर्ते गलगली यांनी माहिती अधिकारांतर्गत अर्ज दाखल केला होता. त्यावर जिल्हा निवडणूक विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, सुलतानपूर येथील मतदान केंद्र क्रमांक ५६वरएका मतदाराने जेव्हा ईव्हीएमवरील पहिल्या क्रमांकावरील अपक्ष उमेदवाराच्या नावापुढील ‘नारळ’ या चिन्हापुढील बटन दाबले, तेव्हा चौथ्या क्रमांकावर असलेल्या भाजपा उमेदवाराच्या नावासमोरील दिवा लागला. अपक्ष उमेदवार आशा झोरे यांनी सकाळी १०च्या सुमारास याची तक्रार निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली होती. मात्र, अधिकाऱ्यांनी त्यांची तक्रार घेण्यास नकार दिला होता. मात्र, जेव्हा अनेक मतदारांनी याबाबत तक्रार केली तेव्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास याबाबत तक्रार नोंदवली आणि कारवाई करण्याआधी सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या सहमती घेतली. यानंतर लोणारच्या निवडणूक अधिकाऱ्यांचे सहाय्यक या केंद्रावर पोहोचले व त्यांनीही याची खातरजमा करून घेतली. तेव्हा अपक्ष उमेदवाराचे मत हे भाजपा उमेदवाराला जात असल्याचे स्पष्ट झाले. राजकीय पक्षांनी फेरमतदानाची मागणी केल्याने येथील मतदान रद्द करून २१ फेब्रुवारीला ते घेण्यात आले.याबाबत प्रतिक्रीया जाणून घेण्यासाठी ‘लोकमत’ ने जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.सुलतानपूर येथे ‘ईव्हीएमह्णमध्ये घोळ झाला होता, हे बुलडाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाला पाठविलेल्या अहवालानंतर समोर आले आहे. ह्यईव्हीएमह्णमध्ये प्रचंड घोळ आणि हेराफेरी होत असल्याचे आता निवडणूक आयोगाने मान्य करावे. - अनिल गलगली,आरटीआय कार्यकर्ते, मुंबई
बुलडाण्यात ‘ईव्हीएम’मध्ये घोटाळा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 3:49 AM