शहरं
Join us  
Trending Stories
1
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
2
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
3
पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाची दाणादाण, टीम इंडिया विजयापासून पाच पावलं दूर
4
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही
5
महायुतीला १३८ जागांवर ५० टक्क्यांहून अधिक मतं, १६ ठिकाणी लाखांचं मताधिक्य, अवाक् करणारी आकडेवारी
6
अदानी समूहाच्या शेअर्समध्ये पुन्हा तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: कोणत्या पक्षाचे किती विद्यमान आमदार पराभूत?; ६ आमदाराचे डिपॉझिटही जप्त
8
"विचारधारा वगैरे आता विसरायला हवं"; धक्कादायक निकालानंतर जितेंद्र आव्हाडांचं विधान
9
पराभूत झालो असलो तरी...; विधानसभा निकालानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
10
"देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना भेटून...", निवडणुकीनंतर अनुपम खेर यांची खास पोस्ट
11
Stock Market Boom : राज्यातील महायुतीच्या 'महा'विजयानं शेअर बाजारात जल्लोष, Sensex-Nifty मध्ये तेजी; Adani चे शेअर्स वधारले
12
Sajjad Nomani: "मी शब्द मागे घेतो, बिनशर्त माफी मागतो"; सज्जाद नोमानींकडून खुलासा
13
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; नव्या वर्षात मिळू शकतं मोठं गिफ्ट, १८६% वाढू शकते सॅलरी
14
शेतकऱ्यांसाठी सुखद घटना! निवडणूक संपताच राज्यातील सोयाबीनचे भाव वधारले
15
Maharashtra Assembly Election Result 2024: संख्याबळानुसार मंत्रिपदांचा आग्रह! राज्य मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला काय?
16
केवळ ₹ ५००० ची SIP सुरू करा; २५ वर्षांनंतर मोजता मोजता थकाल; पाहा कसा काम करेल Step-Up फॉर्म्युला
17
पाेलिसांनाच ‘डिजिटल अरेस्ट’! पोलिस उपायुक्तांच्या पत्रकार परिषदेतील प्रकार, काय घडलं?
18
"दैत्याचं तेच झालं, जे नेहमी होतं"; उद्धव ठाकरेंवर कंगना रणौत यांचे टीकास्त्र
19
मॅपवर दाखविला अर्धवट पूल असलेला रस्ता; कार काेसळली २५ फूट खाली नदीपात्रात, ३ ठार
20
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: मित्रांकडून लाभ होईल, मंगल कार्याची सुरूवात करू शकता!

भूमिपुत्रांच्या घरावर बुलडोझर

By admin | Published: March 17, 2017 1:04 AM

नवी मुंबईतील गावठाण आणि गावठाण परिसरातील हजारो गावांना अतिक्रमण ठरवून त्यावर बुलडोझर फिरवला जात आहे. ही घरे नियमित करून स्थानिकांना, भूमिपुत्रांना न्याय द्या

मुंबई : नवी मुंबईतील गावठाण आणि गावठाण परिसरातील हजारो गावांना अतिक्रमण ठरवून त्यावर बुलडोझर फिरवला जात आहे. ही घरे नियमित करून स्थानिकांना, भूमिपुत्रांना न्याय द्या, अशी आग्रही मागणी विरोधकांनी गुरुवारी विधान परिषदेत केली. नवी मुंबईतील अतिक्रमणविरोधी कारवाईच्या विरोधात तेथील हजारो लोक सध्या आंदोलन करत आहेत. आंदोलकांच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे. नऊ उपोषणकर्त्यांची प्रकृती चिंताजनक असून, सरकारने ताबडतोब या प्रकरणी हस्तक्षेप करून दिलासा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे सदस्य नरेंद्र पाटील यांनी केली. ज्यांनी सरकारला गरजेच्या वेळी आपल्या जमिनी दिल्या त्यांचीच घरे आता अतिक्रमणे ठरवून पाडली जात आहेत, असा आरोप त्यांनी केला. नवी मुंबईत गावठाण विस्तार आणि मूलभूत सुविधा पूर्ण झालेल्या नाहीत. गावठाणावरील अतिक्रमणे नियमित करण्याची आश्वासने यापूर्वी देण्यात आली होती, त्यावर कार्यवाही व्हावी, अशी मागणी शेकापचे जयंत पाटील यांनी केली. तर, भूमिपुत्रांची घरे सिडकोच्या जागेत नाहीत. ती भूमिपुत्रांच्याच मालकीच्या जागेत आहेत. केवळ नवी मुंबईतील आयुक्तांच्या मनमानी कारभारामुळे ही समस्या उभी राहिल्याचा आरोप राष्ट्रवादीचे सदस्य सुनील तटकरे यांनी केला. या मनमानी कारभार करणाऱ्या आयक्तांवर महापालिकेत अविश्वास ठराव संमत करण्यात आला होता. तरीही त्यांच्यावर कारवाई करण्यात आली नाही. भूमिपुत्रांना न्याय देण्यासाठी सरकारने तत्काळ कार्यवाही करावी, अशी मागणीही तटकरे यांनी केली. यावर, मानवतेच्या दृष्टिकोनातून स्थानिकांना दिलासा मिळायला हवा. आधी पुनर्वसन करून मगच अतिक्रमण काढता येईल का, याबाबत सरकारने विचार करावा, अशी अपेक्षा सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केली. तसेच आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी सभापतींच्या दालनात मुख्यमंत्री आणि संबंधितांची आजच्या आज बैठक बोलवावी, असे निर्देशही सभापती निंबाळकर यांनी सरकारला दिले. यावर, तातडीने बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन महसूल मंत्री आणि सभागृह नेते चंद्रकांत पाटील यांनी दिले. (प्रतिनिधी)