शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

बुलडाण्यात शाहीरीतून लेक वाचवाची गूंज!

By admin | Published: October 20, 2016 5:50 PM

जिल्ह्यातील ६० गावांमध्ये शाहीरांच्या कलापथक मंडळाकडून ह्यबेटी बचाव, बेटी पढावह्ण हे अभियान राबविण्यात येत आहे.

ब्रम्हानंद जाधव

बुलडाणा, दि. २० : जिल्ह्यातील ६० गावांमध्ये शाहीरांच्या कलापथक मंडळाकडून ह्यबेटी बचाव, बेटी पढावह्ण हे अभियान राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील मुलांपेक्षा मुलींचा जन्म दर कमी असलेल्या गावांमध्ये शाहीरांच्या   शाहीरीतून ह्यलेक वाचवाह्णची गूंज एकायला मिळत आहे.

मुलीला जीव लावा, सन्मान तीचाही व्हावा, मुलगी वाचवा, मुलगी शिकवा, तसेच आई मला जगू दे, जग पाहु दे आणि मुलगा कुळाचा दिवा असे म्हणती तर, मुलगी दोन्ही कुळांना प्रकाश देणारी पणती असेही म्हणती, अशा आशयगर्भ गिताद्वारे शाहीर बेटी बचाव बेटी पाढावचा प्रचार जिल्ह्यातील गावोगावी करीत आहेत. भारत सरकारच्या सुचना व प्रसारण मंत्रालयाच्यावतीने व गीत नाटक प्रभाग पुणेद्वारा आयोजित बेटी बचाव, बेटी पढाव अभियान जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी बुलडाणा यांच्या सनियंत्रणात हाती घेण्यात आले आहे.

ज्या गावामध्ये मुलींचा जन्म दर मुलांपेक्षा कमी आहे, अशा जवळपास १२५ गावांपैकी ६० गावात ह्यबेटी बचाव, बेटी पढावह्ण हे अभियान, दर्जेदार शाहीरी कार्यक्रमासाठी प्रसिद्ध असलेले समाजभूषण शाहीर डी.आर.इंगळे व औरंगाबादचे शाहीर लक्ष्मण मोकासरे यांच्या जयभवानी कलापथक मंडळाद्वारे राबविण्यात येत आहे. १७ आॅक्टोबरला कोलवड येथे सरपंच कौतीकराव जाधव यांच्या सहकार्याने कलापथकाचा कार्यक्रम घेऊन जिल्ह्यात बेटी बचाव, बेटी पढाव या अभियानास सुरूवात करण्यात आली आहे. सदर कार्यक्रमास गावातील महिला व पुरूषांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभत आहे.शासकीय योजनांना कलापथकाचा आधारशासनाच्या विविध योजनांचा प्रचार व प्रसार करण्याकरिता शाहीरांच्या कलापथकमंडळांचा आधार घेण्यात येत आहे. ह्यबेटी बचाव, बेटी पढाव या अभियानाबारोबरच हागणदरीमुक्त गाव, जलयुक्त शिवार, व्यसनमुक्ती, महिला संरक्षण ग्रामस्वच्छता यासारख्या विविध अभियानाची जनजागृती शाहीर मंडळींच्या कलापकातून करण्यात येत आहे.लेक वाचवासाठी शाहीर पिंजून काढताहेत गावनगावबेटी बचाव, बेटी पढाव या अभियानासाठी शासनस्तरावरून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. ज्या गावामध्ये मुलींचा जन्म दर मुलांपेक्षा कमी आहे, अशा जवळपास १२५ गावांपैकी ६० गावात शासनाने ह्यबेटी बचाव, बेटी पढावह्णहे अभियान हाती घेण्यात आले आहे. त्याकरिता दर्जेदार शाहीरी कार्यक्रमासाठी प्रसिद्ध असलेले समाजभूषण शाहीरांच्या कलापथक मंडळाचा सहभाग घेण्यात आला आहे. लेक वाचविण्याचा संदेश देणारे हे अभियान प्रभाविपणे राबविण्यासाठी शाहीर जिल्ह्यातील गावनगाव पिंजून काढत आहेत.मुलांपेक्षा मुलींचा जन्म दर कमी असलेल्या गावांमध्ये कलापथक मंडळाकडून ह्यबेटी बचाव, बेटी पढाव अभियान राबविण्यात येत आहे. मुलगी वाचवा, मुलगी शिकवा ही चळवळ शासकीय पातळीपुरती मर्यादीत न राहता ती लोक चळवळ व्हावी,याबाबबत शासकनाकडून लोककलावंतांना सहकार्य अपेक्षीत आहे.

- डी.आर.इंगळे, शाहीर,जयभवानी कलापथकमंडळ, बुलडाणा.